Current Affairs of 4 February 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (4 फेब्रुवारी 2018)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या ‘एक्झाम वॉरियर्स’ पुस्तकाचे प्रकाशन :
- परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकाचे प्रकाशन मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते नवी दिल्लीत झाले.
- परीक्षेच्या काळात येणारा तणाव कसा टाळावा याबाबत ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकात विद्यार्थ्यांना मौलीक सल्ले देण्यात आले आहेत.
- ‘एक्झाम वॉरियर्स’ हे 208 पानांचे पुस्तक पेंग्विन रँडन हाऊस इंडियाने प्रकाशित केलेले असून, ते अनेक भाषांमध्ये भाषांतरित करून देशभरात उपलब्ध करून दिले जाणार आहे.
- तसेच या पुस्तकात, कुठलाही तणाव किंवा चिंता याशिवाय परीक्षेला कसे सामोरे जावे याबद्दल पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांनी जवळजवळ 25 ‘मंत्र’ दिले आहेत.
ईशान्य भारताच्या विकासासाठी ‘राष्ट्रीय बांबू अभियानाचे’ पुनरुज्जीव्वन करणार :
- आसाममध्ये 1300 कोटींच्या गुंतवणूकीद्वारे ‘राष्ट्रीय बांबू अभियानाचे’ पुनरुज्जीवन करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले आहे.
- यामुळे ईशान्य भारतातील राज्यांना याचा थेट फायदा होईल. मुख्य म्हणजे येथील स्थानिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
- आसाम प्रगतीच्या दिशेने पुढे जात आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या बाबतीत आसाम सध्या पहिल्या स्थानावर आहे. या श्रेणीत येणाऱ्या राज्यांच्या विकासासाठी सरकार आणखी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Must Read (नक्की वाचा):
‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ गुंतवणूक करार होणार :
- तीन दिवसांच्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र 2018’ या परिषदेत राज्यात कोट्यवधी रुपयांच्या औद्योगिक गुंतवणुकीचे करार होणार आहेत.
- 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान होणा-या या परिषदेत राज्याच्या चौफेर प्रगतीच्या दृष्टीने चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
- मॅग्नेटिक महाराष्ट्रचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते एमएमआरडीए ग्राऊंडवर 18 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता होईल.
ऑस्ट्रेलियाला नमवून चौथ्यांदा विश्वचषकावर कोरलं नाव :
- भारताच्या युवा गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला 216 धावांवर रोखले. तर शेवटच्या सामन्यातही तोच रुबाब कायम राखत ऑस्ट्रेलियाचे 217 धावांचे लक्ष्य आरामात पार केले.
- डावखुरा फलंदाज मनजोत कालराच्या नाबाद 101 धावांच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय मिळवत चौथ्यांदा अंडर -19 वर्ल्डकप जिंकला आहे.
- तसेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा विक्रम अंडर 19 संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ ने मोडला असून अंतिम सामन्यात मुंबईकर पृथ्वी शॉ ने नवीन पराक्रम आपल्या नावे केला आहे.
- पृथ्वी 19 वर्षांखालील विश्वचषकात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने सध्या सुरु असलेल्या विश्वचषकात सहा सामन्यात खेळताना 161 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 2 अर्धशतकांचाही समावेश आहे. या आधी हे विक्रम विराट कोहली आणि उन्मुक्त चंद यांच्या नावावर होते.
दिनविशेष :
- 1670 : ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.
- 1922 : चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी 3 दिवस उपोषण करुन असहकार आंदोलन मागे घेतले.
- 1936 : कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडिअम हे पहिले किरणोत्सारी मूलद्रव्य बनले.
- 1944 : चलो दिल्ली चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच.
- 1948 : श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.
- 2004 : मार्क झुकरबर्गने फेसबुकची स्थापना केली.