Current Affairs of 27 June 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (27 जून 2016)
भारतासाठी अमेरिकेचे 99 टक्के तंत्रज्ञान :
- अमेरिकेशी संरक्षण सहकार्य करार केलेल्या देशांपैकी केवळ भारतालाच लवकरच अमेरिकेच्या अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानापैकी 99 टक्के तंत्रज्ञानाचा वापर करता येणार आहे.
- अमेरिकेने भारताला “महत्त्वाचा संरक्षण सहकारी” म्हणून जाहीर केल्यामुळे भारताला हा फायदा होणार असल्याचे अमेरिकी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
- “भारताला हा दर्जा दिला गेला असल्याने आमच्या इतर सहकाऱ्यांना न मिळू शकणारी माहिती भारताला मिळणार आहे, अमेरिकेने असा दर्जा दिलेला भारत हा एकमेव देश आहे,’ असे या अधिकाऱ्याने सांगितले.
- काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची अमेरिकेत भेट घेतली होती.
- तसेच त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ओबामा यांनी भारताला हा दर्जा देत असल्याचे जाहीर केले होते.
Must Read (नक्की वाचा):
आशा कुमारी यांची कॉंग्रेस प्रभारीपदी निवड :
- कॉंग्रेसच्या सरचिटणीस आशा कुमारी यांची पंजाब कॉंग्रेस कमिटीच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- पंजाब दंगल प्रकरणावरून तत्कालीन प्रमुख कमल नाथ यांना भारतीय जनता पक्ष, तसेच आम आदमी पक्षाने लक्ष्य केल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
- तसेच त्यानंतर आशा कुमारी यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
- कुमारी या हिमाचल प्रदेशमधील डलहैसी मतदारसंघातून आमदार आहेत.
- कॉंग्रेस पक्षासाठी त्यांनी आत्तापर्यंत उल्लेखनीय योगदान दिले आहे.
रियो ऑलिम्पिकसाठी भारताचे 100 खेळाडू पात्र :
- ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताचे प्रथमच शंभरपेक्षा जास्त खेळाडू पात्र ठरले आहेत.
- रियोला जाणाऱ्या विविध खेळांच्या पथकांची संख्या 103 झाल्यामुळे आतापर्यंत खेळाडू पात्रतेची सेंच्युरी साजरी केली आहे.
- तसेच आतापर्यंत हा सर्वांत मोठा संघ असणार आहे.
- (दि.26) अॅथलेटिक्स प्रकारात तीन, तर आर्चरीमध्ये एका खेळाडू रियोचे तिकीट मिळविल्यानंतर भारताची संख्या 103 वर गेली आहे.
- तसेच यापूर्वी 2012 लंडन ऑलिम्पिसाठी 13 क्रीडा प्रकारात 83, 2008 मध्ये बीजिंगसाठी 12 क्रीडा प्रकारासाठी 57, 2004 मध्ये अथेन्ससाठी 14 क्रीडा प्रकारात 73, 2000 मध्ये सिडनीसाठी 8 क्रीडा प्रकारांत 65, 1996 मध्ये अटलांटामध्ये 13 क्रीडा प्रकारासाठी 49, तर 1992 मध्ये बार्सिलोना येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 53 खेळाडू पात्र झाले होते.
शरद पवार यांना ‘शाहू’ पुरस्कार प्रदान :
- देशापुढील आजच्या आर्थिक, सामाजिक अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे राजर्षी शाहू महाराजांच्या अलौकिक विचारांमध्ये आहेत.
- तसेच त्यांनी देशातील परिवर्तनाच्या चळवळीला दृष्टी देण्याचे काम केले.
- असा थोर राजा या नगरीमध्ये होऊन गेला हे आपले भाग्यच म्हटले पाहिजे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी (दि.26) शाहू विचारांचा गौरव केला.
- राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा अत्यंत मानाचा ‘शाहू’ पुरस्कार शरद पवार यांना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
- अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे पालकमंत्री व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील होते.
- तसेच मानाचा कोल्हापुरी फेटा, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि 1 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
आयफा चित्रपट पुरस्कार 2016 :
- आयफा चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘बाजीराव मस्तानी’ तील भूमिकेसाठी रणवीरसिंगला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि ‘पिकू’तील भूमिकेसाठी दीपिका पदुकोणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
- स्पेनमधील माद्रिद शहरात झालेल्या या 17 व्या आयफा पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची उपस्थिती होती.
- तसेच या पुरस्कार सोहळ्यात रणवीरसिंग, दीपिका पदुकोण व प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाने बाजी मारली.
- ‘बाजीराव-मस्तानी‘साठी संजयलीला भन्साळी यांना सर्वोत्कृष्ट दिर्ग्दशकाचा, तर सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.
- या सोहळ्यात ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाला एकूण नऊ पुरस्कार मिळाले.
दिनविशेष :
- अमेरिका एच.आय.व्ही. चाचणी दिन.
- 1864 : शिवराम महादेव परांजपे, ‘काळ’ या वृत्तपत्राचे संपादक व प्रखर राष्ट्रीय नेते यांचा जन्म.
- 1967 : लंडनजवळ एन्फिल्ड येथे जगातील पहिले ए.टी.एम. (Automated teller machine) सुरू झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा