Current Affairs of 29 October 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (27 ऑक्टोबर 2016)

चालू घडामोडी (29 ऑक्टोबर 2016)

इस्रो करणार जागतिक विक्रम :

  • नवनव्या विक्रमांना गवसणी घालणारी इस्रो आता जागतिक विक्रम करणार असून, एकाच वेळी एका रॉकेटच्या माध्यमातून 83 उपग्रह सोडण्याचे विचार सुरू आहे. यामध्ये केवळ दोन भारतीय उपग्रह असतील आणि उर्वरित 81 उपग्रह परदेशी कंपन्यांचे आहेत. यातील बहुतांश उपग्रहांचा आकार छोटा असेल.
  • एकाच वेळी भरघोस उपग्रह अवकाशात सोडणे तसे अवघड नसले तरी त्यांना वेगवेगळ्या कक्षेत नेऊन ठेवणे हे इस्रोसमोरचे मोठे आव्हान असेल.

एसी लोकलची चाचणी 3 नोव्हेंबरपासून :

  • सहा महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या एसी लोकलच्या चाचणीला अखेर 3 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. सुरुवातीला कारशेडमध्ये चाचण्या घेण्यात येणार असून अशा 12 चाचण्या होतील. 3 नोव्हेंबर रोजी चाचणी न झाल्यास 4 नोव्हेंबरपासून चाचण्या करण्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली
  • मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये 54 कोटी रुपये किमतीची एसी लोकल सहा महिन्यांपूर्वी दाखल झाली. ही लोकल दाखल झाल्यानंतर ती ठाणे-वाशी-पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर चालविण्यावर मध्य रेल्वेकडून विचार करण्यात आला.
  • प्रथम या लोकलच्या कारशेडमध्ये 12 चाचण्या होतील. यामध्ये स्वयंचलित दरवाजांची चाचणी, एसीची चाचणी, त्याचबरोबर शंटिंगच्या (मागे-पुढे लोकल सरकवणे) चाचणीबरोबरच अन्य चाचण्याही होतील.

बिगर ‘एनओसी’ शिक्षकांची नियुक्ती रद्द :

  • राज्यातील प्राथमिक, माध्यमिकसह कनिष्ठ महाविद्यालयातील ज्या शिक्षकांना ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय नियुक्ती दिली आहे, अशा सर्व शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय 27 ऑक्टोबर रोजी राज्य शासनाने घेतला आहे.

मानवी हक्क परिषदेच्या फेरनिवडणुकीत रशिया पराभूत :

  • संयुक्त राष्ट्राच्या मानव हक्क परिषदेवरील पुन: नियुक्तीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत रशियाचा हंगेरी आणि क्रोएशियाकडून पराभव झाला.
  • युद्धग्रस्त सिरीयाला सुरु असलेल्या सैन्य मदतीमुळे रशियाच्या सदस्यत्वावर गंडातर आले आहे.
  • तसेच रशियाची मानवी हक्क परिषदेतील उमेदवारी डिसेंबर 31 रोजी संपणार आहे.

हिलरींसाठी भारतीयांनी दिले 67 कोटी :

  • अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी यांचा विजय व्हावा म्हणून त्यांना मूळ भारतीय वंशाच्या नागरिकांनी मदत करणे सुरू केले आहे. तेथील भारतीयांना हिलरी यांच्या प्रचार मोहिमेला तब्बल 67 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यापूर्वी काही भारतीयांना ट्रम्प यांनाही असाच निधी देऊ केला होता.

जीवाश्मीभूत शैवालाचा बॅटरीतील अॅनोडसाठी वापर :

  • पर्यायी सिलिकॉन दहा पट ऊर्जा साठवू शकतो पण त्याची काबरेथर्मिक पद्धतीने निर्मिती महागात पडते.
  • डायटमस या एकपेशीय शैवालीच्या जीवाश्मीभूत अवशेषांपासून बनवलेल्या अॅनोडचा वापर केलेल्या सिलिकॉनच्या मदतीने विद्युत वाहनांना वीज पुरवठा करणाऱ्या किफायतशीर लिथियम आयन बॅटरी वैज्ञानिक विकसित करीत आहेत.
  • रिव्हरसाईड येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात याबाबत संशोधन झाले असून याच्या आधारे विद्युत वाहने व पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक साधनात वापरता येणाऱ्या लिथियम आयन बॅटरी किफायतशीर दरात तयार करता येणार आहेत. लिथियम आयन बॅटरीज या रिचार्जेबल बॅटरीजमध्ये सर्वात लोकप्रिय आहेत त्यात अॅनोड, कॅथोड व इलेक्ट्रोलाईट असे घटक असतात. ते लिथियम क्षार सेंद्रिय द्रावणात विरघळवून तयार केले जातात.
  • ग्राफाईट हा अॅनोडसाठी चांगला पर्याय आहे पण त्याच्या काही मर्यादांमुळे वापर अवघड आहे.
  • तसेच पर्यायी सिलिकॉन दहा पट ऊर्जा साठवू शकतो पण त्याची काबरेथर्मिक पद्धतीने निर्मिती महागात पडते. त्यामुळे डायटोमॅशियस अर्थ या शैवालाच्या जीवाश्माचा वापर यात करता येईल असे वैज्ञानिकांचे मत असून त्याची उपलब्धताही भरपूर आहे.

बेनामी संपत्ती कायदा 1 नोव्हेंबरपासून लागू होणार :

  • बेनामी व्यवहार रोखणारा नवा कायदा 1 नोव्हेंबरपासून पूर्ण देशभरात लागू करण्यात येणार असून, यामुळे बेनामी संपत्ती तसेच व्यवहार करणाऱ्यांना 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.
  • धार्मिक विश्वस्तांना या कायद्याच्या बाहेर ठेवण्याच्या केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निर्णयानंतर काळ्या पैशाला प्रतिबंध घालण्यासाठी संसदेने ऑगस्टमध्ये बेनामी व्यवहार (प्रतिबंध) कायदा पारित केला आहे.
  • तसेच हा कायदा लागू झाल्यानंतर 1988 च्या बेनामी व्यवहार कायद्याचे नाव बदलणार असून, ते बेनामी संपत्ती व्यवहार प्रतिबंध कायदा,1988 असे होणार असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष बोर्डाने (सीबीडीटी) माहिती देताना म्हटले आहे.
  • जुन्या कायद्यानुसार बेनामी व्यवहार केल्यास तीन वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा देण्याची तरतूद होती. मात्र नवीन कायद्यामुळे सात वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.