Current Affairs of 30 June 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (30 जून 2016)

चालू घडामोडी (30 जून 2016)

केंद्रीय मंत्रिमंडळातर्फे नाइटलाइफला मंजूरी :

 • दुकाने, मॉल तसेच चित्रपटगृहे आता बाराही महिने चोवीस तास सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या बाबतच्या सुधारित कायद्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने (दि.29) मंजुरी दिली.
 • तसेच या निणर्यानुसार उत्पादन प्रकल्प वगळता आता जेथे दहा किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी आहेत, अशी दुकाने किंवा मॉलना वर्षभर ती कधीही सुरू व बंद करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
 • या ठिकाणी महिला कमर्चाऱ्यांनाही रात्रपाळीत काम करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
 • मात्र त्यांच्यासाठी पुरेशी सुरक्षा पुरविण्याचे बंधन आहे. त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, कॅंटीन, प्राथमिक उपचार सुविधा, स्वच्छतागृहे अशा प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे.
 • ‘मॉडेल शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट विधेयक 2016’ला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 जून 2016)

देशात महाराष्ट्र सर्वात ‘श्रीमंत’ राज्य :

 • औद्योगिकदृष्ट्या देशात कायमच अग्रेसर असलेले महाराष्ट्र राज्य देशातील सर्वात ‘श्रीमंत’ राज्य असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑन इंडियन स्टेटस्’ या अहवालाद्वारे पुढे आली आहे.
 • 2014-15 या वर्षात महाराष्ट्राच्या राज्यातंर्गत उत्पन्नाने नऊ लाख 50 हजार कोटी रुपयांचा विक्रमी टप्पा गाठल्याचे या अहवालात नमूद केले असून, 2013-14 च्या तुलनेत ही वाढ 5.7 टक्के अधिक आहे.
 • भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या या अहवालाच्या माध्यमातून विविध राज्यांतील प्रगतीची आणि तेथील आर्थिकबाबींची रंजक माहिती पुढे आली आहे.
 • तसेच यानुसार, देशातील अर्थकारणात महाराष्ट्र हा देशातील सर्वच राज्यांपेक्षा पुढे राहिल्याचे दिसून आले आहे.
 • राज्यांतर्गत उत्पादनाच्या वाढीमध्ये तामिळनाडू राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे तर पाच लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नासह उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे.
 • विशेष म्हणजे, तामिळनाडू राज्य श्रीमंतीच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर असले तरी त्या राज्याचे उत्पन्न आणि खर्च यातील फारकत स्पष्ट करणाऱ्या राज्याच्या वित्तीय तुटीचे प्रमाणही देशात सर्वाधिक आहे.

संसदचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून :

 • संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान होणार आहे.
 • तसेच या अधिवेशनात वस्तू आणि सेवा विधेयक (जीएसटी) विधेयक मंजुरीला सरकारचे सर्वोच्च प्रधान्य आहे.
 • मात्र, सर्वसहमतीने विधेयक संमत व्हावे, अशी इच्छा असून सर्व राज्यांनी ‘जीएसटी’साठी दिलेला पाठिंबाही विरोधकांनी लक्षात घ्यावा, असे सरकारने विरोधी पक्षांना विशेषतः कॉंग्रेसला बजावले आहे.
 • ‘एनएसजी’, पंतप्रधानांचे परदेश दौरे यावर सरकारने स्वतःहून निवेदन सादर करण्याचीही तयारी दर्शविली आहे.
 • संसद अधिवेशन बोलावण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज विषयक समितीची (सीसीपीए) (दि.29) बैठक होऊन त्यात पावसाळी 18 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत अधिवेशन बोलावण्याची राष्ट्रपतींना शिफारस करण्याचे ठरले.

राष्ट्रीय सिनियर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत स्वातीला रौप्य :

 • महाराष्ट्राची स्वाती गाढवेने 56 व्या राष्ट्रीय सिनियर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या 10 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले.
 • तसेच दुसरीकडे याच प्रकारात संजीवनी जाधवला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
 • श्रद्धा घुलेने लांब उडीत कांस्यपदक जिंकले. दिल्लीच्या बी. सौम्या हिने 20 किमी चालण्याच्या स्पर्धेत (दि.29) सुवर्णपदक जिंकले.
 • सौम्या हिने कारकिर्दीतील आपली सर्वोत्तम कामगिरी करताना 1 तास 42 मि. 55.24 सेकंद वेळ नोंदविताना शानदार सुवर्णपदक जिंकले.

महामार्गाच्या चौपदरीकरणाला केंद्र सरकारची मंजुरी :

 • महाराष्ट्रातील औरंगाबाद ते तेलवाडीदरम्यानच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
 • अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली.
 • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने (सीसीईए) पंजाब, ओडिशा आणि महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या तीन प्रस्तावांना मंजुरी दिली.
 • तसेच यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद-तेलवाडी दरम्यानच्या (महामार्ग क्रमांक 211) 87 किलोमीटर पट्ट्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे.
 • या नंतर पंजाबमधील फगवाडा-रूपनगरदरम्यान 80.82 किलोमीटर महामार्गाचे आणि ओडिशामध्ये अंगुल-संबलपूरदरम्यानच्या महामार्गाचे चौपदरीकरण केले जाईल.

खनिज शोधासाठी नवे राष्ट्रीय उत्खनन धोरण :

 • भूगर्भात असलेल्या विविध प्रकारच्या खनिजसाठ्यांचा शोध घेण्यासाठी प्राथमिक स्वरूपाचे उत्खनन करण्यासंबंधीच्या नव्या ‘नॅशनल मिनरल एक्प्लोरेशन पॉलिसी’ला केंद्रीय मंत्रिमंडळाने (दि.29) मंजुरी दिली.
 • तसेच यामुळे जेथे मोठे खनिजसाठे मिळू शकतात अशा सुमारे 100 संभाव्य खाणपट्ट्यांचा लिलाव करण्याचा मार्ग मोकळा होईल.
 • या धोरणानुसार भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्था, मिनरल एक्प्लोरेशन कॉर्पोरेशन यासारख्या सरकारी कंपन्यांखेरीज खासगी उद्योगांनाही या क्षेत्रात प्रवेश देऊन देशातील खाण उद्योगाला चालना देण्याची सरकारची योजना आहे.
 • जेथे खनिजे मिळू शकतात असे देशातील जेवढे क्षेत्र भूगर्भ सर्वेक्षण संस्थेने अंदाजित केले आहे, त्यापैकी जेमतेम 10 टक्के क्षेत्रात खनिजांचा शोध घेतला गेला आहे व त्यापैकी जेमतेम दीड-दोन टक्के क्षेत्रात सध्या खाणकाम सुरु आहे.

दिनविशेष :

 • 1758 : डॉमस्टाटलची लढाई.
 • 1805 : मिशिगनला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
 • 1905 : अल्बर्ट आईनस्टाईन यांनी त्यांचा क्रांतिकारक सापेक्षतेचा सिद्धांत मांडला.
 • 1936 : गॉन विथ द विंड ही कादंबरी प्रकाशित.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 जुलै 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World