Current Affairs of 29 August 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (29 ऑगस्ट 2017)
दीपक मिश्रा सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश :
- देशाचे 45वे सरन्यायाधीश म्हणून न्या. दीपक मिश्रा (वय 64 वर्षे) यांचा 28 ऑगस्ट रोजी शपथविधी झाला.
- राष्ट्रपती भवनात त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली. त्यांचा कार्यकाळ 2 ऑक्टोबर 2018 पर्यंत आहे. सरन्यायाधीश जे.एस. खेहर हे 27 ऑगस्ट रोजी निवृत्त झाले.
- निर्भया बलात्कार व हत्या खटल्यात चार दोषींना देहदंडाची शिक्षा कायम करण्यांना खंडपीठात मिश्रा यांचा समावेश होता. चित्रपटगृहांत राष्ट्रगीताचे गायन बंधनकारक करण्याचा आदेशही त्यांचाच होता.
- तसेच याकुब मेमनच्या फाशीची सुनावणी त्यांनी मध्यरात्री घेतली होती. प्रघातानुसार मिश्रा यांचे नाव सरन्यायाधीश खेहर यांनी गेल्या महिन्यात सरन्यायाधीश पदासाठी सुचवले होते.
- शपथविधीला उपराष्ट्रपती एम.व्यंकया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद व अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
Must Read (नक्की वाचा):
देशाला सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी जपानची मदत :
- रेल्वे अपघातांचे सत्र सुरु असतानाच आता रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारताने जपानची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
- जपानमधील रेल्वे सुरक्षा तज्ज्ञांचे पथक भारत दौऱ्यावर आले असून रेल्वे मंत्रालयातील अधिकारी आणि भारतातील रेल्वे सुरक्षा तज्ज्ञांशी हे पथक चर्चा करणार आहे.
- रेल्वे सुरक्षा तज्ज्ञांचे पथक पाठवावे, अशी विनंती जुलै महिन्यात भारताने जपानला केली होती.
- जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्या भारत दौऱ्याआधी जपान सरकारने रेल्वे सुरक्षा तज्ज्ञांचे पथक भारतात पाठवले आले.
- तसेच हे पथक पाच दिवसांसाठी भारतात आले असून जपानच्या दूतावासाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती देण्यात आली.
लष्कराची ताकद वाढविणारे आधुनिक क्षेपणास्त्र :
- भारतीय लष्कराच्या ताफ्यात आता मध्यम पल्ल्याचे आधुनिक क्षेपणास्त्र दाखल होणार आहे. या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रामुळे 70 किलोमीटरच्या परिसरात मारा करता येणार आहे.
- तसेच हे क्षेपणास्त्र शत्रू्ने पाठविलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र, लढाऊ विमान, ड्रोन किंवा हेलिकॉप्टर तातडीने नष्ट करू शकणार आहे.
- डीआरडीओने इस्त्रायलच्या आयएआय कंपनीसोबत या नव्या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यासाठी हातमिळवणी केली आहे अशी माहिती भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.
- तसेच पुढील तीन वर्षात म्हणजेच 2020 पर्यंत हे क्षेपणास्त्र लष्कराच्या ताफ्यात दाखल होईल.
- मध्यम पल्ल्याचे हे क्षेपणास्त्र हवेत मारा करू शकणार आहे, त्यामुळे युद्ध झाले तर याचा उपयोग करणे ही एक महत्त्वाची रणनीती असेल असेही लष्कराच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
- डीआरडीओने या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी आयएआयसोबत 17 हजार कोटींची तरतूद केली आहे. हे क्षेपणास्त्र 360 अंशात फिरून मारा करू शकणारे क्षेपणास्त्र आहे.
दिनविशेष :
- बापुजी अणे (माधव श्रीहरी अणे) यांचा जन्म 29 ऑगस्ट 1880 मध्ये झाला.
- 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब अंबेडकर (मुळ नाव भीमराव रामजी आंबेडकर) यांना भारतीय घटना समितीचे अध्यक्षपद देण्यात आले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा