Current Affairs of 25 October 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (25 ऑक्टोबर 2016)

चालू घडामोडी (25 ऑक्टोबर 2016)

के.एल. बिष्णोई यांची महासंचालक पदावर नियुक्ती :

  • निवृत्तीच्या उंबरठ्यावरील अप्पर महासंचालक के.एल. बिष्णोई यांची अखेर महासंचालक (डीजी) पदावर 24 ऑक्टोबर रोजी पदोन्नती करण्यात आली आहे.
  • तसेच त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळांचे कार्यकारी संचालकपद अपग्रेड करण्यात आले आहे.
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) महासंचालकपद रिक्तच राहिले असून त्यासाठी सेवाज्येष्ठतेवर पात्र असलेले राकेश मारिया हे गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) महासमादेशक पदावरच रिटायर होतील, हे जवळपास निश्चित झाले आहे.
  • राज्य सरकारची ‘वक्र’दृष्टी असलेल्या मारिया यांची एसीबीच्या प्रमुखपदी नियुक्ती करता येऊ नये, यासाठीच ‘एमएसएससी’चे पद तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नत करण्यात आले असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.
  • बिष्णोई हे 30 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत असून त्यांना डीजी म्हणून 37 दिवस मिळणार आहेत.
  • गेल्या 13 महिन्यांपासून होमगार्डमध्ये कार्यरत असलेले मारिया हे पुढच्या वर्षी 31 जानेवारीला रिटायर होत आहेत.
  • सध्याच्या सहा डीजीमध्ये पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्यानंतर तेच ज्येष्ठ अधिकारी आहेत.

लोहमार्ग पोलिस ठाणी बंद होणार :

  • रेल्वेमधील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यास सपशेल अपयशी ठरलेले देशातील जवळपास आठ हजार लोहमार्ग पोलिस ठाणे बंद करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने निर्णय घेतला आहे.
  • तसेच या कर्मचाऱ्यांना स्थानिक पोलिस दलात सामील करून घेऊन रेल्वे प्रवासी व रेल्वे सुरक्षेची जबाबदारी आता रेल्वे सुरक्षा बलाच्या खांद्यावर टाकण्यात येणार आहे.
  • देशातील रेल्वे विभाग हा सर्वात मोठा महसूल देणारा विभाग आहे; परंतु रेल्वेमधून प्रवास करणारा प्रवासी अनेक अडचणींवर मात करूनच प्रवास करतो.
  • रेल्वे पोलिस आणि आरपीएफ यांच्यातील समन्वयाअभावी रेल्वेतील गुन्हेगारी वाढत चालल्यानेच रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
  • सध्या कर्तव्यावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना स्थानिक जिल्हा पोलिस दलात सामील करून रेल्वे सुरक्षा बलाच्या खांद्यावर आता दुहेरी संरक्षणाचा भार पडणार आहे.
  • रेल्वे सुरक्षेसोबतच आता त्यांनी रेल्वे प्रवाशांचीही सुरक्षा करणे अपरिहार्य झाले आहे. लवकरच त्यांना सीआरपीसीचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
  • लोहमार्ग पोलिस बंदचा निर्णय घेण्यात आला असून, तो अंतिम मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आल्याचे लोहमार्ग पोलिस निरीक्षक आय. एच. आत्तार यांनी सांगितले.

रतन टाटा पुन्हा टाटा समूहाचे चेअरमनपदी :

  • 100 अब्ज डॉलरच्या टाटा उद्योग समूहाचे चेअरमन सायरस मिस्त्री यांना पदावरून तडकाफडकी दूर करण्यात आले आहे.
  • रतन टाटा यांनी हंगामी चेअरमन म्हणून कार्यभार स्वीकारला असून, नवा चेअरमन निवडण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
  • 48 वर्षीय मिस्त्री यांनी चार वर्षांपूर्वी 78 वर्षीय रतन टाटा यांच्याकडूनच ‘टाटा सन्स’ या ‘टाटा समूहा’च्या होल्डिंग कंपनीच्या चेअरमनपदाचा कार्यभार स्वीकारला होता.
  • मिस्त्री यांना पदावरून तातडीने काढण्यामागील कारण जाहीर करण्यात आलेले नाही.
  • तथापि, मिस्त्री यांच्या कामावर ‘टाटा सन्स’ समाधानी नव्हती. नफ्यात नसलेल्या उद्योगांकडे त्यांचे लक्ष नव्हते, असे समजते.
  • मिस्त्री यांना पदमुक्त केल्याची माहिती रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे कळवली आहे.

सिंधू नदीवर सिंचन प्रकल्पांची योजना :

  • पाकिस्तानबरोबरच्या तणावपूर्ण संबंधाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकार जम्मू-काश्‍मीरमधील सुमारे 2.05 लाख एकर क्षेत्र ओलिताखाली आणण्याच्या हेतूने सिंधू नदी खोऱ्यात चार सिंचन प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याची योजना आखली आहे.
  • सिंधू पाणी करारानुसार झेलमसह पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली असलेल्या नद्यांच्या पाण्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा निर्णय भारताने घेतल्यानंतर आठवडाभरातच ही योजना आखण्यात आली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत 56 वर्षे जुन्या सिंधू पाणी कराराचा आढावा घेतला होता.
  • चार सिंचन प्रकल्पांपैकी पुलवामातील त्राल सिंचन प्रकल्प, कारगिलमधील प्रकाचिक खोज कालवा; तसेच जम्मूच्या सांबा व कथुआतील मुख्य रावी कालव्याचे नुतनीकरण व आधुनिकीकरण हे तीन प्रकल्प या आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे.
  • राजपोरा उपसा सिंचन हा चौथा प्रकल्प डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे.
  • तसेच या सर्व कामासाठी 117 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, हा निधी कृषी आणि ग्रामीण विकास राष्ट्रीय बॅंकेमार्फत उभारला जाणार आहे.

कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा षटकारांचा विक्रम :

  • जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर आणि भारतीय वन-डेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने एकदिवसीय क्रिकेटमधील सचिन तेंडुलकरचा 195 षटकारांचा विक्रम मोडला.
  • धोनीने 23 ऑक्टोबर रोजी मोहाली येथे न्यूझीलंडविरुद्ध आपला तिसरा षटकार ठोकून ही विक्रमी कामगिरी केली.
  • सचिनने 463 सामन्यांमध्ये 195 षटकार मारले होते. धोनीने 281 सामन्यांत 196 षटकार मारून ही कामगिरी केली.
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी (351), न्यूझीलंडचा श्रीलंकेचा सनथ जयसूर्या (270), वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल (238), ब्रँडन मॅक्युलम (200) महेंद्रसिंह धोनी (196) वर आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.