Current Affairs of 28 July 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (28 जुलै 2015)
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे निधन :
- भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल यांचे निधन झाले.
- कलाम 83 वर्षांचे होते.
- ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’च्या (आयआयएम) कार्यक्रमासाठी ते मेघालयमधील शिलाँग येथे गेले होते.
- डॉ. कलाम यांचे पार्थिव गुवाहाटीहून नवी दिल्लीला आज नेले जाणार आहे.
- शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक असलेल्या डॉ. कलाम यांनी 2002 ते 2007 या काळात देशाचे अकरावे राष्ट्रपती म्हणून काम केले.
- साधी राहणी आणि ऋजू स्वभावामुळे ‘जनतेचे राष्ट्रपती’ म्हणून ते लोकप्रिय ठरले.
- मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून हवाई अभियांत्रिकी शाखेचे अभियंता असलेले डॉ. कलाम भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक ठरले.
- वाजपेयी यांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आणि त्यांच्याच कारकिर्दीत 1998 मध्ये पोखरणची अणुचाचणी झाली.
- ‘विंग्ज ऑफ फायर’, ‘इंडिया 2020 ‘आणि ‘इग्निटेड माइंड्स’ ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत.
- अवुल पकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम हे 18 जुलै 2002 रोजी भारताच्या 11 व्या राष्ट्रपतिपदी आरूढ झाले.
- भारताच्या संरक्षण तंत्रज्ञानाला नवे पंख मिळवून देणारे कलाम यांचे देशाच्या उपग्रह कार्यक्रम, गायडेड आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रकल्प, अण्वस्त्र कार्यक्रम आणि हलक्या लढाऊ विमान प्रकल्पातही त्यांनी योगदान दिलेले आहे.
- पूर्ण नाव : आबुल पाकिर जैनुलादीन अब्दुल कलाम.
- जन्म. : 15 ऑगसक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम (तामिळनाडू) येथे
- प्राथमिक शिक्षण : श्वार्त्ज हायस्कूल, रामअनंतपुरम
- पदवी : सेंट जोसेफ कॉलेज, तिरुची(विज्ञान)
- 1954 ते 57 मध्ये एम.आय.टी. मद्रास येथून एअरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये डी.एम.आय.टी.
- 1958 साली डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये (डीआरडीओ) वरिष्ठ वैज्ञानिकाचे सहायक म्हणून नोकरी.
- भारताचे पहिले हलके विमान होवर क्राफ्ट विकसित करणाऱ्या चमूच्या प्रमुखपदी नियुक्ती. होवर क्राफ्ट विकसित.
- 1963 ते 1980 या कालावधीत इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये (इस्रो) काम.
Must Read (नक्की वाचा):
स्वतंत्र माहिती तंत्रज्ञान कक्ष स्थापन करण्याचे आदेश :
- शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, महापालिका आदींमध्ये पेपरलेस कामांसाठी स्वतंत्र माहिती तंत्रज्ञान कक्ष स्थापन करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
- सरकारी कारभार ऑनलाइन करण्यासाठी ई-गव्हर्नन्स हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
- त्यानंतर ई-गव्हर्नन्स प्रकल्पाची परिणामकारकरीत्या अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्याच्यावर नियंत्रण असण्यासाठी राज्य सरकारच्या सर्व कार्यालयांमध्ये, महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये स्वतंत्र माहिती तंत्रज्ञान कक्ष स्थापन करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
- संबंधित कक्षाचे प्रमुख हे सचिव, उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक आयुक्त दर्जाचे अधिकारी असणार आहेत.
- संबंधित सरकारी कार्यालये ऑनलाइन जोडणार
- नागरी सुविधा ऑनलाइन देणार
- राज्य माहिती केंद्राशी समन्वय
- ई-ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी करणार
- ई-निविदा, ई-लिलाव राबविणार
- जुन्या कागदपत्रांचे डिजिटलायझेशन व स्कॅनिंग
- ई-डिस्ट्रीक्ट प्रकल्पाशी निगडित सेवा राबविणार
- कार्यालयाच्या संकेतस्थळाचे व्यवस्थापन
- मोबाइल अॅप्लिकेशन सुरू करणे
- बायोमॅट्रिक उपस्थितीची जोडणी व नोंद
- शासकीय ई-मेल प्रणाली राबविणे
दक्षिण आफ्रिकेचा संघ 72 दिवसांच्या भारता दौ-यावर :
- दक्षिण आफ्रिकेचा संघ 28 सप्टेंबरपासून 72 दिवसांच्या भारता दौ-यावर येत असून या दौ-यात तीन टी -20, पाच एकदिवसी व चार कसोटी सामने होणार आहेत.
- बीसीसीआय व दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्टाच्या अधिका-यांनी संयुक्त पत्रकार परिषदत या दौ-याची औपचारिक घोषणा केली.
- दक्षिण आफ्रिकेचा संघ तब्बल 72 दिवसांच्या भारत दौ-यावर येत असून द.आफ्रिकेचा आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा भारत दौरा आहे.
- 2 ऑक्टोबर – धर्मशाला
- 5 ऑक्टोबर – कटक
- 8 ऑक्टोबर – कोलकाता
दिनविशेष :
- 28 जुलै – पेरू स्वातंत्र्य दिन
- 1821 – पेरूने स्वतःला स्पेनपासून स्वतंत्र जाहीर केले.