Current Affairs of 29 April 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (29 एप्रिल 2017)

चालू घडामोडी (29 एप्रिल 2017)

मुंबईतील आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्रमुखपदी आशुतोष डुंबरे :

 • राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला. 28 एप्रिल रोजी 137 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये 10 उपायुक्तांना बढती देण्यात आली आहे.
 • मुंबईतील आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची (इओडब्ल्यू) धुरा ठाण्यातील सहआयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर वाहतूक शाखेच्या प्रमुखपदी औरंगाबाद सहआयुक्त अमितेशकुमार व प्रशासन विभागात अर्चना त्यागी यांची बदली करण्यात आली आहे.
 • विशेष म्हणजे, पुणे जिल्ह्यातील पूर्ण टीम बदलण्यात आली आहे. गृह विभागाने 16 विशेष महानिरीक्षक, सहआयुक्त, 17 अप्पर आयुक्त व 104 उपआयुक्त, अधीक्षक, अप्पर अधीक्षक दर्जाच्या बदल्या केल्या आहेत.
 • नवी मुंबईचे पोलीस सहआयुक्त मधुकर पांडे यांची ठाण्याच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्य गुप्तवार्ता विभागातील सहआयुक्त संतोष रस्तोगी यांची बदली केली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 एप्रिल 2017)

उत्तर प्रदेशमध्ये कन्याजन्मासाठी भाग्यलक्ष्मी योजना :

 • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कन्याजन्माचे स्वागत करताना गरीब कुटुंबात मुलगी जन्माला आली की 50 हजार रुपयांचा बॉंड देण्याचे जाहीर केले. या अंतर्गत “भाग्यलक्ष्मी योजना” सुरू करण्यात येणार आहे.
 • मुलीच्या आईलाही 5100 रुपये मिळणार असून, उत्तर प्रदेश सरकारच्या महिला कल्याण विभागातर्फे यो योजनेसाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.
 • योगी सरकारने जनकल्याणाचे अनेक निर्णय घेतले. कन्याजन्माच्या स्वागताप्रमाणेच बुंदेलखंडमधील पाणी समस्या सोडविण्यासाठी केन-बेतवा जोडकालवा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याची सूचना केली आहे.
 • सरकारी योजनांमध्ये अवास्तव खर्च करू नये, अशी सूचना सिंचन विभागाला देताना निधीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे दिसल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा आदेश दिला आहे.
 • राज्यातील प्राथमिक शिक्षणामध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याने शाळांमध्ये जाऊन तपासणी करण्याचा आहेशही मुख्यमंत्र्यांनी दिला.

नव्या मोहिमेसाठी इस्रो सज्ज :

 • श्रीहरिकोटा येथून पाच मे रोजी आकाशाकडे झेपावणाऱ्या जीएसएलव्ही मोहिमेच्या प्रक्षेपणासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो सज्ज झाली आहे. या वेळी जीएसएलव्ही-एफ09 दूरसंचार उपग्रह जीएसएटी-9 अवकाशात नेणार असून, त्याचे उड्डाण दुसऱ्या लॉंच पॅडवरून होणार आहे.
 • इस्रो येत्या दोन दिवसांत जीएसएलव्ही मोहिमेच्या उड्डाणाची वेळ घोषित करेल अशी आशा आहे. जीएसएलव्ही-एफ05च्या यशानंतर तब्बल आठ महिन्यांनी जीएसएलव्हीद्वारे होणारे ही मोहीम असल्याने हिला विशेष महत्त्व आहे.
 • तसेच यापूर्वीच्या मोहिमेत उपग्रहाचे वजन हे दोन हजार दोनशे अकरा किलोग्राम होते, तर आत्ताच्या मोहिमेत दोन हजार दोनशे तीस इतक्‍या वजनाचे उपग्रह असतील, अशी माहिती देण्यात आली आहे. यंदाचे उड्डाण हे जीएसएलव्ही यानाची 11वी मोहीम असणार आहे.

पोलीस प्रशासनाची धुरा महिला अधिकाऱ्याकडे :

 • पोलीस अधिकाऱ्यांच्या ‘मेगा’ बदल्यांमध्ये मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल झाले असून सहआयुक्त अर्चना त्यागी यांच्या रूपाने खात्याचा कणा समजल्या जाणाऱ्या प्रशासनाची धुरा प्रथमच महिला अधिकाऱ्याकडे आली आहे.
 • सहआयुक्त, अप्पर आयुक्त व उपायुक्त दर्जाच्या एकूण आठ अधिकाऱ्यांच्या आयुक्तालयाबाहेर बदल्या झाल्या तर दहा नवे चेहरे आले असून त्यांना कोणती जबाबदारी सोपविली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
 • आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखा, तिघा सहआयुक्तांची अन्यत्र बदली झाली असून चौघांना अधिकाऱ्यांची अप्पर आयुक्त म्हणून बढती देण्यात आली आहे. त्यापैकी तिघांना मुंबईत पोस्टिंग मिळाले आहे.
 • मुंबई पोलीस दलात प्रशासन विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी आतापर्यंत महिलेला मिळालेली नव्हती. अर्चना त्यागी आता ती कशी सांभाळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील.

रामनाथ पोकळे जालन्याचे नवे पोलीस अधीक्षक :

 • पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांची पुणे शहर उपायुक्त पदी बदली झाली असून, त्यांच्या जागेवर पुणे सीआयडीचे अधीक्षक रामनाथ पोकळे हे रुजू होणार आहेत.
 • तर अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांची नागपूर शहर उपायुक्त म्हणून बदली झाली असून, त्यांच्या जागेवर लातूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक लता फड यांची बदली झाली आहे.

दिनविशेष :

 • नामवंत भारतीय चित्रकार ‘राजा रविवर्मा’ यांचा जन्म 29 एप्रिल 1848 मध्ये झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 मे 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.