Current Affairs of 3 September 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (3 सप्टेंबर 2015)

चालू घडामोडी (3 सप्टेंबर 2015)

कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबविण्यात येणार :

 • भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या नावे कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबविण्यात येणार असून त्याचे स्वरूप राज्य शासनाने जाहीर केले.
 • त्यानुसार उद्योगांच्या गरजांनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.
 • या अभियानांतर्गत दरवर्षी 45 लाख कौशल्य मनुष्यबळ निर्मिती करण्यात येईल, असा सरकारचा दावा आहे.
 • या अभियानाला पूरक असे विद्यापीठ उभारण्याचा मानसही सरकारने जाहीर केला आहे.
 • तसेच या कार्यक्रमासाठी विविध उद्योग समूहांचा सहभाग घेण्यात येणार आहे.
 • अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कौशल्य विकास शिखर परिषद कार्यरत राहील.
 • राज्यस्तरीय कौशल्य विकास कार्यकारी समितीही स्थापन करण्यात येणार आहे.
 • या संदर्भात विविध प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती असेल.
 • अंमलबजावणीसाठी यंदा 161 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठीची मुदतवाढ :

 • आर्थिक वर्ष 2014-2015 साठी प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्‍स रिटर्न) भरण्यासाठीची मुदत 7 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
 • ही मुदत वाढविण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयाने घेतला असून, आज याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली.
 • विवरणपत्र (आयटीआर) भरण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2015 ही शेवटची अंतिम मुदत होती.
 • ज्या व्यक्तींचे वार्षिक उलाढाल एक कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे अशा व्यक्तींनी लेखापरीक्षण (ऑडिट) करणे बंधनकारक आहे.
 • तसेच नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना इन्कम टॅक्‍स रिटर्न भरणे बंधनकारक आहे.

एक हजार रुपयांच्या चलनी नोटा सादर करण्याचा निर्णय :

 • रिझर्व्ह बॅंकेने नव्या सुरक्षा मानकांसह एक हजार रुपयांच्या चलनी नोटा सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • नव्या एक हजाराच्या नोटेवर रुपयाच्या चिन्हाच्या आत ‘एल'(L) हे अक्षर छापण्यात येणार आहे.
 • तसेच नंबर पॅनेलवरील आकड्यांची चढत्या क्रमाने मांडणी करण्यात येणार आहे.
 • यामुळे नवीन नोट अधिक सुरक्षित होणार आहे.
 • यापूर्वी 500 रुपयांच्या चलनी नोटा सुरक्षा मानकांसह मर्यादित स्वरूपात छापण्यात आल्या आहे.
 • बनावट नोटा तयार होण्याच्या प्रक्रियेला आळा घालण्यासाठी अंकांची मांडणी चढत्या क्रमाने करण्यात येणार आहे.

तीन दिवसांची आंतरराष्ट्रीय हिंदी परिषद आयोजित :

 • भोपाळमध्ये 10 ते 12 सप्टेंबर दरम्यान तीन दिवसांची आंतरराष्ट्रीय हिंदी परिषद आयोजित करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेचे उद्घाटन करणार आहेत.
 • जागतिक पातळीवर हिंदी भाषा लोकप्रिय करणे, हा या परिषदेचा उद्देश असून त्यामध्ये 27 देशांचे प्रतिनिधी आणि भारतातील विद्वान सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
 • मध्यप्रदेश सरकारच्या सहकार्याने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ही परिषद आयोजित केली असून ‘हिंदी जगत : विस्तार एवम् संभवनाए’ अशी परिषदेची संकल्पना आहे.
 • गुगल आणि आयफोन बनविणाऱ्या कंपन्या परिषदेतील प्रदर्शनास सहभागी होऊन हिंदी भाषा लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
 • या परिषदेच्या समारोपप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि महानायक अमिताभ बच्चन यांची भाषणे होणार आहेत.
 • परिषदेत हिंदी भाषेबद्दल एकूण 28 परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहेत.
 • अमिताभ बच्चन चित्रपटांमधून हिंदी भाषेचा प्रचार करण्याची प्रेरणा आहेत त्यामुळे ते ‘आओ अच्छी हिंदी बोले’ या विषयावर भाषण करणार आहेत.

डॉ. श्रीकर परदेशी यांना संचालकपदी पदोन्नती :

 • महाराष्ट्रातून एप्रिल महिन्यात पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) बढती मिळालेले सनदी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांना अवघ्या चार महिन्यांत संचालकपदी पदोन्नती मिळाली आहे.
 • ‘पीएमओ’मध्ये सामान्यतः पाच संचालक असतात. मात्र याला अपवाद करताना डॉ. परदेशी धरून आता ही संख्या सहा वर पोचली आहे.
 • पिंपरी-चिंचवड व पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी लक्षणीय काम करणारे डॉ. परदेशी यांना दहा एप्रिलपासून ‘पीएमओ’मध्ये उपसचिव म्हणून खास बोलावून घेण्यात आले होते.
 • 2001 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले परदेशी यांच्याकडे केंद्राच्या नऊ मंत्रालयांच्या समन्वय व संवादाची जबाबदारी आहे.
 • विशेषतः सामाजिक क्षेत्राशी संबंधित मंत्रालयांचे विविध विषय हाताळण्याचे काम त्यांच्याकडे देण्यात आले आहे. यात ग्रामविकास, अल्पसंख्याक, समाजकल्याण, आरोग्य, महिला व बालकल्याण आदी मंत्रालयांचा समावेश आहे.

एन. रामचंद्रन यांचा पुरस्कार दिल्ली हायकोर्टाने केला रद्द :

 • भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष एन. रामचंद्रन यांना 2011 चा देण्यात आलेला राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार दिल्ली हायकोर्टाने रद्द केला आहे.
 • योग्य चौकशी आणि प्रक्रिया विचारात न घेताच या पुरस्कारावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते असे कोर्टाने म्हटले आहे.
 • येत्या चार आठवड्यात क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि तामिळनाडू क्रीडा विकास प्राधिकरणाने आदेश काढून हा पुरस्कार रद्द करावा असे आदेश कोर्टाने दिले आहेत.
 • 2016 च्या पुरस्कारांसाठी आघाडीच्या क्रीडापटूंचा समावेश निवड समितीत करावा अशी सूचनाही कोर्टाने केली आहे.
 • 2009 मध्ये क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाने क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्था, कंपन्या यांच्यासाठी हा पुरस्कार सुरू केला.
 • रामचंद्रन यांना क्रीडा अकादमीच्या व्यवस्थापनासाठीचा पुरस्कार सरकारतर्फे देण्यात आला होता.
 • कोर्टाने यासंदर्भात असे नमूद केले की, रामचंद्रन यांचे योगदान काय याचा गांभीर्याने विचार न करताच सरकारने त्यांना हा पुरस्कार देऊ केला.
 • निवड समितीच्या शिफारशींनुसार करण्यात आलेल्या या निवडीचे म्हणूनच समर्थन करता येत नाही.

कसोटी मालिकेचे ‘दी महात्मा गांधी-नेल्सन मंडेला सिरीज’ नामकरण :

 • भारत व दक्षिण आफ्रिकेदरम्यान खेळविल्या जाणाऱ्या आगामी कसोटी मालिकेचे नामकरण ‘दी महात्मा गांधी-नेल्सन मंडेला सिरीज’ असे करण्यात आले आहे.
 • भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने यासंदर्भातील घोषणा केली आहे.
 • महात्मा गांधी व नेल्सन मंडेला यांना समर्पित करण्यात आलेल्या ‘फ्रीडम करंडका’साठी ही मालिका खेळविण्यात येईल.
 • स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा हे भारत व दक्षिण आफ्रिका या दोन देशांमधील समान सूत्र आहे.
 • अहिंसा व असहकाराच्या आयुधांच्या सहाय्याने महात्मा गांधी व नेल्सन मंडेला यांनी भारत व दक्षिण आफ्रिकेस स्वातंत्र्य मिळवून दिले.
 • त्यांच्या या प्रकाशमान वाटचालीमधून संपूर्ण जगाने प्रेरणा घेतली.
 • या पार्श्वभूमीवर, या दोन देशांसाठी पथदर्शक व्यक्तिमत्त्वे असलेल्या महात्मा व मदिबा यांना हा करंडक समर्पित करण्यात आला आहे.

कर्जबाजारी देशांमध्ये भारताचा 35वा क्रमांक :

 • सकल देशांतर्गत उत्पादनाच्या अर्थात जीडीपीच्या तुलनेत प्रत्येक देशावर किती टक्के कर्ज आहे, याचा आढावा फोर्ब्ज नियतकालिकाने घेतला असून त्यात अशा कर्जबाजारी देशांमध्ये भारताचा 35वा क्रमांक लागला आहे.
 • कर्जाची टक्केवारी जीडीपीच्या तुलनेत सर्वाधिक असणाऱ्या देशांमध्ये जपानचा प्रथम क्रमांक लागला आहे.
 • जपान हा ग्रीसपेक्षाही कर्जबाजारी असला तरी त्याची निर्यात सक्षम असल्याने त्याच्यावर ग्रीससारखी दिवाळखोरीची वेळ आलेली नाही, असे निरीक्षण फोर्ब्जने नोंदवले आहे.
 • या सर्वेक्षणानुसार सर्वाधिक कर्ज असलेले देश या आजमितीला सर्वात श्रीमंत देश समजले जात आहेत, याकडेही फोर्ब्जने लक्ष वेधले आहे.
 • कर्जबाजारी देशांमध्ये अमेरिका (यूएसए), चीन व रशिया अनुक्रमे 16, 22 व 43व्या क्रमांकावर आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.