Current Affairs of 28 September 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (28 सप्टेंबर 2017)
गुगलचा आज 19 वा वाढदिवस :
- इंटरनेट जगतातील सर्व नेटकऱ्यांसाठी अत्यंत लोकप्रिय असलेल्या लाडक्या गुगलचा आज 19 वा वाढदिवस आहे.
- मेन्लो पार्कमधील सुसान वोजसिकी गॅरेजमध्ये लॅरी पेज व सर्जेई ब्रिन यांनी 27 सप्टेंबर 1998मध्ये लावलेल्या छोट्याशा गुगलच्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे.
- वोजसिकी सध्या गुगल कंपनीच्या उपाध्यक्ष आहेत.
- 10 ऑगस्ट 2015 पासून सुंदर पिचाई गुगलच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदासाठी निवड झाली.
- गुगल हे नाव Googol या मूळ इंग्रजी नावावरून आले आहे.
- एकावर शंभर शून्य ह्या मोठ्या संख्येचे Googol हे नाव आहे.
Must Read (नक्की वाचा):
फॉर्च्युन नियतकालिकाने जारी केली शक्तिशाली महिलांची यादी :
- चंदा कोचर आणि शिखा शर्मा या दोन भारतीय महिलांनी अमेरिकेबाहेरील व्यावसायिक क्षेत्रातील जगातील सर्वांत शक्तिशाली महिलांच्या यादीत नव्याने स्थान मिळविले आहे.
- फॉर्च्युन नियतकालिकाने जारी केलेल्या या यादीत इंद्रा नुयी यांनी अमेरिका आवृत्तीत पहिल्या तीन महिलांत स्थान पटकावले आहे.
- अमेरिकेबाहेरील जगातील सर्वांत शक्तिशाली व्यावसायिक महिला होण्याचा मान बँको सँटांडेर समूहाच्या कार्यकारी चेअरमन अॅना बोटीन यांनी पटकावला आहे.
- या यादीत आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व सीईओ चंदा कोचर पाचव्या स्थानी असून, अॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व सीईओ शिखा शर्मा 21व्या स्थानी आहेत.
- पेप्सीकोच्या चेअरमन आणि सीईओ इंद्रा नुयी यांनी अमेरिकेतील सर्वांत शक्तिशाली महिला व्यावसायिकांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.
- पहिल्या स्थानी जनरल मोटर्सच्या चेअरमन मॅरी बारा या आहेत. तिस-या स्थानी लॉकहीड मार्टिनच्या चेअरमन व सीईओ मेरीलीन हेवसन या आहेत.
‘प्लेबॉय’चे जनक ह्यू हेफनर यांचे निधन
- ‘प्लेबॉय’ या जगप्रसिद्ध मासिकाचे जनक ह्यू हेफनर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 91 वर्षांचे होते.
- 1953 मध्ये ह्यूज हेफनर यांनी ‘प्लेबॉय’ मासिकाची सुरूवात केली. केतील टपाल विभागाने ‘प्लेबॉय’ मासिक घरपोच देण्यास नकार दिल्यानंतर ह्यू हेफनर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
केंद्र सरकारमधील डॉक्टरांचे निवृत्तीचे वय 65 वर्ष :
- मोदी सरकारने केंद्रीय डॉक्टरांना दिवाळीपूर्वीच खूशखबर दिली आहे.
- केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी केंद्रीय आरोग्य सेवेशिवाय इतर डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा 62 वरून 65 वर्षे इतकी केली आहे.
- या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.
भारत अमेरिकेकडून 22 ड्रोन खरेदी करणार :
- अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस हे या आठवड्यात भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण संबंधांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
- इतकेच नाही तर 22 मानवरहित ड्रोन खरेदीच्या योजनेलाही या दौऱ्यादरम्यान मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
- समुद्री सीमांवर नजर ठेवण्यासाठी भारत या ड्रोनचा वापर करण्याची शक्यता आहे.
- जर या योजनेला मंजुरी मिळाली तर भारतीय नौदलाकडे जगातील सर्वात प्रगत शैलीचे ड्रोन असतील यात शंकाच नाही.
- या ड्रोनद्वारे चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या कारवायांना उत्तर देणे शक्य होणार आहे.
- ड्रोनची ताकद भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढवण्यात हातभार लावणार आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा