Current Affairs of 30 August 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (30 ऑगस्ट 2017)
राज्यात 29 ऑगस्ट अवयवदान दिन म्हणून साजरा :
- राज्यात अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या आणि अवयव दानाचे प्रमाण व्यस्त आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना अवयव मिळत नाही. हे चित्र बदलण्यासाठी अवयव दानासंदर्भात जनजागृती व्हावी आणि अवयव दान मोहिमेत जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढावा, यासाठी दरवर्षी 29 ऑगस्ट हा दिवस ‘अवयव दान दिन’ म्हणून साजरा करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी घोषित केले.
- अवयव दान जागृती संदर्भात मरीन ड्राइव्ह येथे सुमारे 12 हजार लोकांची दोन किलोमीटर लांबीची मानवी साखळी तयार करण्यात आली होती.
- अवयवदान संदर्भात जनजागृतीसाठी राज्यपातळीवर अभियान हाती घेण्यात आले आहे. शहरांबरोबरीनेच गाव पातळीवर ही मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रत्येक गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
- अवयवदानात महाराष्ट्र राज्य हे देशात दुसर्या क्रमांकावर आले आहे. यापूर्वी ते सहाव्या क्रमांकावर होते. या विषयी जाणीव जागृती केल्यामुळे अवयवदात्यांची संख्या वाढत आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवयवदान अभियानास महोत्सव स्वरूपात साजरे करण्याचे ‘मन की बात’ या कार्यक्रमातून सूचित केले होते.
Must Read (नक्की वाचा):
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार :
- रिओ पॅरालिम्पिकचा सुवर्णविजेता भालाफेकपटू देवेंद्र झझारिया आणि हॉकीस्टार सरदारसिंग यांना 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- राष्ट्रपती भवनात आयोजित शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत देशाचा गौरव वाढविणारे खेळाडू, कोचेस, मार्गदर्शकांचा अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
- 2004 च्या अथेन्स तसेच मागच्या वर्षीच्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये झझारियाने सुवर्णपदक जिंकले. सरदारसिंगच्या नेतृत्वात भारताने अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. या दोघांच्या कर्तृत्वाचा गौरव म्हणून यंदा दोघांना संयुक्तपणे प्रत्येकी साडेसात लाख रोख, प्रशस्तिपत्र व खेलरत्न पदक देण्यात आले.
- तसेच हा पुरस्कार मिळविणारा देशाचा पहिला दिव्यांग खेळाडू असलेल्या झझारियाने दोन्ही सुवर्णपदके मिळविताना विश्वविक्रमाची नोंद केली होती. याशिवाय 2013च्या विश्व पॅराअॅथलेटिक्स स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले.
- वयाच्या 22 व्या वर्षी 2008 मध्ये सुल्तान अझलन शाह हॉकी स्पर्धा जिंकून देणारा सरदार हा सर्वांत तरुण कर्णधार ठरला होता. याशिवाय दोन आशियाई पदके जिंकून दिल्याबद्दल याआधी त्याचा ‘पद्मश्री’ देऊन गौरव करण्यात आला आहे.
बोइंग भारतात उभारणार सुपर हॉर्नेट विमानांचा कारखाना :
- भारतीय नौदल आणि वायुदलाची लढाऊ विमानांची गरज पूर्ण करण्यासाठी कंपनीला पुरवठ्याचे कंत्राट मिळाल्यास भारतात एफ/ए-18 सुपर हॉर्नेट लढाऊ विमानांचा कारखाना उभारण्याची तयारी बोइंग कंपनीने दाखविली आहे.
- भारतीय नौदलाचा आपल्या ताफ्यासाठी 57-मल्टिरोल कॅरिअरबोर्न लढाऊ विमाने घेण्याचा बेत आहे. तेव्हा बोइंगची एफ/ए-18 लढाऊ विमाने भारतीय नौदलासाठी योग्य ठरतील, असे बोइंगचे म्हणणे आहे. भारतात या लढाऊ विमानांचा कारखाना स्थापन करण्याच्या दृष्टीने आम्ही वाटाघाटी करीत आहोत.
- सुपर हॉर्नेस्ट विमान अत्याधुनिक आहे. भारतातही ही विमाने तयार केली जाऊ शकतात, असे बोइंगच्या एफ/ए-18 या प्रकल्पाचे उपाध्यक्ष डॅन गिलियन यांनी सांगितले.
कैलास शिंदे सातारा जिल्हा परिषदेच्या नवे मुख्य कार्यकारी अधिकारी :
- सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्री कक्षातील उपसचिव कैलास शिंदे यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले.
- सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची यवतमाळ जिल्हाधिकारीपदी बदली झाली.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील उपसचिव कैलास शिंदे यांची नुकतीच महसूल व्यतिरिक्त खात्यातून नुकतीच आय.ए.एस म्हणून पदोन्नती झाली होती. त्यांनी मंत्रालयातून डेस्क ऑफिसर या पदापासून शासकीय सेवाला प्रारंभ केला. त्यानंतर उपसचिव व आता ‘सीईओ‘ पदापर्यंत मजल मारली. ते प्रशिक्षण पूर्ण करून लवकरच कार्यभार स्वीकारतील.
- डॉ. देशमुख यांनी एमपीएससी परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून उपजिल्हाधिकारी पदापासून शासकीय सेवेला प्रारंभ केला.
- डॉ. देशमुख हे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे स्वीय सहायक होते. त्यावेळी त्यांना आय.ए.एस. म्हणून पदोन्नती मिळाली. त्यानंतर त्यांना सातारा जिल्हा परिषदेच्या ‘सीईओ’ पदाची जबाबदारी मिळाली.
दिनविशेष :
- अणुयुगाचा निर्माता ‘रुदरफ़ोर्ड अर्नेस्ट’ यांचा जन्म 30 ऑगस्ट 1871 मध्ये झाला.
- 30 ऑगस्ट 1975 मध्ये पहिले बालकुमारी साहित्य संमेलन झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा