Current Affairs of 2 February 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (2 फेब्रुवारी 2018)

चालू घडामोडी (2 फेब्रुवारी 2018)

‘आयुष्मान’ योजना

 • आयुष्मान भारत योजनेंतर्गत देशातील 10 कोटींहून अधिक कुटुंबांना लाभ होणार आहे. वार्षिक 5 लाख रुपये प्रति कुटुंबाला याचा लाभ होईल.
 • तसेच या माध्यमातून औषधांची उपलब्धता तळागाळापर्यंत पोहोचेल. अप्रत्यक्षपणे त्याचा लाभ देशातील औषधनिर्माण कंपन्यांनाही होईल.
 • अर्थसंकल्पात देशभरात 24 नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि आरोग्य केंद्रासाठी 1,200 कोटी रुपयांची तरतूद हीदेखील एक महत्त्वाची घोषणा आहे.
 • राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही खूपच महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्याचा लाभ जवळपास निम्म्या लोकसंख्येला होणार आहे.
 • सरकारच्या आयुष्यमान भारत मोहिमेकरिता ती खूपच फलदायी ठरेल. खूप वेगळा विचार यानिमित्ताने झाला आहे. ही योजना जागतिक स्तरावरही वाखाणली जाईल.

स्त्रियांचे भावविश्व कवितेतून उलगडणाऱ्या कमला दास :

 • कमला दास या मल्याळम साहित्यविश्वातील प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री आहेत. त्यांच्यावर गुगलने डुडल केले आहे.
 • कमला दास यांनी स्त्रियांच्या लैंगिक आयुष्यावर आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर विपुल लेखन केले आहे.
 • स्त्रियांच्या भेडसावणाऱ्या समस्या, त्यांना त्यांच्या वैवाहिक आयुष्यात येणाऱ्या समस्या याबाबत त्यांनी लिहिले आहे.
 • कमला दास यांचा जन्म हिंदू परिवारात झाला. मात्र वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. इस्लाम धर्म स्वीकारल्यापासून त्यांना सुरैय्या या नावानेही ओळखले जाऊ लागले.
 • कवितेच्याबाबतीत त्यांचे योगदान लक्षात घेता त्यांना ‘मदर ऑफ मॉडर्न इंडियन इंग्लिश पोएट्री’ हा किताब देऊन सन्मानित करण्यात आले.

अमेरिकेत गुणवत्ताधारित व्हिसा :

 • देशात गुणवत्ताधारित व्हिसा प्रणाली लागू करण्यासाठी विद्यमान लॉटरी प्रणाली रद्द ठरवण्याविषयी भूमिका मांडली.
 • त्यांनी चारस्तरीय इमिग्रेशन योजनेचा आराखडा सादर केला. गुणवत्ता या एकमेव आधारावर व्हिसा देण्यात यावा. लॉटरी पद्धतीने व्हिसा देण्याची पद्धत लवकरच बंद करण्यात येईल. यामुळे अकुशल लोकांना ग्रीन कार्ड मिळते.
 • अमेरिकेत सुमारे 34 लाख भारतवंशीय नागरिक राहतात. त्यापैकी सुमारे साडेसात लाख भारतवंशीयांना गुणवत्ताधारित व्हिसा नियमांचा लाभ मिळू शकतो.
 • पाच लाखावर भारतीय व्यावसायिकांनी ग्रीन कार्डसाठी अर्ज केला आहे.

दिनविशेष :

  • 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ भूमी दिन
  • 1933 : अ‍ॅडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.
  • 1962 : 400 वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो हे ग्रह एका रेषेत आले.
  • 1930 : लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे याचं निधन. (जन्म: 12 एप्रिल 1871)

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.