Current Affairs of 30 December 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (30 डिसेंबर 2015)

चालू घडामोडी (30 डिसेंबर 2015)

‘टॉप टेन’ वृत्तपत्रांत ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीने स्थान पटकावले :

 • ‘रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स इन इंडिया’च्या (आरएनआय) ताज्या अहवालानुसार देशातील सर्वाधिक खप असणाऱ्या ‘टॉप टेन’ वृत्तपत्रांत ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीने स्थान पटकावले आहे.
 • मराठी भाषिक वृत्तपत्रांमध्ये तर ‘सकाळ’ पुणे अव्वल स्थानीच आहे; तर देशातल्या प्रांतीय भाषिक वृत्तपत्रांत ‘सकाळ’ तिसऱ्या स्थानावर आहे.
 • देशात वृत्तपत्रांची वाढ 5.8 टक्के या वेगाने होत असल्याचेही या अहवालामध्ये म्हटले आहे.
 • देशातील वृत्तपत्रांच्या नोंदणीची सर्वोच्च संस्था असलेल्या ‘आरएनआय’च्या ‘प्रेस इन इंडिया’ या ताज्या अहवालानुसार, एका आवृत्तीच्या सर्वाधिक खपाच्या भाषिक वृत्तपत्रांच्या (हिंदी, इंग्रजी वगळून उर्वरित) भारतातील ‘टॉप टेन’च्या यादीत स्थान पटकावण्याचा मान मराठी वृत्तपत्रांमध्ये केवळ ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीला मिळाला आहे.
 • या श्रेणीत पश्‍चिम बंगालमधील ‘आनंदबझार पत्रिका’ आणि ‘बर्तमान’ या दैनिकांबरोबरच तीन हिंदी आणि चार इंग्रजी भाषिक दैनिकांचा समावेश आहे.
 • तसेच दुसऱ्या क्रमांकावरील इंग्रजी दैनिकांचा खप 11.40 टक्के आहे. मराठी दैनिके उर्दू व तेलगू भाषांनंतर पाचव्या स्थानी आहेत.

केंद्र सरकारची 3050 कोटी रुपयांच्या अर्थसाह्याची घोषणा :

 • दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला केंद्र सरकारने 3050 कोटी रुपयांच्या अर्थसाह्याची घोषणा केली आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्त राज्यांच्या मदतीसाठी असलेल्या उच्चस्तरीय समितीची बैठक होऊन त्यात मदतीचा निर्णय झाला.
 • राष्ट्रीय आपत्तीनिवारण निधीतून (एनडीआरएफ) ही मदत मिळणार असून, मध्य प्रदेशलाही 2033 कोटी रुपयांचे अर्थसाह्य दिले जाईल.
 • महाराष्ट्रात 21 जिल्ह्यांमधील 15747 गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती असून, राज्य सरकारने केंद्राकडे चार हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली होती.

लेखक रघुवीर चौधरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर :

 • थोर स्वातंत्र्यसेनानी जयप्रकाश नारायण यांच्या नवनिर्माण आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याबरोबरच “आणीबाणी‘ला कडाडून विरोध करणारे आणि विपुल साहित्यसंपदा निर्माण करणारे ज्येष्ठ गुजराती लेखक रघुवीर चौधरी यांना यंदाचा साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला.
 • साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या लेखक, कवींना दरवर्षी या पुरस्काराने गौरविले जाते.
 • गतवर्षी मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
 • ज्ञानपीठ मिळविणारे चौधरी हे चौथे गुजराती लेखक आहेत. यापूर्वी उमा शंकर जोशी (1967), पन्नालाल पटेल (1985) आणि राजेंद्र शाह (2001) यांना हा पुरस्कार मिळाला होता.
 • सरस्वतीची प्रतिमा, प्रशस्तिपुस्तक आणि रोख 11 लाख रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 • चौधरी यांचा जन्म 5 डिसेंबर 1938 मध्ये गुजरातमधील गांधीनगरजवळील बापुपुरा खेड्यात शेतकरी कुटुंबात झाला.
 • गुजरात विद्यापीठातच ते 1977 मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले आणि प्रोफेसर म्हणून 1998 मध्ये निवृत्त झाले.
 • हाडाचे शिक्षक म्हणून चौधरी यांची ओळख आहे. एकीकडे ज्ञानदान करतानाच गुजराती साहित्यात त्यांनी विविध विषयांवर विपुल लिखाण केले आहे.

नीति आयोगाचे सीईओ म्हणून अमिताभ कांत यांची निवड :

 • नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून वरिष्ठ आयएएस अधिकारी अमिताभ कांत यांची केंद्र सरकारने निवड केली आहे.
 • केरळ केडर्स आयएएसचे ते 1980च्या तुकडीचे ते अधिकारी असून, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्याही उद्योग धोरण विभागाच्या सचिवपदाची अतिरिक्त जबाबदारीही त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
 • कांत यांनी अनेक खात्यांचे सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव म्हणून संजय मित्रा यांची निवड करण्यात आली आहे. सरकारने अन्य खात्यांच्याही सचिवांची निवड केली आहे.

प्रसिद्ध गायक सुबीर सेन यांचे निधन :

 • प्रसिद्ध गायक सुबीर सेन (वय 81) यांचे आज एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले.
 • आ जा रे नैन द्वारे (रूप की रानी चोरों का राजा), गोरी तेरे नटखट नैना वार करे चुप जाये (हम भी इन्सान है) यांसह त्यांच असंख्य गाणी गाजलेली आहेत. बंगालीमधील गाणी लोकप्रिय ठरली आहेत.

पत्रकारांसाठी भारतच अधिक धोकादायक :

 • आशियामध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये दहशतवादाचा बळी ठरलेल्या नागरिकांची संख्या अधिक असली, तरी पत्रकारांसाठी मात्र भारतच अधिक धोकादायक असल्याचे एका संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
 • सरत्या वर्षांत विविध हल्ल्यांमध्ये भारतातील नऊ पत्रकारांना जीव गमवावा लागला आहे.
 • “रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर” या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, या वर्षांत जगभरातील विविध घटनांमध्ये 110 माध्यम प्रतिनिधींचा बळी गेला आहे. यापैकी 43 पत्रकारांच्या हत्येचे कारण समजलेले नाही.
 • भारतात मारल्या गेलेल्या पत्रकारांची संख्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात मारल्या गेलेल्या पत्रकारांच्या संख्यपेक्षा अधिक आहे.

इस्राईलच्या माजी पंतप्रधानांना तुरुंगवासाची शिक्षा :

 • इस्राईलच्या माजी पंतप्रधानांना येथील सर्वोच्च न्यायालयाने दीड वर्षे तुरुंगवासाची शिक्षा लाच घेतल्याप्रकरणी इस्राईलच्या माजी पंतप्रधानांना येथील सर्वोच्च न्यायालयाने दीड वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
 • तुरुंगवास भोगावा लागणारे एहुद ओल्मर्ट हे इस्राईलचे पहिलेच माजी पंतप्रधान आहेत. ओल्मर्ट यांच्यावर 1,28,500 डॉलरची लाच घेतल्याचा आरोप होता.एहुद ओल्मर्ट हे आता 70 वर्षांचे आहेत. 2006 ते 2009 या कालावधीमध्ये ते इस्राईलचे पंतप्रधान होते.
 • गेल्या दशकाच्या सुरवातीस विविध कामांसाठी लाच स्वीकारल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.
 • या प्रकरणी 2014 च्या मेमध्ये ओल्मर्ट यांना दोन प्रकरणांमध्ये मिळून एकूण सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
 • सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात ओल्मर्ट यांना दोषमुक्त केले आणि त्यांची शिक्षा कमी करून दीड वर्षांचा तुरुंगवास भोगण्याचा आदेश दिला. या शिक्षेच्या अंमलबजावणीची सुरवात 15 फेब्रुवारी 2016 पासून होईल.

खासगी क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांना 26 आठवड्यांची प्रसूती रजा :

 • खासगी क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांना 26 आठवड्यांची प्रसूती रजा देण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याची माहिती महिला आणि बालविकासमंत्री मेनका गांधी यांनी दिली आहे.
 • नवजात बालकाची जन्मानंतर काळजी घेण्यासाठी प्रसूती रजेच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी गांधी यांनी कामगार मंत्रालयाला लिहिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

केरळमध्ये फक्त पंचतारांकित हॉटेल्सनाच बारचा परवाना :

 • सुप्रीम कोर्टाने केरळमध्ये फक्त पंचतारांकित हॉटेल्सनाच बारचा परवाना देण्याच्या राज्य सरकारच्या मद्य धोरणावर शिक्कामोर्तब केले.
 • यामुळे आता पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण असलेल्या आणि ‘गॉड्स ओन कन्ट्री’ अशी ओळख असलेल्या केरळमध्ये मद्यशौकिनांना पंचतारांकित हॉटेल्समधील फक्त 24 बारमध्येच आपली तल्लफ भागविता येईल.

गिनी देश इबोला व्हायरसमुक्त झाल्याचे जाहीर :

 • जागतिक आरोग्य संघटनेने गिनी देश इबोला व्हायरसमुक्त झाल्याचे जाहीर केले.
 • गेली दोन वर्षे देशात इबोलाने 2500 लोकांचे प्राण घेतले.

‘आयफेल टॉवर’ बनला‘ट्विटर’चा अधिकृत सदस्य :

 • जगप्रसिद्ध ताजमहाल व स्टॅच्यू ऑफ लिबर्टीने 126 वर्षे जुन्या आयफेल टॉवरचे ट्विटरवर स्वागत केले आहे. जगात सर्वाधिक पर्यटक आकर्षित करणारा ‘आयफेल टॉवर’ Twitterगेल्या आठवड्यात ‘ट्विटर’चा अधिकृत सदस्य बनला.
 • आयफेल टॉवरने आपल्या अकाऊंटवर पहिले ट्विट फ्रेंच आणि इंग्रजी भाषेत केले आहे.

नवीन चित्रफीत जारी :

 • अवकाशातील कचरा खूप मोठय़ा प्रमाणात वाढला असून त्याबाबतची एक व्हिडिओ नुकतीच जारी करण्यात आला आहे.
 • युनिव्हर्सटिी कॉलेज लंडन या संस्थेचे स्टुअर्ट ग्रे यांनी अवकाशातील कचऱ्याबाबतचा व्हिडिओ तयार केला असून त्यात 1957 पासून 2015 पर्यंत अवकाशातील कचरा कसा वाढत गेला हे दाखवले आहे. रशियाने 1957 मध्ये स्पुटनिक हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला तेव्हापासून अवकाशात कचरा निर्माण होण्यास सुरुवात झाली होती.
 • अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार अवकाश कचऱ्याचे वीस हजार तुकडे असून त्यात अग्निबाणांचे सुटे भाग, निकामी उपग्रह व इतर वस्तूंचा समावेश आहे त्यांचा आकार सॉफ्टबॉलपेक्षा जास्त आहे.

महिलांना मदतीसाठी संपूर्ण भारतभरात एकच क्रमांक :

 • मोबाइल फोनमध्ये स्त्रियांच्या सुरक्षितेतेसाठी इशारा देणारी यंत्रणा बसवण्यास मोबाइल कंपन्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या महिला आता मोबाइलवरील संकटमोचक बटण दाबून मदत मागू शकतील, असे केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी सांगितले.
 • पुढील वर्षांत मार्चपासून असे मोबाइलमध्ये अशी यंत्रणा उपलब्ध केली जाणार आहे. याबाबत अनिवार्य र्निबध दूरसंचार खाते लागू करणार आहे.
 • मोबाइल उत्पादकांशी चर्चा करून ही यंत्रणा बसवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेसाठी आम्हाल एक वर्ष लागले व आता नवीन व जुन्या फोनमध्येही ही सुविधा देता येणार आहे.
 • महिला संकटात असेल तर तिने हे बटण दाबल्यास पोलिसांना संदेश जाणार आहे. हे बटण असलेले नवीन फोन मिळणे सुरू झाल्यावर जुन्या फोनमध्येही ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
 • त्यासाठी किमान 10 हजार केंद्रे सुरू केली जातील.
 • तसेच मोबाइलमध्ये या बटणाची सुविधा देण्यात येईल. नवीन व जुन्या फोनमध्ये ही सुविधा करण्यासाठी कंपन्या तांत्रिक पातळीवर प्रयत्न करीत आहेत.
 • महिलांना मदतीसाठी संपूर्ण भारतभरात एकच क्रमांक उपलब्ध केला जाणार आहे, त्यामुळे पोलिस, विधी, वैद्यकीय व समुपदेशन केंद्रांना हिंसापीडित महिलेचा संदेश जाणार आहे.

दिनविशेष :

 • 1803 : अंजनगाव-सुर्जी येथे इंग्रज व शिंदे यांच्यात तह.Dinvishesh
 • 1879 : भारतीय तत्वज्ञानी रमन महर्षि यांचा जन्म.
 • 1906 : ढाक्याचे नबाब सलीमुल्ला खान यांनी मुस्लीम लीगची स्थापना केली.
 • 1943 : पोर्ट ब्लेअर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा ध्वज फडकावला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.