Current Affairs of 2 September 2015 For MPSC Exams

Current Affairs 2 Sep 2015

चालू घडामोडी (2 सप्टेंबर 2015)

अजीम नवाज राही यांची प्रशासकीय सदस्यपदी नियुक्ती :

  • महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या प्रशासकीय सदस्यपदी प्रख्यात कवी अजीम नवाज राही यांची सोमवारी नियुक्ती करण्यात आली.
  • राज्य शासनाने घोषित केलेल्या या 15 सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी अल्पसख्याक विकास मंत्री एकनाथराव खडसे हे असून, अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री हे उपाध्यक्ष आहेत.
  • या समितीमध्ये राही यांचा समावेश झाल्याने बुलडाणा जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्राचा गौरव झाला आहे.
  • व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातील एकांत या कविता संग्रहाने राज्यभर नावाजलेल्या राही यांच्या कविता अमरावती, उत्तर महाराष्ट्र गोंडवाना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभ्यासाला आहेत हे विशेष.

बिरदीचंद रामचंद्र नहार यांचे निधन :

  • भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशनचे माजी संचालक बिरदीचंद रामचंद्र नहार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
  • नाशिक अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
  • वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी येथील मूळ रहिवासी असलेल्या बिरदीचंद नहार यांनी नाशिकमध्ये हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून पाऊल ठेवले.
  • भाजपाच्या शहर व ग्रामीण कार्यकारिणीत त्यांनी अनेक वर्षे कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली.
  • डॉ. गुप्ते यांच्या काळात भूतपूर्व नगरपालिकेत ते स्वीकृत नगरसेवक होते.
  • महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालक, रविवार कारंजावरील जैन स्थानकचे विश्वस्त, जैन बोर्डिंगचे उपाध्यक्ष, निमाणी मंगल कार्यालयाचे पदाधिकारी आदी पदेही त्यांनी भूषविली.
  • याशिवाय क्रिमिका आइस्क्रीम, हॉटेल सुरेश प्लाझा, नहार डेव्हलपर्सचेही ते संस्थापक होते.

मदरशांवर राष्ट्रध्वज फडकाविण्यात येईल :

  • प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राज्यातील सर्व मदरशांवर राष्ट्रध्वज फडकाविण्यात येईल याची राज्य सरकारने खबरदारी घ्यावी, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.
  • मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्या. यशवंत वर्मा यांच्या पीठाने सदर आदेश दिला.
  • अलिगढ येथील रहिवासी अरुण गौर यांनी केलेल्या जनहित याचिकेवर पीठाने हा आदेश दिला.
  • मदरशांमध्ये 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वज फडकाविण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश द्यावे, अशी याचिकेत विनंती करण्यात आली होती.

“गुगल”च्या लोगोचे मेकओव्हर :

  • नेटविश्‍वातील आघाडीचे सर्ज इंजिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “गुगल”च्या लोगोचे मेकओव्हर करण्यात आले असून, हा लोगो अधिक उठावदार बनविण्यात आला आहे.
  • आता “सॅनसेरिफ” फॉंटमध्ये हा लोगो अवतरला आहे. 1997 पासून आतापर्यंत गुगलने सात वेळा लोगो बदलला आहे.
  • गुगलने सर्वप्रथम 1997 मध्ये आपला लोगो जगासमोर आणला.
  • त्यानंतर 1998 मध्ये लगेच त्यामध्ये बदल केला.
  • त्याचवेळी त्यांनी गुगलच्या लोगोमध्ये अवतरण चिन्हाचा समावेश केला.
  • मात्र, 1999 मध्ये लगेच गुगलने लोगो बदलून त्यातून अवतरण चिन्ह हटविले.
  • त्यानंतर आतापर्यंत दोन किंवा तीन वर्षांच्या अंतराने लोगो बदलण्यात आले आहेत.

‘अॅग्रोवन स्मार्ट व्हिलेज’ हा उपक्रम राबवण्यात येणार :

  • महाराष्ट्रातील निवडक पाच गावांमध्ये इस्राईलमधील कंपन्यांच्या सहकार्याने ‘अॅग्रोवन स्मार्ट व्हिलेज’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
  • शेतकऱ्याला स्वाभिमानाने आणि सन्मानाने स्वतःच्या पायावर उभा करणारा, समृद्धीच्या वाटेवर नेणारा, आधुनिक जगाशी जोडणारा हा अनोखा प्रकल्प आहे.
  • वीज, पाणी, रस्त्यांसह इंटरनेट आदी सुविधा खेड्यांनाही मिळायला हव्यात,सारी कामे पारदर्शकपणे ऑनलाइन व्हायला हवीत.  
  • म्हणूनच शेती आणि शेतकरी मजबूत करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उिद्दष्ट आहे, वेगळेपण आहे.
  • ‘अॅग्रोवन’ आणि ‘व्हायटल फंड’ यांचा संयुक्त निधी स्थापन करून शेती विकासाच्या प्रकल्पात गुंतवणूक केली जाईल. हे सरकारी अनुदान असणार नाही.
  • प्रस्तावांची छाननी केली जाईल. प्राथमिक टप्प्यात निवड झालेल्या गावांची पाहणी करून अंतिम निवड केली जाईल.
  • प्रकल्पामध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे ‘तनिष्का’ गट असलेल्या गावांना प्राधान्य दिले जाईल.
  • गरज भासल्यास लॉटरी पद्धतीचा अवलंब केला जाईल.

“इसिस‘ या दहशतवादी संघटनेने  केले स्वत:चे चलन प्रसिद्ध :

  • संपूर्ण जगावर प्रभुत्व मिळविण्याच्या ईर्षेने झपाटलेल्या “इसिस” या दहशतवादी संघटनेने आज स्वत:चे चलन प्रसिद्ध केले.
  • सोने, चांदी आणि तांबे या धातूंचा वापर करून वेगवेगळ्या किमतीचे चलन तयार केल्याचा व्हिडिओ “इसिस”ने प्रसिद्ध केला आहे.
  • “इसिस”ने सोन्यापासून बनविलेले दिनार, चांदीपासून दिऱ्हाम आणि तांब्यापासून फुलुस असे चलनप्रकार तयार केले आहेत.
  • या चलनाचा वापर करून गुलामगिरीचे आणि अन्यायाचे प्रतीक असलेली अमेरिकेची भांडवलशाही यंत्रणा मोडून काढण्याची दर्पोक्तीही केली आहे.
  • “इसिस”चा एक दिनार 21 कॅरेट सोन्याचा असून त्याची किंमत 139 अमेरिकी डॉलर किंवा 91 पौंड इतकी आहे.
  • त्याचे वजन 4.25 ग्रॅम आहे.

उच्चस्तरीय समितीची शिफारस केंद्र सरकारने केली मान्य :

  • भारतात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या विदेशातील संस्थात्मक गुंतवणूकदारांवर पूर्वलक्ष्यी प्रभावाने किमान पर्यायी कर (मिनीमम अल्टरनेट टॅक्‍स-मॅट) न लावण्याची उच्चस्तरीय समितीची शिफारस केंद्र सरकारने मान्य केली आहे.
  • कायदा आयोगाचे अध्यक्ष न्या. ए. पी. शहा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने “मॅट” लागू करण्याबाबतचा आपला अंतिम अहवाल सादर केल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सांगितले.
  • या अहवालातील शिफारशींनुसार प्राप्तिकर कायद्यामध्ये हिवाळी अधिवेशनात दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू, असेही जेटली यांनी सांगितले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.