Current Affairs of 2 March 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (2 मार्च 2016)
‘फर्स्ट ग्लोबल इम्पॅक्ट लिगसी ऑनर’ पुरस्कार :
- ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक आणि ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष अभिजित पवार यांना ‘यंग प्रेसिडेंट्स ऑर्गनायझेशन’च्या ‘वर्ल्ड प्रेसिडेंट्स ऑर्गनायझेशन’चा (वायपीओ-डब्ल्यूपीओ) ‘फर्स्ट ग्लोबल इम्पॅक्ट लिगसी ऑनर’ हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे.
- दुबई येथे (दि.9) होणाऱ्या शानदार समारंभात पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
- ‘वायपीओ-डब्ल्यूपीओ’च्या आंतरराष्ट्रीय समितीने नुकतीच ही घोषणा केली.
- ‘ट्रिनिटी सेव्हन’ संकल्पनेद्वारे पवार यांनी सामाजिक, प्रशासकीय आणि आर्थिक स्तरांवर बदल घडवून आणण्याचा ध्यास घेतल्याचे ‘वायपीओ-डब्ल्यूपीओ’ने पुरस्काराची घोषणा करताना म्हटले आहे.
- ‘ट्रिनिटी सेव्हन’ संकल्पना व्यापक सकारात्मक परिणाम, भावनिक पातळीवरचा थेट लोकसंपर्क आणि थोड्या काळात मोठा परिणाम घडवून आणणारे सहज राबवता येतील अशा प्रयत्नांवर भर देते.
- महिलांना सक्षम व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘तनिष्का स्त्री-प्रतिष्ठा अभियाना’साठी पवार यांना ‘वायपीओ-डब्ल्यूपीओ’ने फेब्रुवारी 2014 मध्ये ‘ग्लोबल इम्पॅक्ट’ पुरस्काराने गौरवले होते.
Must Read (नक्की वाचा):
गिनिज बुकात नाव नोंदवत नवा पराक्रम :
- लिम्का बुक’, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या चितेगावच्या अप्पासाहेब गायकवाड यांनी (दि.1) गिनिज बुकात नाव नोंदवत नवा पराक्रम केला.
- गिनिज बुकने दिलेले 200 उठाबशांचे लक्ष्य गायकवाड यांनी तीन मिनिटांमध्ये 206 उठाबशा काढत पूर्ण केले.
- ‘गिनिज बुक’तर्फे घालून देण्यात आलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करीत अप्पासाहेब गायकवाड यांनी हा विक्रम केला, या उपक्रमासाठी दोन क्रीडा जगताशी संबंधित साक्षीदार नेमण्यात आले होते.
ब्रिटनचे शाही दाम्पत्य प्रथमच भारतात येणार :
- ब्रिटनचे शाही दाम्पत्य प्रिन्स विल्यम आणि केट मिडल्टन प्रथमच भारतात येणार असून, एप्रिल महिन्यात मुंबई, दिल्ली, काझिरंगा आणि आग्राला भेट देणार असून, या भेटीत ते ताजमहालचीही सैर करणार आहेत.
- केसिंग्टन पॅलेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, हे शाही दाम्पत्य 10 एप्रिलला मुंबईत येणार असून, त्यानंतर ते दिल्लीला जाईल.
- विल्यम आणि केट हे शाही दाम्पत्य या दौऱ्यात भारताची गौरवशाली इतिहास जाणून घेईल, तसेच भारतीय युवकांच्या आशा-आकांक्षा जाणून घेण्यात आणि 21 व्या शतकातील त्यांची भूमिका समजून घेण्याचीही या शाही दाम्पत्याची इच्छा आहे.
- प्रिन्सेस डायनानेही भेट घेतली होती 24 वर्षांपूर्वी 1992 साली प्रिन्सेस डायनानेही भारताचा दौरा केला होता.
सलग तिसऱ्या विजयासह भारत स्पर्धेच्या अंतिम फेरीत :
- गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर विराट कोहली आणि युवराजसिंग यांनी कठीण परिस्थितीत केलेल्या संयमी फलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने (दि.1) आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेला पाच गड्यांनी पराभूत करीत सलग तिसऱ्या विजयासह स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
- लंकेने नाणेफेक गमाविल्यानंतर हार्दिक पंड्या (26 धावांत दोन बळी) आणि जसप्रीत बुमराह (27 धावांत दोन बळी) यांच्या भेदक माऱ्यापुढे 9 बाद 138 अशी आव्हानात्मक मजल गाठली.
- विजयी चौकार विराटने मारताच 19.2 षटकांत 5 बाद 142 धावा करीत सामना संपविला.
- भारताचा यंदा नऊ टी-20 सामन्यांतील हा आठवा विजय होता.
व्याजदरात 0.25 टक्के घट होणार :
- वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्याच्या सरकारच्या निर्धारामुळे रिझर्व्ह बँक आपले उदार पतधोरण यापुढेही चालूच ठेवण्याची शक्यता आहे.
- तसेच त्यामुळे आगामी पतधोरण जाहीर करताना धोरणात्मक व्याजदरात किमान 0.25 टक्के कपात केली जाण्याची शक्यता असल्याचे एचएसबीसीच्या एका अहवालात म्हटले आहे.
- चालू वित्तीय वर्ष संपत आले असून, या वर्षभरात रिझर्व्ह बँकेने 1.25 टक्के व्याज दरकपात केली आहे.
- मात्र 2 फेब्रुवारीला पतधोरण जाहीर करताना व्याजदरात कोणतीही कपात न करता रेपो दर 6.75 टक्के इतका कायम ठेवला होता.
- वित्तीय तूट 3.5 टक्के ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाचे चांगले परिणाम होतील.
दृष्टिक्षेपात अर्थसंकल्प :
- यंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण विकासासाठी एकूण 8,77,665 कोटींची तरतूद केली आहे.
- 6.87 कोटी घरांमध्ये डिजिटल शिक्षण पोहोचवणार
- शेतकऱ्यांसाठी नऊ लाख कोटींचे कर्ज
- यंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण विकासासाठी एकूण 8,77,665 कोटींची तरतूद केली आहे.
- स्टार्ट अप इंडियासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या एका दिवसात मिळणार
- खतांची सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा विचार
- आयकर मर्यादेत कोणताही बदल नाही, लहान करदात्यांकडे विशेष लक्ष
- पंतप्रधान ग्राम सडक योजनेसह एकूण रस्ते विकासाकरिता 97,000 कोटी रुपयांची तरतूद
- उच्च शिक्षणाकरिता 1,000 कोटी रुपयांची तरतूद
- रस्ते आणि महामार्गाकरता 55,000 कोटी रुपयांची तरतूद
- शॉपिंग मॉल 24 तास उघडे ठेवण्यासाठी परवानगी देणार
- पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या ग्राहकांच्या करसवलतीत 3000 रुपयांची वाढ
- छोटय़ा पेट्रोल, एलपीजी आणि सीएनजी वाहनांवर 1 टक्के प्रदूषण अधिभार
- काही डिझेल वाहनावर 2.5 टक्के तर इतर मोठय़ा वाहनांवर 4 टक्के प्रदूषण अधिभार
- चांदीव्यतिरिक्त इतर दागिन्यांवर b टक्का उत्पादन शुल्क लागू
- सर्वच सेवांवर 0.5 टक्के कृषी कल्याण अधिभार लागू
- मे 2018 पर्यंत देशातील सर्व गावागावांत वीज पोहोचवणार
- प्रत्येक कुटुंबाला 1 लाख रुपयांचे विमा संरक्षण, ज्येष्ठ नागरिकांना 1 लाख 40 हजारांचा विमा
- मनरेगासाठी 38,500 कोटींची आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद
- बुडीत कर्जामुळे गोत्यात आलेल्या बँकांसाठी 25 हजार कोटी रुपये
- रस्ते आणि रेल्वेच्या विकासासाठी दोन लाख 18 हजार कोटी खर्च करणार
- वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी तरुण उद्योजकांना संधी देणार
- पंतप्रधान जनऔषधी योजनेअंतर्गत जनरिक तीन हजार औषध दुकाने सुरू करणार
- वापरात नसलेले देशभरातील 160 विमानतळ पुन्हा सुरू करणार
- सार्वजनिक वाहतुकीमध्ये जुने परमिट मोडीत काढणार
- रस्ते आणि महामार्गासाठी 55 हजार कोटी
- सर्व जिल्हय़ात डायलिसिस केंद्र उभारणार
- स्किल डेव्हलपमेंट स्कीमसाठी 1700 कोटींची तरतूद
- सर्व शिक्षा अभियानअंतर्गत आणखी 62 नवोदय विद्यालये उघडणार
- स्टॅण्ड अप इंडियासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद
- प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपयांचा विमा कव्हर, ज्येष्ठ नागरिकांना 40 हजार अधिक.
- कराची चुकीची माहिती देणाऱ्याला 200 टक्के दंड आकारणार
- करविवाद सोडविण्यासाठी b नवीन लवाद सुरू करणार
- सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मागे सरकार उभे
- 60 स्क्वेअर मीटर घर बांधणाऱ्यांना सेवाकरातून सूट
- तंबाखूवर दोन टक्के अधिक उत्पादन शुल्क
- तंबाखू, सिगारेट, विडी महाग
- 10 लाखांपेक्षा अधिक किमतीच्या गाडय़ा महाग
- सरचार्ज 12.5 टक्क्यांवरून 15 टक्के
- डिझेल मोटारींवर 2.5 टक्के सेस
- एक कोटी रुपये कमाई असणाऱ्यांच्या सरचार्जमध्ये तीन टक्के वाढ
- तीन वर्षांत एक कोटी तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण
- 62 नवीन नवोदये विद्यालये सुरू
- राष्ट्रीय ग्रामस्वराज योजनेतून गावांचा विकास
- सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डायलिसिस सुविधा
- नवीन उद्योगांना व लघुउद्योगांना कॉर्पोरेट करात सवलत
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा