Current Affairs of 3 March 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (3 मार्च 2016)
सुरक्षित वीज पुरवठ्यात भारत 90 व्या स्थानी :
- स्वस्त आणि टिकाऊ वीजपुरवठा करण्यात 126 देशांच्या यादीत भारताला 90 वा क्रमांक देण्यात आला आहे.
- जागतिक आर्थिक मंचने (डब्लू-ई-एफ) याबाबत तयार केलेल्या यादीत स्वीत्झर्लंड प्रथम क्रमांकावर आहे.
- ‘ग्लोबल एनर्जी आर्किटेक्चर परफॉर्मन्स इंडेक्स रिपोर्ट’मध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
- तसेच त्यात 126 देशांतील वीज पुरवठ्याचे आकलन करण्यात आले आहे, त्यात उचित मूल्य, पर्यावरण, कायम आणि सुरक्षित पुरवठा यांचा विचार करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
Must Read (नक्की वाचा):
शिर्डीत उतरले पहिले चार्टर विमान :
- साईनगरी हवाई नकाशावर आणण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी तयार केलेल्या विमानतळावर (दि.2) पहिले चार्टर विमान उतरले.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार महिन्यांमध्ये विमानतळ सुरू करण्याचे ठरविले असून त्याचाच भाग म्हणून (दि.2) चाचणी घेण्यात आली.
- बॉम्बे फ्लार्इंग क्लब अर्थात शासकीय मालकीच्या अमेरिकन बनावटीच्या पायपर सैनिका या सहा आसनी विमानाने (दि.2) सकाळी 8.30 वाजता जुहू हवाईतळावरुन शिर्डीसाठी उड्डाण केले होते़ विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष विश्वास पाटील हे विमानातून शिर्डीला आले होते.
- शिर्डीला येणाऱ्या पहिल्या विमानाचे पायलट होण्याचा मान कॅप्टन जे. पी. शर्मा, भगवती मेहेर यांना मिळाला.
- मुंबई ते शिर्डी अशा अवघ्या 45 मिनिटांत लागतात.
न्यूझीलंडचे माजी कर्णधार मार्टिन क्रो यांचे निधन :
- न्यूझीलंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज मार्टिन क्रो (वय 53) यांचे (दि.3) कर्करोगाने निधन झाले.
- मार्टिन क्रो हे न्यूझीलंड क्रिकेट संघाचे प्रमुख फलंदाज होते.
- क्रो यांनी 77 कसोटी आणि 143 एकदिवसीय सामने खेळले होते.
- क्रो यांनी कसोटीत 45.36 च्या सरासरीने 5,444 धावा करत 17 शतके झळकावली होती.
- क्रो हे सलग 13 वर्ष न्यूझीलंड संघाचे सदस्य होते.
अंतराळवीरांचा 340 दिवस अंतराळ प्रवास :
- अंतराळात वर्षभर म्हणजेच 340 दिवस प्रवास केल्यानंतर (दि.1) दोन अंतराळवीर पृथ्वीवर परतले.
- अमेरिकेतील अंतराळवीर स्कॉट केली 27 मार्च 2015 पासून अवकाशात भ्रमण करत होते.
- तसेच त्यांच्यासोबत मिखाईल कोर्निएंको हे रशियन अंतराळवीर होते.
- प्रदीर्घकाळ अवकाशात राहिल्यानंतर मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्याच्या प्रकल्पांतर्गत अवकाशात ते गेले होते.
- भविष्यात मंगळ ग्रहावर मनुष्य पाठविण्यासाठी हे प्रयोग उपयुक्त ठरणार आहेत.
- अंतराळात मानवी जीवनासाठी पूरक बनविण्यात आलेल्या ‘सोयूझ’ हे रशियन अवकाशयान मध्य आशियात कझाकिस्तानच्या ओसाड प्रदेशात उतरविण्यात आले.
नाशिक-पुणे रेल्वेमार्गावर 15 नवी स्थानके :
- रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ग्रीन सिग्नल दिलेल्या प्रस्तावित नाशिक-पुणे या 266 किलोमीटरच्या रेल्वेमार्गावर नव्या 15 रेल्वेस्थानकांची भर पडणार असल्याने या मार्गावरील रेल्वेस्थानकांची संख्या आता 22 होणार आहे.
- तसेच याशिवाय रेल्वेमार्गावर एकूण 22 मोठे आणि 132 मध्यम पूल असतील.
- प्रस्तावित रेल्वेमार्गापैकी 145 किलोमीटर पुणे जिल्ह्यातून, 59 किलोमीटर नगर, तर 62 किलोमीटर लोहमार्ग नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे.
- सध्या या तीन जिल्ह्यांत 46 हजार किलोमीटरहून अधिक मोठे रस्त्यांचे जाळे आहे.
- तसेच यामध्ये तीन जिल्ह्यांत मिळून तब्बल 707 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग, तर चार हजार 512 किलोमीटरच्या राज्यमार्गासह त्याच्या दीडपट जिल्हा मार्गाचे रस्ते वाहतुकीचे जाळे आहे.
रत्नागिरीच्या मत्रेयी गोगटे यांना विजेतेपद :
- शिवाजी पार्क जिमखान्याने आयोजित केलेल्या आठव्या महाराष्ट्र राज्य गुणांकन रोख पारितोषिकांच्या कॅरम स्पध्रेच्या पुरुष एकेरी, महिला एकेरी गटामध्ये अनुक्रमे संदीप देवरुखकर, रत्नागिरीच्या मत्रेयी गोगटे यांनी विजेतेपद पटकाविले.
- महिला एकेरीमध्ये अग्रमानांकित गोगटेने तिसऱ्या मानांकित प्रीती खेडेकरचा अटीतटीच्या लढतीत 25-20, 25-19 असा पराभव केला.
- ही स्पर्धा मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशन व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या विद्यमाने शिवाजी पार्क जिमखाना येथे आयोजित करण्यात आली.
- पुरुषांच्या अंतिम फेरीत ओएनजीसीच्या तिसऱ्या मानांकित माजी आशियाई व राष्ट्रीय विजेता देवरुखकरने रंगतदार दोन गेम रंगलेल्या रोमहर्षक लढतीत जैन इरिगेशनच्या माजी राष्ट्रीय विजेता योगेश डोंगडेचा 25-11, 25-11 असा पराभव केला आणि रोख रु. 21 हजार रुपयांचे बक्षीस व चषक पटकाविला.
दिनविशेष :
- जपान हिनामात्सुरी दिन.
- मलावी शहीद दिन.
- बल्गेरिया मुक्ति दिन.
- 1839 – टेलिफोनचा जनक ग्रॅहॅम बेल यांचा जन्म.
- 1860 – प्लेग प्रतिबंधक लस शोधणाऱ्या डॉ. हापकीन यांचा जन्म.
- 1991- रेल्वे कर्मचाऱ्यांचे पहिले मराठी साहित्य संमेलन झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा