Current Affairs of 6 May 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (6 मे 2017)
भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण :
- चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. मोबाईल कंपनी ‘ओप्पो’ कंपनी भारतीय संघाची प्रायोजक आहे.
- चॅम्पियन करंडक स्पर्धेत सहभागी होण्याबाबत भारतीय संघाचा अद्याप निर्णय झालेला नाही. त्यापूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सीईओ राहुल जोहरी यांनी नव्या जर्सीचे अनावरण केले.
- मर्यादित षटकांच्या सामन्यात भारतीय संघ परिधान करत असलेल्या जर्सीप्रमाणेच ही जर्सी आहे. मात्र, त्यावर ‘ओप्पो’चा लोगो असणार आहे.
- ‘ओप्पो’कडून प्रायोजकत्वासाठी बीसीसीआयबरोबर पाच वर्षांसाठी 1,079 कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे.
- सध्या भारतीय संघाचे प्रायोजक असलेल्या स्टार इंडियाने पुन्हा बोली लावण्यास नकार दिल्याने नवा प्रायोजक शोधण्यात आला.
Must Read (नक्की वाचा):
महाराष्ट्र विधिमंडळ आणि न्यू साऊथ वेल्स संसद यांच्यात सामंजस्य करार :
- महाराष्ट्र विधिमंडळ आणि न्यू साऊथ वेल्स संसद (ऑस्ट्रेलिया) यांच्यात संसदीय सामंजस्य करार करण्यात आला.
- तसेच या ऐतिहासिक करारावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तर न्यू साऊथ वेल्स संसदेच्या (ऑस्ट्रेलिया) वतीने न्यू साऊथ वेल्स कौन्सिलचे सभापती जॉन अजाका आणि विधिमंडळ अध्यक्षा श्रीमती शेली हँकॉक यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
- विधिमंडळाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ सध्या आस्ट्रेलिया, न्यूझीलंड व सिंगापूर या देशांच्या अभ्यास दौऱ्यावर आहे. या शिष्टमंडळाने ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स संसदेस भेट दिली. या वेळी सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील न्यू साऊथ वेल्स संसदेच्या प्रेस्टिन सभागृहामध्ये सामंजस्य करार झाला.
धुळ्याचे डॉ. वाघ यांचा जगातील अव्वल डॉक्टरांमध्ये समावेश :
- धुळे येथील डॉ. अमोल नानासाहेब वाघ यांनी जगातील अव्वल डॉक्टरांमध्ये आपले स्थान पटकाविले आहे.
- मुंबईतील जे.जे. रुग्णालयातील सहा डॉक्टरांच्या पथकाला सलग दुसऱ्या वर्षी जागतिक शस्रक्रिया सेमिनार वजा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला.
- तसेच या पथकात डॉ. अमोल वाघ यांची संशोधन शस्रक्रिया विशेष उल्लेखनीय ठरली आहे. दरम्यान, हे पथक नंदुरबार येथे नुकत्याच झालेल्या महाआरोग्य शिबिरातही सहभागी झाले होते.
- अमेरिकेतील सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोटेस्टिनल ॲण्ड एन्डोस्कोपिक सर्जन (सेजेस) ही संस्था दर वर्षी ही स्पर्धा घेते. जगभरातील दीडशे देशांतील डॉक्टर त्यात भाग घेतात.
दक्षिण आशिया दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण :
- सहकार्याची मनापासून इच्छा असली तर त्याला सीमाच नसते. भारताने दक्षिण आशिया दळणवळण उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करून विभागीय सहकार्यासाठी आकाश ठेंगणे असल्याचा प्रत्यय देत सहकार्याला नवीन आयाम दिला. शेजारच्या दक्षिण आशियायी देशांना भारताने दिलेली बहुमूल्य भेट होय.
- भारतीय अंतराळ संशोधन केंद्राने (इस्रो) तयार केलेल्या जी-सॅट-9 (एसएएस) या उपग्रहाचे भारतीय बनवाटीच्या क्रायोजेनिक इंजिनसज्ज जीएसएलव्ही-एफओ-9 द्वारे प्रक्षेपण केले.
- आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून 5 मे रोजी सायंकाळी 4.57 वाजता या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
- तसेच या उपग्रहाला पाठकुळी सवारी (रोड पिग्गीबॅक) असेही म्हटले जाते. हा उपग्रह अचूकपणे भूस्थिर कक्षेत प्रस्थापित करण्यातही यश आले आहे.
दिनविशेष :
- माननीय ‘मोतीलाल नेहरु’ यांचा जन्म 6 मे 1861 मध्ये झाला.
- 6 मे 1922 हा कोल्हापूरचे राजर्षी ‘छत्रपती शाहू महाराज’ यांचा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा