Current Affairs of 29 June 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (29 जून 2016)
ऑस्ट्रेलियातील बांधकाम कंपनीचे भारतासोबत करार :
- मुंबईत किरकोळ आणि आतिथ्य विकास प्रकल्प विकसित करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील एका प्रमुख बांधकाम कंपनीने भारतीय कंपनीसोबत 169.5 दशलक्ष डॉलरचा करार केला आहे.
- सीआयएमआयसी समूहातील कंपनी लेटन एशियाने आपली सहयोगी लेटन इंडिया कॉन्ट्रॅक्टर्सद्वारे मुंबईत मेकर मॅक्सिटी प्रकल्पाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी समझोता केला.
- तसेच हे प्रकल्प पूर्ण करण्याने लेटन एशियाला 169.5 दशलक्ष डॉलरचे उत्पन्न होईल.
- प्रमुख किरकोळ आणि आतिथ्य केंद्र बनविण्याची ही योजना आहे.
- लेटन एशियाचे व्यवस्थापकीय संचालक मॅन्युएल अल्वारेज मुनोज म्हणाले की, मेकर समूहाशी मिळून आम्ही पहिला मोठा प्रकल्प करीत आहोत.
Must Read (नक्की वाचा):
प्राध्यापकांच्या निवृत्ती वयात बदल :
- राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात कार्यरत अध्यापकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे करण्याबाबत 2011-12 दरम्यान घेण्यात आलेल्या निर्णयांचा पुनर्विचार करून त्यांच्या सेवानिवृत्तीचे वय आता 60 वर्षे करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.
- तसेच प्राचार्यांच्या सेवानिवृत्तीचे वय सरसकट 65 वर्षे करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
- राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील शासकीय संस्था तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाशी संलग्नीत शासकीय तंत्र महाविद्यालये, पदविका संस्था आणि महाविद्यालयांमधील अध्यापकांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीचे वय यापूर्वी म्हणजे 2011-12 दरम्यान 58 वरून 62 वर्षे करण्यात आले होते.
- त्याचप्रमाणे अकृषी विद्यापीठे, तंत्रशास्त्र विद्यापीठे व संलग्नीत अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक, ग्रंथपाल, उपग्रंथपाल, सहायक ग्रंथपालतसेच संचालक, उपसंचालक व सहायक संचालक, शारीरिक शिक्षण यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्षे करण्याबाबतही यापूर्वी निर्णय घेण्यात आला होता.
- या सर्व निर्णयांचा पुनर्विचार करून त्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विश्वनाथन आनंद यांना डॉक्टर ऑफ सायन्स उपाधी :
- चौषष्ट घरांचा राजा आणि भारताचा पहिला ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याला (दि.28) आयआयटी कानपूरने 49 व्या दीक्षान्त सोहळ्यात डॉक्टर ऑफ सायन्स ही उपाधी दिली.
- आयआयटी सीनेटच्या वतीने आनंदला या उपाधीने गौरविण्यात आले.
- या कार्यक्रमादरम्यान आनंदने विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, 1998 साली मी भारताचा पहिला ग्रँडमास्टर बनलो, परंतु तरीही मी शिकत राहिलो. मी त्यानंतर जागतिक विजेतेपद या माझ्या पुढील लक्ष्याच्या दिशेकडे वाटचाल केली.
- तसेच तुम्ही देखील पदवीधर म्हणून बाहेर जाणार आहात. खूप आनंद साजरा करा, परंतु, आपल्या आयुष्यातील पुढील लक्ष्याचाही विचार करत रहा.
- आजही मी बुध्दिबळाच्या बाबतीत अधिकाधिक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.
- कारण, आपण जे काही शिकतो किंवा जे काही ज्ञान घेतो, ते कधीही वाया जात नाही.
‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाउन टाउन’ तर्फे आई महोत्सव :
- ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाउन टाउन’ व ‘पॉल पेरापिल्ली परिवारा’तर्फे रिटा पॉल यांच्या स्मरणार्थ नुकताच आई महोत्सव घेण्यात आला.
- तसेच या कार्यक्रमात प्रतिकूल परिस्थितीत मुलांना वाढवलेल्या नऊ मातांचा सत्कार करण्यात आला.
- डॉ. अरुण पाटील यांची संकल्पनेतून हा महोत्सव सावित्रीबाई फुले नाट्यगृहात झाला.
- माजी पोलीस आयुक्त भुजंगराव मोहिते, पॉल पेरापिल्ली, निखित धूत यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले.
- शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्हाबरोबर साडी, डॉ. पाटील यांचे ‘वाचाल तर वाचाल’ हे पुस्तक, ज्योती साठवणे यांच्यातर्फे ‘गोलघुमट’ पुस्तक, पापरी भौमिकतर्फे भेटवस्तू त्यांना देण्यात आल्या.
अजिंक्य पाटीलला आऊटस्टँडिंग स्टुडंट पारितोषिक :
- न्यूयॉर्क सिटीमधील ब्रॉडवे डान्स सेंटर संस्थेत सहा महिन्यांपूर्वी नृत्य दिग्दर्शकाचे धडे गिरवण्यासाठी गेलेल्या उरण तालुक्यातील बोकडविरा गावच्या अजिंक्य पाटील याने आऊटस्टँडिंग स्टुडंट पारितोषिक पटकावले आहे.
- अजिंक्य पाटील या उरण तालुक्यातील 25 वर्षांच्या तरुणाला आंतरराष्ट्रीय हॉलीवूडमध्ये ख्याती असलेल्या अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटीमधील ब्रॉडवे डान्स सेंटर संस्थेने नृत्य दिग्दर्शकाचे धडे गिरविण्यासाठी आमंत्रित केले होते.
- सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी अजिंक्य पाच महिन्यांपूर्वी न्यूयॉर्क सिटीकडे गेला आहे.
- नृत्य प्रशिक्षणाची आवड असल्याने 2010 साली अजिंक्यने देशातील बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक शामक डावर यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवले.
- अॅकॅडमीत नृत्याचे धडे देण्याबरोबरच मुंबई, नवी मुंबई, पनवेलमध्येही काही संस्थांमध्ये नृत्य प्रशिक्षणाचे धडे देणाऱ्या संस्थेतील विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन देण्याचेही काम केले.
दिनविशेष :
- नेदरलँड सैनिक दिन.
- 1871 : श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, प्रसिध्द नाटककर, साहित्यिक व विनोदी लेखक यांचा जन्म.
- 1976 : सेशेल्सला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा