Current Affairs of 28 October 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (28 ऑक्टोबर 2016)
यू-ट्युब’ ठरतंय ‘गुगल’साठी सर्वांत फायदेशीर :
- ‘गुगल’च्या विविध सुविधांपैकी अर्थकारणाच्या दृष्टीने ‘यू-ट्युब’ सर्वाधिक फायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. तंत्रज्ञानाशी चटकन जुळवून घेणाऱ्या नव्या पिढीसाठी ‘यू-ट्युब’ हे केबल टीव्हीपेक्षाही अधिक महत्त्वाचे असल्याचे निष्कर्ष विविध सर्वेक्षणांतून समोर आले आहे.
- ‘यू-ट्युब’कडे वाढत चाललेल्या जाहिरातींच्या प्रमाणामुळे या सुविधेचा ‘गुगल’च्या उत्पन्नात लक्षणीय वाटा आहे. ‘गुगल’ने गुरुवार तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला.
- तसेच ‘गुगल’ची मातृसंस्था असलेल्या ‘अल्फाबेट’ या कंपनीला गतवर्षीच्या तिसऱ्या तिमाहीपेक्षा तब्बल 27 टक्के जास्त उत्पन्न मिळाले आहे. यंदाच्या तिसऱ्या तिमाहीअखेरचे ‘अल्फाबेट‘चे उत्पन्न 5.1 अब्ज डॉलर इतके होते.
Must Read (नक्की वाचा):
गुणपत्रिका, पदव्याही आता होणार डिजिटल :
- केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ प्रकल्पाचा एक भाग असलेल्या ‘नॅशनल ऍकॅडमिक डिपॉझिटरी’ (एनएडी) या महत्त्वाकांक्षी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील. यामुळे देशातील सर्व शालेय मंडळे, मान्यताप्राप्त विद्यापीठे आणि शिक्षणसंस्थांच्या गुणपत्रिका तसेच पदवी प्रमाणपत्रेही डिजिटल स्वरूपात उपलब्ध होतील.
- तसेच हे देशातील प्रत्येक शिक्षणसंस्थेला बंधनकारक राहणार आहे.
गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री शशिकला काकोडकर कालवश :
- गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांचे निधन झाले. त्या 85 वर्षे वयाच्या होत्या.
- मुक्त गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या त्या कन्या होत.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा