Current Affairs of 4 March 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (4 मार्च 2016)
जागतिक सांस्कृतिक महोत्सव :
- आर्ट ऑफ लिव्हिंगला या वर्षी 35 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने नवी दिल्लीमध्ये 11 ते 13 मार्चदरम्यान जागतिक सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
- यमुना नदीच्या काठी होणाऱ्या या महोत्सवात 155 देशांतील 35 लाख नागरिक उपस्थिती दर्शवणार असल्याचा अंदाज आहे.
- प्रभू यांनी सांगितले की, ‘तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन 11 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
- तीन दिवस गायन, नृत्य, योगासने अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असून, त्यासाठी सुमारे 7 एकर परिसरात भव्य रंगमंच उभारण्यात आला आहे.
- जगातील सर्वात मोठा तात्पुरता रंगमंच म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही त्याची नोंद होण्याची शक्यता प्रभू यांनी व्यक्त केली.
- तीन दिवस चालणाऱ्या महोत्सवात सादर होणाऱ्या कार्यक्रमांसाठी 35 हजार 973 कलाकारांनी नोंदणी केली आहे.
- कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी रंगमंचाची निर्मिती केली असून, नृत्य दिग्दर्शक टेरेन्स लुईस यांनी सर्व महोत्सवातील नृत्य दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
Must Read (नक्की वाचा):
‘फिल्ड मार्शल’ हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले अधिकारी :
- भारतीय लष्करात ‘फिल्ड मार्शल’ हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले अधिकारी अशी जनरल सॅम माणकेशॉ यांची ओळख आहे.
- पण गुजरात सरकारच्या वेबसाईटवर ‘लँड ऑफ लिंजड्स’ (गुजरातमधील महान व्यक्तीमत्व) या विभागात माणकेशॉ यांचा उल्लेख क्रीडा क्षेत्रात करण्यात आला आहे.
- 1971 साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात सॅम माणकेशॉ लष्कराचे यशस्वी नेतृत्व केले होते, ते ‘सॅम बहाद्दूर’ या नावानेही प्रसिद्ध होते.
- चाळीस वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत माणकेशॉ दुसरे महायुद्ध, पाकिस्तानविरुद्धची तीन युद्धे आणि चीनसोबतच्या युद्धात सहभागी होते.
- लष्करातील एवढा दैदिप्यमान इतिहास असलेल्या माणकेशॉ यांना गुजरात सरकारने मात्र ‘खेळाडूं’च्या पंक्तीत स्थान दिले आहे.
इंडोनेशिया हा भूकंपप्रवण देश :
- इंडोनेशियातील सुमात्रा बेटाच्या पश्चिम किनारपट्टीला (दि.2) शक्तिशाली भूकंपाचा हादरा जाणवला.
- रिश्टर मापकावर या भूकंपाची नोंद 7.9 एवढी झाली.
- भारतीय वेळेनुसार (दि.2) सायंकाळी 6.20 वाजता हा भूकंप झाला.
- भूकंपाचा केंद्रबिंदू पडांग या शहराच्या आग्नेयेला 808 कि.मी. दूर समुद्रात 10 कि.मी. खोलवर होता.
- इंडोनेशिया हा भूकंपप्रवण देश आहे, या बेटाला भूकंपाचे वारंवार हादरे बसतात, या भागात जागृत ज्वालामुखीही आहेत, मोठ्या भूगर्भीय हालचालींमुळे येथे भूकंप होत असतात.
अहमदाबाद, जयपूर विमानतळ विकसित करणार :
- सिंगापूरची जगप्रसिद्ध चंगी विमानतळाच्या धर्तीवर अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (एआयएपी) व जयपूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यात येणार आहे.
- तसेच यासाठी चंगी एअर लिमिटेड ऑपरेशन व मॅनेजमेंट कंपनी येत्या जून महिन्यापासून कामाला सुरवात करणार आहे.
- अहमदाबाद व जयपूर विमानतळ विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तयार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मान्यतेनंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
- तसेच त्यानुसार नुकतेच चंगी विमानतळाच्या (सीआयए) अधिकाऱ्यांनी एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाकडून (एएआय) अहमदाबाद व जयपूर विमानतळाच्या प्रस्तावित कराराबाबत सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे.
- अहमदाबाद व जयपूर विमानतळाच्या विकासासाठी मोदींच्या नोव्हेंबरमधील सिंगापूर दौऱ्यादरम्यान एएआय सिंगापूर को ऑपरेशन एंटरप्रायझेसबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
- केंद्र सरकारनेही याबाबतच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे, केंद्र सरकारने पहिल्यांदाच स्वतंत्रपणे पुढाकार घेत विमानतळांच्या विकासाबाबत पावले उचलली आहेत.
मारुती मोटारींच्या किंमतीत वाढ :
- मारुती सुझुकीने आपल्या सर्व मोटारींच्या किंमतीत 34,494 रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे.
- केंद्रीय अर्थसंकल्पात देशात विक्री होणाऱ्या सर्व वाहनांवर अतिरिक्त कर लादल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
- मारुतीचे सियाझ व एर्टिगासारखे हायब्रिड मॉडेल्स कर कक्षाच्या बाहेर आहेत.
- परंतु अद्याप कंपनीने प्रत्येक मॉडेलच्या किंमतीत होणारी नेमकी वाढ व ती केव्हापासून लागू होईल हे नमूद करण्यात आलेले नाही.
- वायू प्रदुषण व वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आवश्यक मदतीसाठी सरकारतर्फे हा कर लादण्यात आला आहे.
दिनविशेष :
- औद्योगिक सुरक्षा दिवस
- राष्ट्रीय दिन
- 1861 : अब्राहम लिंकन अमेरिकेचे 16 वे अध्यक्ष झाले.
- 1951 : आशियायी सामन्यास प्रारंभ झाला.
- 1961 : भारतीय नौदलात 1 ले विमानवाहू जहाज ‘विक्रांत’ दाखल झाले.
- 1984 : महाराष्ट्रात वीजनिर्मितीचा नवा विक्रम याच दिवशी झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा