Current Affairs of 27 August 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (27 ऑगस्ट 2017)

चालू घडामोडी (27 ऑगस्ट 2017)

सॉन वॅन हो याच्याविरुद्ध श्रीकांतची हार :

  • किदांबी श्रीकांतच्या पराभवामुळे जागतिक बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीतील पदकांचा दुष्काळ तीन तपांनंतर संपवण्याची प्रतीक्षा कायम राहिली.
  • त्याला उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित सॉन वॅन हो याच्याविरुद्ध हार पत्करावी लागली.
  • जागतिक क्रमवारीत आठव्या असलेल्या श्रीकांतने या स्पर्धेत नेटजवळ हुकूमत राखली होती; पण या वेळी त्याला हेच जमले नाही आणि त्याचबरोबर खेळाची गती आपल्याला अनुकूल अशी राखण्यातही तो अपयशी ठरला.
  • त्याला अखेर 49 मिनिटे चाललेल्या या लढतीत 14-21, 18-21 अशा पराभवास सामोरे जावे लागले.
  • त्यामुळे भारताची या स्पर्धेतील पुरुष एकेरीत पदक जिंकण्याची अपेक्षा 34 वर्षांनंतरही पूर्ण झाली नाही.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 ऑगस्ट 2017)

उपांत्य फेरीसह साईनाचेही ब्रॉंझ नक्की :

  • भारतीय वेळेनुसार मध्यरात्री साईनानेही उपांत्य फेरीत धडक मारली.
  • यामुळे भारताला स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच दोन पदके मिळतील.
  • साईनाने यजमान देशाच्या कर्स्टी गिल्मोर हिला उपांत्यपूर्व फेरीत तीन गेममध्ये हरविले.

अस्थिशल्य विशारद डॉ़ के.एच संचेती यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर :

  • पुणेकरांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रात मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार यंदा ज्येष्ठ अस्थिशल्य विशारद डॉ़ के. एच़ संचेती यांना जाहीर झाला आहे.
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पुरस्कार प्रदान होणार आहे.

थायलंडच्या माजी पंतप्रधान शिनावात्रा यांचे देशातून पलायन :

  • सर्वोच्च न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलेले असताना थायलंडच्या माजी पंतप्रधान यिंगलक शिनावात्रा या शुक्रवारी न्यायालयात उपस्थित राहणे अपेक्षित होते, पण त्या आल्याच नाहीत.
  • त्यांना या खटल्यात दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
  • थायलंडच्या पहिल्या महिला पंतप्रधान असलेल्या यिंगलक या देशातून पळून गेल्या असल्याचे स्पष्ट झाले.

तृतीयपंथींना लष्करात भरती करण्यावर बंदी :

  • लष्करात तृतीयपंथींना भरती करण्याचा ओबामा यांचा आदेश विद्यमान अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फिरवला असून, समलिंगी व्यक्तींना लष्करात भरती करण्यास बंदी घातली आहे.
  • ट्रम्प यांनी काल व्हाइट हाऊसने याबाबत जारी केलेल्या आदेशावर स्वाक्षरी केली.
  • त्यात संरक्षण मंत्री, अंतर्गत सुरक्षा मंत्री यांना समलिंगी व्यक्तींना लष्करात प्रवेशबंदी करण्याचा आदेश लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • ओबामांनी समलिंगी व्यक्तींना लष्करात प्रवेश देण्याचे धोरण जाहीर केले होते. त्यानुसार लिंगबदल शस्त्रक्रियांना परवानगीही देण्यात आली होती.
  • बंदी आदेशाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू करण्याची योजना 21 फेब्रुवारी 2018 पर्यंत पेंटॅगॉनने जाहीर करावी व ती 23 मार्च 2018 पासून लागू करावी असे सांगण्यात आले आहे.

दिनविशेष :

  • 1962: नासा चे मानव-विरहित यान मरिनर 2 चे शुक्राकडे प्रस्थान

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 ऑगस्ट 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.