Current Affairs of 28 June 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (28 जून 2016)
‘एमटीसीआर’ या गटात भारताचा समावेश :
- मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम (एमटीसीआर) या गटात सदस्य म्हणून (दि.27) भारताचा समावेश झाला आहे.
- तसेच या गटात समावेश झाल्याचा फायदा अण्वस्त्र प्रसाराचे जागतिक नियम सुधारण्यासाठी होणार असल्याचे मत भारताने व्यक्त केले आहे.
- जागतिक स्तरावरील निर्यात नियंत्रण गटात भारताचा प्रथमच समावेश झाला आहे.
- फ्रान्सचे भावी राजदूत अलेक्झांडर झिग्लर, नेदरलॅंडचे राजदूत अल्फोन्सस स्टोलिंग आणि लक्झेंग्बर्गचे परराष्ट्रमंत्री लॉरी ह्युबर्टी यांच्या उपस्थितीत परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी समावेशाच्या कागदपत्रांवर सही केली.
- तसेच हे तिनही देश ‘एमटीसीआर’चे सध्याचे पदाधिकारी देश आहेत.
- भारताचा समावेश झाल्याने या गटातील देशांची संख्या 35 झाली आहे.
- भारताला अणू पुरवठादार गटात (एनएसजी) समावेश न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर या दुसऱ्या महत्त्वाच्या गटात समावेश मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे.
- चीनच्या अडवणुकीच्या धोरणामुळे भारताचा ‘एनएसजी’ प्रवेश रोखला गेला आहे.
- विशेष म्हणजे, चीन हा ‘एमटीसीआर’चा सदस्य नसून, त्यांना काही वर्षांपूर्वी प्रवेश नाकारण्यात आला होता.
Must Read (नक्की वाचा):
21 ऑगस्टला डिपार्टमेंटल पीएसआय परीक्षा :
- गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या मर्यादित विभागीय उपनिरीक्षक परीक्षा होणार आहे.
- 21 ऑगस्टला मुंबईसह राज्यभरातील सात केंद्रावर 828 पदासाठी परीक्षा होणार आहे.
- तीन वर्षांपासून रखडलेल्या ‘डिपार्टमेंटल पीएसआय’ परीक्षेसाठी इच्छुक पोलिसांची संख्या 50 हजारांहून अधिक आहे.
- तसेच त्यांना 11 जुलैपर्यत एमपीएससीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे.
- या परीक्षेसाठी पदवीधर कॉन्स्टेबलसाठी 4 वर्षे व बारावी उर्त्तीण असलेल्यांसाठी 5 वर्षे सेवा पूर्ण असणे ही प्रमुख अट आहे.
- त्याचप्रमाणे वय 35 वर्षाहून अधिक नसावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्षांची सवलत असणार आहे.
- राज्य पोलीस दलात उपनिरीक्षकांची पदे थेट सरळ सेवा, मर्यादित विभागीय व खात्यातर्गंत परीक्षा या तीन पद्धतीने भरली जातात.
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून मेस्सीची निवृत्ती :
- अर्जेंटिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सीच्या कारकिर्दीचा अंत एका दु:खद आठवणीने झाला.
- दि.27 अर्जेंटिनाला कोपा अमेरिका स्पर्धेत अंतिम लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्याने नाट्यमय घडामोडीत आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली.
- क्लब लढतीत विक्रमांचे डोंगर रचणारा मेस्सी देशासाठी कोणतीही महत्त्वाची स्पर्धा जिंकून देण्यात अपयशी ठरला होता.
- 2014 पासून अर्जेंटिना संघाला प्रतिष्ठेच्या तीन स्पर्धांमध्ये अंतिम लढतीत पराभव स्वीकारावा लागला आहे.
- 2007 मध्ये कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम लढतीत पराभव स्वीकारणाऱ्या अर्जेंटिना संघात मेस्सीचा समावेश होता.
ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका विजयी :
- विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाने तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात वेस्टइंडीजचा 59 धावांनी सहज पराभव करत तिरंगी मालिकेचे विजेतेपद मिळविले आहे.
- वेस्टइंडीजमध्ये खेळविण्यात आलेल्या या तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका संघाचा समावेश होता.
- (दि.26) झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर वेस्टइंडीजचा संघ निष्प्रभ ठरला.
- ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने निर्णायक क्षणी केलेल्या 57 धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 270 धावांपर्यंत मजल मारली होती.
ग्रामज्योती योजनेमार्फत 145 गावात होणार विद्युतीकरण :
- देशातील 145 गावांचे दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेच्या माध्यमातून विद्युतीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.
- केंद्राच्या या निर्णयामुळे या गावांमधील अंधाराचे साम्राज्य दूर होणार आहे.
- देशातील खेड्यांना विद्युतीकरणामध्ये स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने केंद्राने पावले उचलण्यास सुरवात केली असून, त्याचाच एक भाग म्हणून 145 गावांचे विद्युतीकरण करण्यात येणार आहे.
- आसाममधील 67 गावे, झारखंडमधील 16 गावे, मेघालयमधील 29 गावे, बिहार व राजस्थानमधील 8 गावे, ओडीशामधील 11 गावे, मध्य प्रदेशातील 3, छत्तीसगडमधील 2 गावांचा, तर उत्तर प्रदेशातील एका गावाचा यामध्ये समावेश आहे.
- दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत देशातील 8,529 खेड्यांचे विद्युतीकरण केले आहे.
दिनविशेष :
- 1921 : पी.व्ही. नरसिंहराव, भारताचे माजी पंतप्रधान यांचा जन्म.
- 1937 : गंगाधर पानतावणे साहित्यिक व समीक्षक यांचा जन्म.
- 1960 : क्युबाने खनिज तेल शुद्धिकरण कारखान्यांचे राष्ट्रीयकरण केले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा