Current Affairs of 28 August 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (28 ऑगस्ट 2017)

चालू घडामोडी (28 ऑगस्ट 2017)

पुणे शहरात प्रथमच निर्माल्य खत प्रकल्प :

 • निर्माल्य व्यवस्थापनासाठी पुण्यातील तीन रोटरी क्लबने पुढाकार घेतला असून, गणेशोत्सवात पालिकेच्या सहकार्याने प्रथमच पुण्यात निर्माल्य खतनिर्मिती प्रकल्प सुरू होत आहे.
 • हा प्रकल्प 27 ऑगस्टपासून कार्यरत झाली असल्याची माहिती रोटरी क्लबच्या वतीने पुणे रोटरी वॉटर कमिटी प्रमुखजलप्रेमी सतीश खाडे यांनी पत्रकाद्वारे दिली.
 • गणेशपूजा, आरतीसाठी सार्वजनिक मंडळे आणि घरांमध्ये शेकडो टन फुले, दुर्वा वापरल्या जातात. त्याचे विसर्जन गणेशमूर्ती विसर्जनावेळी केले जाते. पालिकेतर्फे या निर्माल्याचे नदीत विसर्जन होऊन नदी प्रदूषित होऊ नये, म्हणून जागोजागी घाटांवर, पुलांवर निर्माल्य कलश उभारले जातात.
 • मात्र, या निर्माल्यातून खतनिर्मिती करुन पालिका हद्दीतील बागांमध्ये वापरण्याचा प्रकल्प रोटरीच्या पुढाकाराने पुण्यात प्रथमच सुरू होत आहे.
 • तसेच या प्रकल्पात निर्माल्याचे श्रेडरद्वारे बारीक तुकडे करुन कंपोस्ट खत केले जाणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 ऑगस्ट 2017)

श्रीलंकेविरुद्ध भारताचा मालिका विजय निश्चित :

 • जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीसमोर शरणागती पत्करणाऱ्या श्रीलंकेला नंतर रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनीच्या फटकेबाजीमुळे तिसऱ्या सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला.
 • भारताने हा सामना सहा गडी राखून जिंकताना पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली.
 • प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला भारताने 9 बाद 217 असे रोखले. लाहिरू थिरीमन्ने याने अर्धशतकी खेळी केली; पण बुमरासमोर त्यांचे अन्य फलंदाज निष्प्रभ ठरले. त्याने पाच गडी बाद केले.
 • भारताने 4 बाद 218 धावा केल्या. रोहित शर्माचे शतक आणि धोनीची मोलाची अर्धशतकी साथ यामुळे भारताचा विजय साकार झाला.

इराकमधील एक शहर इसिसच्या जाचातून मुक्त :

 • इराकमधील एक महत्त्वपूर्ण शहर असलेल्या ताल अफारवर इराकी सैन्याने नियंत्रण मिळविल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.
 • इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेचे सैन्यास इराकी सैन्याने पराजित केले आहे.
 • या शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये इराकचे सैन्य घुसले असून शहरामधील ऐतिहासिक किल्लाही जिंकण्यात इराकी सैन्यास यश आले आहे.
 • पश्‍चिम आशियातील ओटोमान तुर्क साम्राज्य काळात बांधण्यात आलेला हा किल्ला आहे. या किल्ल्यावर पुन्हा एकदा इराकचा झेंडा फडकाविण्यात आला आहे.
 • तसेच जुलै महिन्यात मोसूल या इराकमधील शहरामध्ये इसिसविरोधात निर्णायक जय मिळविल्यानंतर आत्मविश्‍वास वाढलेल्या इराकी सैन्याने उर्वरित देशामध्येही आपली पकड अधिक मजबूत करण्याच्या उद्देशार्थ कारवाई सुरु केली आहे.

जपानमध्ये भारतीय रेल्वेचे प्रतिनिधित्व मकरंद भारकेकडे :

 • देशातील उद्योग वृद्धींगत व्हावा याकरिता चतुक्षकोणातील मार्गांना मालवाहू ट्रेनद्वारे जोडण्याचे काम केंद्राद्वारे सुरू आहे.
 • तसेच या उपक्रमांतर्गत वेस्टर्न डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडव्दारे जोडला जाणारा दिल्ली (रेवाळी) वडोदरा मार्गावरील इलेक्ट्रिकल्स आणि मेकॅनिकलचे काम अकोल्याचे मकरंद भाकरे यांचेकडे सोपविण्यात आले. त्याकरिता लागणारे पार्ट खरेदीकरण्यापूर्वी त्यांची तपासणी करण्याकरिता त्यांना जपान येथे 10 दिवसीय दौऱ्यावर पाठविण्यात आले आहे.
 • केंद्र सरकारच्या उपक्रमानुसार देशातील मोठ्या शहरांना जसेकी दिल्ली ते कोलकत्ता, दिल्ली ते मुंबई, मुंबई ते मद्रास, मद्रास ते कोलकत्ता या व त्यामार्गे येणाऱ्या शहरांना रेल्वे मार्गांनी जोडून मालवाहू रेल्वेव्दारे उद्योगवृद्धीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे.
 • पहिल्या फेजमध्ये दिल्ली ते वडोदरा या 950 कि.मी. मालवाहू रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. त्या अंतर्गत दिल्ली (रेवाळी) ते वडोदरा मार्गावरील इलेक्ट्रिकल्स बाबतची जबाबदारी वेस्टर्न डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.च्या प्रोजेक्टनुसार रेवाळी येथे कार्यरत अकोल्याचे मकरंद भाकरे यांचेकडे दिलेली आहे.

दिनविशेष :

 • भारतीय पदार्थवैज्ञानिक एम.जी.के. मेनन यांचा जन्म 28 ऑगस्ट 1928 मध्ये झाले.
 • 28 ऑगस्ट 1969 हा भारतीय स्वातंत्र्यसैनिक ‘रावसाहेब पटवर्धन’ यांचा स्मृतीदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 ऑगस्ट 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.