Current Affairs of 3 February 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (3 फेब्रुवारी 2018)

चालू घडामोडी (3 फेब्रुवारी 2018)

प्रख्यात महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक :

  • मोबाइल नंबरचा सीडीआर (कॉल्सचा तपशील) बेकायदेशीरपणे मिळवून, त्याची विक्री करणार्‍यात देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांचाही समावेश आहे.
  • या प्रकरणात आतापर्यंत अटक आरोपींची संख्या 7 झाली आहे. कुणाच्याही मोबाइल नंबरचा सीडीआर बेकायदेशीरपणे मिळवून, तो 10 ते 12 हजार रुपयांमध्ये विकण्याचे काम करणार्‍यांना अटक केली होती.
  • आरोपींनी काही विमा कंपन्यांना मोबाइलधारकांचे सीडीआर पुरविल्याचे यापूर्वी तपासात उघड झाल्याने, काही विमा कंपन्यांच्या 6 प्रतिनिधींची चौकशी पोलिसांनी केली.
  • देशातील पहिल्या महिला गुप्तहेर म्हणून रजनी पंडित यांची ख्याती आहे. त्या 50 पेक्षा जास्त पुरस्कारांच्या मानकरी आहेत.
  • तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील जवळपास साडेसात हजार प्रकरणांचा छडा लावल्याचा दावाही त्या करतात. खासगी गुप्तहेरांच्या क्षेत्रात त्या लेडी जेम्स बाँड म्हणूनही ओळखल्या जातात.

नव्या करांना परवानगी नाही :

  • जकात कर रद्द झाल्यानंतर, महापालिकेची मदार असलेल्या मालमत्ता कर व विकास नियोजन खात्यातील उत्पन्नातही तब्बल 1 हजार 296 कोटी रुपयांची घट होणार आहे.
  • त्याचबरोबर, उत्पन्नाचे पर्यायी स्रोत म्हणून पालिकेने हक्क सांगितलेल्या नवीन करांची परवानगी मिळालेली नाही.
  • यामुळे पालिकेचे आर्थिक गणित चुकले असून, विकासकामांसाठी थेट विशेष राखीव निधीला हात घातला आहे.
  • जकात करातून दरवर्षी सरासरी 7 हजार कोटी रुपये उत्पन्न जमा होत होते. यामध्ये दरवर्षी 10 कोटी रुपयांची वाढ होत होती.
  • मात्र, 1 जुलै 2017 पासून हा कर रद्द होऊन वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात आला आहे.

हिंदू वारसाहक्क कायदा सगळ्या महिलांना लागू :

  • केंद्र सरकारने वर्ष 2005 मध्ये हिंदू वारसाहक्क कायद्यात संशोधन करत वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये मुलींना बरोबरचा हक्क देण्याची व्यवस्था केली होती.
  • हिंदू वारसा हक्क कायदा सर्व महिलांना लागू होतो.
  • 2005 च्या आधी जन्म झालेल्या मुलींनाही हा कायदा लागू असेल, असं सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयात स्पष्ट केलं आहे.
  • मुलीचा जन्म 2005 च्याआधी झाला होता असं म्हणून वडिलोपार्जित संपत्तीमध्ये तिला हक्क देणं नाकारता येणार नाही, असं कोर्टाने म्हंटलं.  

178 वर्षांनंतर ब्रिटिश संसद भवनाची दुरुस्ती :

  • लंडन-ब्रिटनच्या 1002 वर्षांपूर्वीच्या संसद भवनाची दुरुस्तीसाठी 30 वर्षांपासून सुरू असलेल्या योजनेवर अखेर शिक्कामोर्तब झाले.
  • पॅलेस ऑफ वेस्टमिंस्टरमध्ये संसदेचे कामकाज चालते. ही इमारत 1016 मध्ये उभारण्यात आली.
  • यापूर्वी 178 वर्षांपूर्वी 1840 मध्ये या इमारतीची दुरुस्ती झाली होती. तेव्हा 30 वर्षे हे काम चालले.
  • आता ही इमारत रिकामी करायला तीन वर्षे लागतील आणि दुरुस्तीसाठी 6 वर्षे.
  • तसेच हे काम 2020 मध्ये सुरू करून 2026 मध्ये पूर्ण करण्याची योजना असून तोवर संसद उत्तर आयर्लंडच्या विधानसभेत चालेल.
  • या दुरुस्तीसाठी 32 हजार कोटी रुपये खर्च होतील.
  • पॅलेस ऑफ वेस्टमिंस्टर थेम्स नदीच्या किनाऱ्यावर असलेली ऐतिहासिक इमारत आहे. ही इमारत अनेक भागांत विभागलेली आहे.
  • यातील एका भागात बिग बेन घड्याळही आहे. यापैकी एका भागात संसदेचे कामकाज चालते.
  • पॅलेस ऑफ वेस्टमिंस्टर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे.

गणित, विज्ञान विषयात मुलांपेक्षा मुलीच सरस :

  • ग्लासगो-गणित आणि विज्ञान विषयांत मुलांच्या तुलनेत मुली अधिक सरस ठरत असल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले.
  • दोन्ही विषयांशी निगडित विचारलेल्या 70 प्रश्नांपैकी मुलींचे उत्तर अधिक अचूक होते.
  • अमेरिका व ब्रिटनमधील मुला-मुलींची बुद्धिमत्ता मात्र सारखी असल्याचे संशोधनातून समोर आले.
  • तसेच दुसरीकडे अमेरिकेतील कोलंबिया, कोस्टा रिका व भारतात हिमाचल प्रदेशमध्ये मुलींची बुद्धिमत्ता मुलांच्या तुलनेत उत्तम आहे.
  • अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मिसोरी व इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोने 15 वर्षांवरील जगभरातील 15 लाख मुला-मुलींची बुद्धिमत्ता चाचणी घेतली.

15 ऑगस्टपासून सुरू होणार ‘मोदीकेअर’ योजना :

  • देशातील 10 कोटी गरीब कुटुंबांना 5 लाखांचे आरोग्य विमा संरक्षण देणारी ‘मोदीकेअर’ ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना कॅशलेस असेल.
  • 15 ऑगस्ट किंवा 2 ऑक्टोबरपासून योजना सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी 10 ते 12 हजार कोटी खर्च येईल.
  • या योजनेत कुटुंबनिहाय 1000 ते 1200 रुपयांचा हप्ता सरकार भरेल. 40% लोकसंख्येला लाभ होईल.

‘मोदीकेअर’ योजनेची वैशिष्ट्ये

 

  • सरकारी व निवडक खासगी रुग्णालयांत उपचारांची सुविधा.
  • सर्व उपचार मोफत होतील, योजना पूर्णपणे कॅशलेस.
  • सध्या 2 हजार कोटींची तरतूद, गरज पडल्यास रक्कम वाढवणार.
  • कुटुंबातील सदस्यांची मर्यादा नाही, सर्व रोगांवर उपचार.
  • कालांतराने उर्वरित कुटुंबांनाही देणार योजनेचा लाभ.

बिटकॉईन चलन अवैध :

  • बिटकॉईनची जगभरात आणि भारतातही वाढती मागणी आहे. मात्र, त्याचवेळी बिटकॉईन हा काळा पैसा लपविण्याचा मार्ग ठरू लागला आहे.
  • त्यामुळे बिटकॉईन भारतात अवैध चलन आहे आणि या चलनाला मान्यता देण्याचा कोणताही हेतू नाही, असे जेटली यांनी स्पष्ट केले.
  • तसेच बिटकॉईन या चालनाएवजी ब्लॉकचेन या क्रिप्टोकरन्सीसाठीच्या तंत्रज्ञानाचा आधार भारत घेईल, असे जेटली यांनी म्हटले आहे.

‘फ्लेक्‍सी फेअर’च्या जागी रेल्वे ‘डायनॅमिक’ आणणार

  • प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या ‘फ्लेक्‍सी फेअर’ या योजनेचा रेल्वे मंत्रालयाने फेरविचार केला असून, लवकरच एक नवी योजना आणली जाणार आहे.
  • तसेच ‘फ्लेक्‍सी फेअर’ प्रणालीऐवजी ‘डायनॅमिक तिकीट दरप्रणाली’ आणण्याचा रेल्वेचा विचार असून, ही योजना अंमलबाजवणीच्या टप्प्यात आहे.

दिनविशेष :

  • स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास 1783 मध्ये मान्यता दिली.
  • 1870 मध्ये अमेरिकेच्या संविधानातील 15 वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले.
  • भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे 1925 मध्ये व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.
  • 1966 मध्ये सोव्हिएत रशियाने लूना-9 हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.
  • वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचा जन्म 1821 मध्ये झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.