Current Affairs of 3 May 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (3 मे 2017)

चालू घडामोडी (3 मे 2017)

आंतरराष्ट्रीय हापकिडो बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याला दोन सुवर्णपदके :

  • भूतान येथे 30 एप्रिल रोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय हापकिडो बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अकोला युथ कराटे अ‍ॅण्ड सेल्फ डिफेन्स क्लबच्या खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत दोन सुवर्णपदके पटकावले.
  • प्रियंका इंगळेसाहिल गोखले यांनी आपापल्या वजनगटात सर्वोत्तम कामगिरी करीत सुवर्णपदक पटकाविले.
  • प्रियंकासाहिलची फ्लोरिडा (यूएसए) येथे 1213 ऑगस्ट रोजी होणाऱ्या विश्व चॅम्पियनशिपकरिता याच स्पर्धेतून निवड करण्यात आली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 मे 2017)

गाळमुक्त धरण अन् गाळयुक्त शिवार योजना :

  • राज्यातील धरणे व जलसाठ्याच्या साठवण क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने तसेच धरणांमधील गाळ काढून तो शेतांमध्ये वापरण्याची तरतूद असलेली गाळमुक्त धरणगाळयुक्त शिवार योजना राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
  • लघु पाटबंधारे तलाव, साठवण तलाव, गाव तलाव, पाझर तलाव व विदर्भातील माजी मालगुजारी तलाव मिळून 31 हजार 459 जलसाठ्यांमधील गाळ काढण्यात येईल.
  • तसेच त्यांची साठवण क्षमता ही 42.54 लक्ष घनमीटर असून सिंचन क्षमता 8 लाख 68 हजार हेक्टर आहे.

कोकणात प्रथमच ‘पितांबरी’चा सेंद्रिय गूळ प्रकल्प :

  • कोकणात प्रथमच साकारलेल्या पितांबरी कंपनीच्या सेंद्रिय गूळनिर्मिती प्रकल्पाचे उद्‌घाटन नुकतेच राजापूरच्या तळवडे गावात कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव यांच्या हस्ते झाले.
  • पितांबरी प्रॉडक्‍ट्‌सचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभूदेसाई, अरविंद नानिवडेकर, ऍग्रिकेअर विभागाचे सुहास प्रभूदेसाई, शेतकरी व ग्रामस्थ आदि उपस्थित होते.
  • पितांबरी कंपनीच्या वतीने कोकणातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन सेंद्रिय गूळनिर्मिती प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे.
  • ऊस लागवडीतून परिसरातील शेतकऱ्यांना रोजगार मिळाला आहे. या प्रकल्पामुळे कंपनीमध्ये 60 ते 70 कामगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
  • सुमारे दोन हजार टन उसाचे गाळप होणार असून, त्यासाठी 200 टन सेंद्रिय गुळाचे उत्पादन होणार आहे. या प्रकल्पामध्ये गूळ पावडर, गूळ ढेप, काकवी व इतर विविध पदार्थ बनवण्यात येणार आहेत.

दिनविशेष :

  • 3 मे हा आंतरराष्ट्रीय सूर्य दिन आहे.
  • 3 मे हा जागतिक श्वसनदाह निवारण दिन आहे.
  • मराठी चित्रपट दिग्दर्शक व चित्रपट महर्षी ‘भालजी पेंढारकर’ यांचा जन्म 3 मे 1898 मध्ये झाले.
  • ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय चित्रपट मुंबईत 3 मे 1913 रोजी प्रदर्शित झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 मे 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.