Current Affairs of 1 May 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (1 मे 2017)

चालू घडामोडी (1 मे 2017)

सुमित कुमार ठरला हिंदकेसरी :

 • श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत किताबाच्या अंतिम लढतीत एनसीआरच्या सुमितने महाराष्ट्राच्या अभिजित कटकेला 9-2 गुणांनी पराभूत करून हिंदू केसरीची गदा आणि रोख अडीच लाख रुपये जिंकले. अभिजितला दीड लाखावर समाधान मानावे लागले.
 • विजेतेपदाच्या लढतीत सुमितने आपल्या आंतरराष्ट्रीयस्तराचा अनुभव पणाला लावत अभिजितला सुरुवातीपासून आक्रमणाची संधी न देता एकेरी पट, लपेट दस्ती ही डाव करीत आपले गुणांचे खाते पहिल्या फेरीतच 4-2 ने आघाडी घेऊन अभिजितच्या विजयाचा मार्ग खडतर करून ठेवला.
 • तसेच दोघेही उंचीने सारखे असल्यामुळे अभिजितच्या डावांवर प्रतिडाव करीत सुमित दुसऱ्या फेरीतही सरस ठरला. 7-7 मिनिटांच्या दोन फेऱ्या अखेर सुमित 9-2 गुणांनी हिंदकेसरी किताबाचा मानकरी ठरला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 एप्रिल 2017)

54 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा :

 • 54 व्या राज्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांवर दशक्रिया सिनेमाने आपली छाप पाडली आहे.
 • ‘दशक्रिया’ सिनेमाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कारासहीत अनेक पुरस्कार पटकावले आहेत.
 • बबन अडागळे (एक अलबेला), अमन विधाते (डॉ. रखमाबाई राऊत) या चित्रपाटासाठी उत्कृष्ट कलादिग्दर्शन कै. साहेबमामाऊर्फ फत्तेलाल पारितोषिक, 50,000 रुपये व मानचिन्ह त्यांना जाहीर करण्यात आले.  
 • तसेच उत्कृष्ट बालकलाकारसाठी आर्य आढाव (दशक्रिया) आणि ओंकार घाडी (कासव) यांना कै. गजानन जहागिरदार पुरस्कार, 50,000 रुपये व मानचिन्ह जाहीर करण्यात आले.  
 • सर्वोत्कृष्ट पटकथा – संजय कृष्णाजी पाटील (दशक्रिया)
 • सर्वोत्कृष्ट संगीत – अमितराज  (दशक्रिया)
 • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – स्वप्नील (दशक्रिया)
 • सर्वोत्कृष्ट कथा – राहुल चौधरी  

1 मेपासून ‘रेरा’ कायद्याची अंमलबजावणी :

 • बहुप्रतिक्षित रिअल इस्टेट कायद्याची (रेरा) 1 मेपासून अंमलबजावणी होत असून देशातील 13 प्रमुख राज्यांमध्ये हा लागू करण्यात येणार आहे. याबाबात अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी दिली.
 • केंद्रीय रिअल इस्टेट कायद्यातील तरतुदींनुसार राज्य सरकारने स्थावर संपदा (विनियम व विकास) अधिनियम (रेरा) कायदा अधिवेशनात मंजूर केला आहे.
 • तसेच या कायद्याची अंमलबजावणी जागतिक कामगार दिनाच्या म्हणजेच 1 मेच्या पार्श्‍वभूमीवर करण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे.
 • या कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या प्राधिकरणावरील सदस्यांची नेमणूक पुढील आठवडाभरात होणार आहे.
 • नागपूर, पुणे आणि मुंबई येथे प्राधिकरणाची कार्यालये उघडण्यात येतील. मुख्यालय मुंबईत असेल.

‘यिन’ तर्फे राज्यात ‘समर युथ समिट’चे आयोजन :

 • तारुण्य, नवप्रेरणांचा खळाळता झरा आणि ज्वलंत धमन्यांचे अविरत स्पंदन. मानाने मिरवायचा आणि काहीतरी करून दाखवण्याचा उमेदीचा काळ. शिक्षणाचा एकेक टप्पा पार करीत असतानाच समाज व देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मीही गप्प बसू देत नाही. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’चे यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क-‘यिन’ या व्यासपीठाच्या माध्यमातून राज्यात अकरा ठिकाणी 23 मे ते 12 जून 2017 पर्यंत कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नागपूर, सातारा, अकोला, पुणे, जळगाव, मुंबई, औरंगाबाद आणि नांदेडमध्ये पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सलग तीन दिवसांचे ‘चला, घडूया देशासाठी’ या नावाने ‘यिन समर युथ समिट’चे आयोजन केले आहे.
 • तरुणाईला उन्हाळ्याच्या सुटीचा सदुपयोग करून ऊर्जा देण्यासाठी व तरुणांनी स्वतःला घडवतानाच देशालाही घडवावे, या हेतूने स्वतःचा शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकास व्हावा म्हणून हे ‘समर यूथ समिट’ मोलाची भूमिका बजावणार आहेत.
 • तरुणांमधील सळसळत्या उत्साहाला दिशा देण्यासाठी ‘यिन’ राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये कार्यरत आहे.

दिनविशेष :

 • राज्यात 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात.     
 • 1 मे (1886) हा दिवस जगभर (अमेरिका सोडून) कामगार दिन म्हणून पाळला जातो.
 • स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना 1 मे 1897 रोजी केली.
 • 1 मे 1930 रोजी सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.
 • 1 मे 1960 रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये निर्माण केली गेली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 मे 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.