Current Affairs of 2 May 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (2 मे 2017)
‘वन-डे’ क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानी :
- इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरण्याच्या वेस्ट इंडीजच्या आशांना आणखी धक्का बसला आहे.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रिकेटमधील ताज्या क्रमवारीत वेस्ट इंडीज नवव्या क्रमांकावर आहे आणि आठव्या क्रमांकावरील पाकिस्तानपेक्षा त्यांचे नऊ गुण कमी आहेत. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत क्रमवारीतील पहिल्या आठ संघच 2019 मधील विश्वकरंडक स्पर्धेसाठी थेट पात्र असतील. या क्रमवारीत सध्या भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- आगामी विश्वकरंडक स्पर्धेसाठीच्या पात्रतेसाठी ‘आयसीसी’ने 30 सप्टेंबर ही ‘डेडलाईन’ निश्चित केली आहे.
- तसेच त्यामुळे आता पुढील चार महिन्यांत नियोजित एकदिवसीय सामन्यांमध्ये शक्य तितके जास्त गुण मिळविण्याचा प्रयत्न वेस्ट इंडीजला करावे लागतील.
- अन्यथा इंग्लंडमधील स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी त्यांना पात्रता स्पर्धेत खेळावे लागू शकते.
Must Read (नक्की वाचा):
‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’मध्ये विद्यार्थ्यांच्या सरस कल्पना :
- ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ कार्यक्रमात राज्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र, वाहतूक व्यवस्थेचे एकात्मिकरण, नागरिकांचा प्रशासनातील सहभाग, घनकचरा व्यवस्थापन एकूण अकरा विषयांवर सादरीकरण केले. या सादरीकरणातील सूचनांचा उपयोग राज्य शासन आपल्या विविध योजनात करणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
- वरळी येथील एनएससीआयच्या आवारात ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ अंतर्गत ‘अँक्शन फॉर कलेक्टिव्ह ट्रान्फॉर्मेशन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
- तसेच या कार्यक्रमात सुमारे सहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ‘व्हिजन महाराष्ट्र 2025’ या विषयावर संवाद साधला.
- ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ची सुरवात करताना एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये विविध महाविद्यालयांच्या अकरा संघांची अंतिम फेरीत निवड झाली होती.
- या अकरा संघांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या समोर आपल्या उपाय योजनांचे सादरीकरण केले. तसेच या स्पर्धेतील विजेत्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
2020 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार :
- आतापर्यंत जलयुक्त शिवार योजनेतून 5 हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. पुढील वर्षी 11 हजार व 2020 पर्यंत पूर्ण राज्य दुष्काळमुक्त करण्यात येणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेरूळ येथील कार्यक्रमात दिली.
- गुरूदेवजींच्या प्रोत्साहनामुळे शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून भरीव कार्य झाले आहे.
- निसर्गाचे शोषण झाल्याने सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वार्थामुळे निसर्गाचे आपण शोषण केले आहे. त्यामुळेच आता निसर्गाने आपल्याला देणे बंद केले आहे. यासाठी आता निसर्गाला देण्याची वेळ आली आहे.
- जगाला पू. गुरूदेवजींनी भारतीय संस्कृती व विचारांची नव्याने ओळख करून दिल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
दहशतवादविरोधी लढय़ात भारताला तुर्कस्तानचा पाठिंबा :
- तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसीप तय्यीम एर्दोगन यांनी 1 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विविध विषयांवर व्यापक चर्चा केली आणि दहशतवादाविरोधातील लढय़ात तुर्कस्तानचा भारताला पूर्ण पाठिंबा असल्याचे आश्वासन दिले. दहशतवाद हा दोन्ही देशांसाठी काळजीचा प्रश्न असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
- कोणताही हेतू, उद्दिष्ट, कारण अथवा तर्क दहशतवादाचे समर्थन करू शकत नाही, असे मोदी यांनी एर्दोगन यांच्यासमवेत एका संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धारही व्यक्त केला.
- मोदी आणि एर्दोगन यांच्यातील भेटीनंतर दोन्ही देशांनी तीन करार केले असून त्यामध्ये दूरसंचाराबाबतच्या कराराचाही समावेश आहे. तुर्कस्तानचे अध्यक्ष दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा