Current Affairs of 28 April 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (28 एप्रिल 2017)
राज्यात 34 जिल्ह्यांत ‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र’ :
- राज्यस्तरीय योजनेअंतर्गत राज्यातील मुंबई आणि उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरित 34 जिल्ह्यांमध्ये गोवर्धन गोवंश सेवा केंद्र सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यासाठी अर्थ विभागाने प्रत्येक केंद्राला एक कोटी या प्रमाणे 34 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
- वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात भाकड गाई व गोवंश संगोपनासाठी गोवर्धन गोवंश रक्षा केंद्र योजना सुरू करण्याचे जाहीर केले होते. त्यास 6 एप्रिल 2017 ला मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती.
- राज्यात 4 मार्च 2015 पासून महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार संपूर्ण गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीवर प्रतिबंध करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेती व दूध यासाठी अनुत्पादक असलेल्या गोवंशीय पशुधनाच्या संख्येत वाढ होणार असून, या सर्व पशुधनाचा सांभाळ व संगोपन करणे आवश्यक झाले होते.
- तसेच याअनुषंगाने गोवंशाचा सांभाळ (भाकड गाई, अनुत्पादक/ निरुपयोगी बैल, वळू इ.) करण्यासाठी गोशाळांना अर्थसाह्य देण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
प्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना कालवश :
- ‘मेरा गाव मेरा देस’, ‘हाथ की सफाई’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘कुर्बानी’, ‘दयावान’, ‘पूरब और पश्चिम’, ‘मेरे अपने’, ‘अमर अकबर ऍन्थनी’ अशा सुपरहिट चित्रपटांतून वेगळा ठसा उमटवणारे रुबाबदार, भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे प्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना (वय 70) यांचा 27 एप्रिल रोजी निधन झाले. कर्करोगामुळे ते गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.
- गिरगाव येथील एका खासगी रुग्णालयात विनोद खन्ना यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत अधूनमधून सुधारणाही होत होती. देखणा, रुबाबदार अभिनेता हरपला, अशा शब्दांत अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी रुग्णालय आणि त्यांच्या घरी धाव घेतली. काहींनी स्मशानभूमीत अंत्यदर्शन घेतले.
पंतप्रधानांच्या हस्ते स्वस्त विमान सेवा ‘उडान’चा शुभारंभ :
- दिल्ली-सिमला एवढ्या अंतराच्या उडान या स्वस्त हवाई सफरीचे 27 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. त्याचबरोबर नांदेड-हैदराबाद व कडप्पा-हैदराबाद मार्गावरील उडानच्या पहिल्या उड्डाणांनाही व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
- प्रादेशिक हवाई संपर्क योजनेद्वारे भारतात सामान्य माणसाचे स्वस्त हवाई सफरीचे स्वप्न पूर्ण करण्याचा सरकारचा संकल्प आहे. दिल्ली- सिमला उड्डाणामुळे हिमाचल प्रदेशच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल.
- तसेच यापुढे पायात हवाई चप्पल घालणाऱ्या प्रवाशांनादेखील देशाच्या विविध भागांत हवाई सफरीचा आनंद घेता येईल, असे प्रतिपादन उद्घाटनप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी केले.
‘जेईई’ परीक्षेत कल्पित वीरवाल संपूर्ण देशात पहिला :
- देशातील आयआयटी, एनआयटी आणि अन्य प्रतिष्ठित अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमधील प्रवेशांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या ‘जेईई-मेन-2017’ या परीक्षेत 360 पैकी 360 गुण मिळवून उदयपूरचा कल्पित वीरवाल संपूर्ण देशात पहिला आला तर मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकाविण्याचा मान नाशिकच्या वृंदा नंदकुमार राठी हिने मिळविला. 321 गुण मिळविणारी वृंदा गुणानुक्रमे देशात 71 वी ठरली.
- तसेच गेल्या 58 वर्षांत आयआयटीच्या या अत्यंत कठीण अशा प्रवेश परीक्षेत महाराष्ट्रातील एकही मुलगी देशात पहिली आली नव्हती. ते वृंदाने करून दाखविल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिनविशेष :
- 28 एप्रिल 1920 मध्ये होमरुल लीगच्या अध्यक्षपदी महात्मा गांधी यांची निवड झाली.
- प्रसिद्ध मराठी कथाकार व कादंबरीकार ‘मधु मंगेश कर्णिक’ यांचा जन्म 28 एप्रिल 1931 मध्ये झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा