Current Affairs of 26 October 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (26 ऑक्टोबर 2016)

चालू घडामोडी (26 ऑक्टोबर 2016)

हॉकी स्पर्धेत भारताचा चीनवर विजय :

 • आशियाई चॅम्पियन चषक हॉकी स्पर्धेत अव्वल मानांकित भारताने चीनचा 9-0 अशा फरकाने पराभव करत दणदणीत विजय मिळवला.
 • भारताच्या खेळाडूंनी आपले धैर्य आणि संयम राखत सामना एकतर्फी जिंकत चीनच्या हॉकीपटूंना जोरदार उत्तर दिले.
 • भारताकडून शानदार खेळी करताना आकाशदीप सिंग, अफ्फान युसूफ आणि जसजित सिंग यांनी प्रत्येकी दोन गोल केले.
 • भारताने आपल्या पहिल्या सामन्यात जपान संघाचा 10-2 असा पराभव केला होता.
 • तसेच दुस-या सामन्यात भारताला कोरियाविरुद्ध 1-1 गोल बरोबरीत समाधान मानावे लागले होते. तर पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकचा 3-2 ने पराभव केला होता.
 • चार सामन्यातील तिसऱ्या विजयासह भारताच्या खात्यात 10 गुण जमा झाले आहेत.
 • तर ग्रुपमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे आणि मलेशिया 9 गुणासह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.

प्रदीप पाटील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी :

 • जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रदीप प्रेमचंद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर राव यांनी नियुक्तीची घोषणा केली.
 • डॉ. पाटील हे सध्या ‘उमवि’च्या पदार्थ विज्ञान विभागाच्या स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेस येथे प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे.
 • डॉ. सुधीर मेश्राम यांचा कार्यकाळ 7 सप्टेंबर 2016 मध्ये पूर्ण झाल्यानंतर नाशिकचे विभागीय आयुक्त एकनाथ डवळे यांना कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.
 • डॉ. पाटील यांनी भौतिकशास्त्र या विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून प्राविण्यासह एम. एससी. ही पदवी प्राप्त केली असून पुढे त्याच विषयात पीएच. डी. सुद्धा प्राप्त केली आहे.
 • डॉ. पाटील यांना शिक्षण, संशोधन व प्रशासन या क्षेत्रात व्यापक अनुभव आहे.
 • नव्या कुलगुरु च्या निवडीसाठी राज्यपालांनी पाटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश न्या. एल. नरसिम्हा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती.

पॉल बेट्टी यांना ‘मॅन बुकर’ पुरस्कार प्रदान :

 • अमेरिकेचे लेखक पॉल बेट्टी यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘मॅन बुकर’ पुरस्कार देण्यात आला.  
 • साहित्यातील पुरस्काराच्या इतिहासात प्रथमच अमेरिकन लेखकाला हा पुरस्कार मिळाला आहे.
 • पॉल बेट्टी यांच्या प्रसिद्ध ‘द सेलआऊट’ या कादंबरीला हा पुस्कार मिळाला.
 • चार तास चाललेल्या बैठकीनंतर परिक्षकांनी एकमताने ‘मॅन बुकर’ पुरस्कारासाठी लेखक पॉल बेट्टी यांच्या ‘द सेलआऊट’ या कादंबरीची निवड केली.
 • तसेच या पुरस्कारासाठी 50 हजार पौंड बक्षिस स्वरुपात देण्यात येणार असल्याची माहिती परिक्षक अमांडा फोरेमन यांनी दिली.
 • अमेरिकेतील कृष्णवर्णीय-आफ्रो अमेरिकी वंशाच्या एकेकाळच्या गुलामांची बहुसंख्या असलेले एक शहरच पुसले जाणे, ते पुन्हा वसवताना श्वेतवर्णीयांना खालची वागणूक देण्याचा आटोकाट प्रयत्न होणे, असे अचाट कथानक ‘द सेलआऊट’ या कादंबरीत पाहावयास मिळते.

तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर :

 • लोकाभिमुख कामांमुळे राजकीय रोषाला कारणीभूत ठरलेले नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अखेर अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाला.
 • अपक्षांसह शिवसेना, काँगे्ग्रेस व राष्ट्रवादीच्या 104 नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर भाजपाच्या सहा नगरसेवकांनी मुंढेंचे समर्थन केले.
 • पाच महिन्यांपूर्वी आयुक्तपदी आल्यापासून मुंढे यांनी अतिक्रमण, अवैध बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम उघडली होती.
 • तसेच त्यांना जनतेतून पाठिंबा होता, मात्र या कारवाईमुळे दुखावलेल्या नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला.
 • 25 ऑक्टोबर रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सभागृह नेते जे.डी. सुतार यांनी अविश्वास ठराव मांडला.
 • मुंढे यांनी महापौर व नगरसेवकांचा वारंवार अवमान केला आहे. मनमानीपणे कामकाज करत असल्यामुळे त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणल्याचे स्पष्ट केले.

नाशिकच्या रुंग्टा ग्रुपला राज्यस्तरीय पुरस्कार :

 • नाशिक येथील बांधकाम व्यवसायातील अग्रणी असलेल्या रुंग्टा ग्रुपला राज्य शासनाच्या वतीने पुरस्कार देण्यात आला आहे.
 • तसेच या समूहाने परवडणारी घरे तयार केल्याबद्दल हा बहुमान देण्यात आला.
 • राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समूहाचे व्यवस्थापकीय संचालक ललित रुंग्टा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
 • राज्य शासनाच्या वतीने विविध गटात आयोजित स्पर्धेत अफॉर्डेबल होम विथ बेस्ट ॲमेनिटीज ऑफ द इयर या गटात अनेकांना मागे टाकत रुंग्टा ग्रुपने बाजी मारली.
 • मुंबईत एका शानदार सोहळ्यात या स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न झाले. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आदि उपस्थित होते.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.