Current Affairs of 1 September 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (1 सप्टेंबर 2015)
तिमाहीतील विकासदर सात टक्के इतका :
- कृषी, सेवा आणि उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रांची कामगिरी खराब झाल्यामुळे एप्रिल ते जून या तिमाहीतील एकूण देशांतर्गत उत्पादनावर (जीडीपी) परिणाम झाला आहे.
- या तिमाहीतील विकासदर सात टक्के इतका राहिला.
- त्याच्या आधीच्या तिमाहीत हाच विकासदर 7.5 टक्के इतका होता.
- विकासदराचा वेग मंदावल्यामुळे आणि औद्योगिक उत्पादनातही घट झाल्यामुळे रिझर्व्ह बॅंक व्याजदरांत कपात करू शकते, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
Must Read (नक्की वाचा):
संथारा निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती :
- पूर्वापार चालत आलेल्या संथारा किंवा संलेखना (मृत्यूपर्यंत उपवास) या धार्मिक व्रताला बेकायदेशीर ठरविणाऱ्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती देण्यात आली आहे.
- या व्रताला बेकायदेशीर ठरविण्यात आल्यानंतर जैन धर्मीयांनी देशभर आंदोलन चालवतानाच कायदेशीर लढ्याचा मार्ग अवलंबला होता.
- सरन्यायाधीश एच.एल. दत्तू आणि न्या. अमिताव रॉय यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला केंद्र आणि राजस्थान सरकारला नोटीस जारी केली आहे.
- उच्च न्यायालयाचा निर्णय चार वर्षे स्थगित ठेवला जाऊ शकतो किंवा सुनावणीपर्यंत हे प्रकरण स्थगित राहील.
डॉ. श्रीकर परदेशी यांची संचालकपदी पदोन्नती :
- महाराष्ट्रातून एप्रिल महिन्यात पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) बढती मिळालेले सनदी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांना अवघ्या चार महिन्यांत संचालकपदी पदोन्नती मिळाली आहे.
- “पीएमओ”मध्ये सामान्यतः पाच संचालक असतात. मात्र याला अपवाद करताना डॉ. परदेशी धरून आता ही संख्या सहा वर पोचली आहे.
- 2001 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले परदेशी यांच्याकडे केंद्राच्या नऊ मंत्रालयांच्या समन्वय व संवादाची जबाबदारी आहे.
- या मंत्रालयांच्या धोरणात्मक बाबींचे विषयही हाताळण्याचे काम त्यांच्याकडे आहे.
- विशेषतः सामाजिक क्षेत्राशी संबंधित मंत्रालयांचे विविध विषय हाताळण्याचे काम त्यांच्याकडे देण्यात आले आहे.
- यात ग्रामविकास, अल्पसंख्याक, समाजकल्याण, आरोग्य, महिला व बालकल्याण आदी मंत्रालयांचा समावेश आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय समितीची बैठक दोन ते चार सप्टेंबरदरम्यान :
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय समितीची महत्त्वाची बैठक सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह मुख्य संघनेत्यांच्या हजेरीत येत्या दोन ते चार सप्टेंबरदरम्यान येथे होणार आहे.
- संघाने मात्र संघाच्या कार्यकक्षेतील साऱ्याच म्हणजे सुमारे 36 संघटनांची ही नियमित स्वरूपाची बैठक आहे.
- येत्या दोन ते चार सप्टेंबर या काळात ही बैठक होणार असून यात संघाचे 93 वरिष्ठ व मुख्य प्रतिनिधी आणि 15 विशेष प्रतिनिधी सहभागी होतील.
संजीव चतुर्वेदी आणि अंशू गुप्ता यांना मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित :
- भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे भारतीय सनदी अधिकारी संजीव चतुर्वेदी आणि ग्रामीण भागातील महिलांच्या प्रश्नावर अखंड कार्य करणारे अंशू गुप्ता यांना आज मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- मॅगसेसे पुरस्कार हा आशियातील नोबेल पुरस्कार म्हणूनही गणला जातो.
फिलिपीनचे राष्ट्रपती बेनिग्नो सिमोन कोजुआंग्वो एक्विनो यांनी सुवर्णपदक देऊन चतुर्वेदी आणि गुप्ता यांचा सन्मान केला.
- संजीव चतुर्वेदी हे 2002 च्या आयएफएस बॅचचे अधिकारी आहेत.
- अंशू गुप्ता यांनी 1999 मध्ये 27 व्या वर्षी कॉर्पोरेट सेक्टरमधील नोकरीवर पाणी सोडत गुंज ही संस्था स्थापन केली.
ज्येष्ठ सनदी अधिकारी राजीव मेहरिषी यांची नियुक्ती :
- केंद्रीय गृहसचिव एल. सी. गोयल यांनी वैयक्तिक कारणास्तव स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याचे जाहीर केल्यावर केंद्र सरकारने त्यांच्या जागी सोमवारी तातडीने ज्येष्ठ सनदी अधिकारी राजीव मेहरिषी यांची नियुक्ती केली.
- मेहरिषी हे सोमवार सेवानिवृत्त होणार होते, मात्र त्यांच्या नियुक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिली.
दिनविशेष :
- लिब्या क्रांती दिन
- रशिया ज्ञान दिन
- सिंगापुर शिक्षक दिन
- स्लोव्हेकिया संविधान दिन
- उझबेकिस्तान स्वातंत्र्य दिन
- 1897 : बॉस्टन सबवेचे उद्घाटन.
- 1911 : गायनाचार्य पंडित भास्करबुवा बखले यांनी पुणे येथे ‘भारत गायन समाज’ या संस्थेची स्थापना केली.
- 1914 : सेंट पीटर्सबर्गचे नाव बदलून पेट्रोग्राड करण्यात आले.
- 1947 : भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
- 1979 : पायोनियर 11 हे अंतराळयान शनीपासून 21,000 किमी अंतरावरुन गेले.
- 1991 : उझबेकिस्तानने रशियापासून स्वातंत्र्य जाहीर केले.