Current Affairs of 27 July 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (27 जुलै 2015)
संशोधकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी “गुगल”चा पुढाकार :
- नव्या माध्यमाद्वारे संशोधकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रिय सर्च इंजिन “गुगल”ने पुढाकार घेतला आहे.
- विविध क्षेत्रांतील पेटंटधारकांच्या पेटंटविक्रीसाठी “google.patents.com” या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे.
- या सुविधेद्वारे पेटंट विक्री करता येणे शक्य होणार आहे.
- तसेच या सुविधेचा लाभ घेण्यासाठी गुगलने पेटंटधारकांना आवाहन केले आहे.
Must Read (नक्की वाचा):
“कॅशलेस ट्रीटमेंट योजना” प्रत्यक्ष लागू :
- अपघातांतील जखमींना त्वरित वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी केंद्र सरकार लवकरच “कॅशलेस ट्रीटमेंट योजना” प्रत्यक्ष लागू करेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले.
- तसेच आकाशवाणीवरील “मन की बात” या कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी डाळींच्या लागवड क्षेत्रात 50 टक्के व तेलबियांच्या क्षेत्रात 33 टक्के वाढीबद्दल बळिराजाचे मनापासून अभिनंदन केले.
- रस्ता अपघाताबद्दल सूचना देण्यासाठी 1033 हा टोल फ्री क्रमांक आहे आणि त्याचा वापर करावा असे मोदी म्हटले.
- कॅशलेस ट्रीटमेंट या प्रकल्पाच्या आगामी विस्तारित रूपात अपघातानंतर 50 तासांच्या आत जखमींना रुग्णवाहिका व योग्य वैद्यकीय मदत मिळाली पाहिजे.
- तसेच मोदी यांनी आगामी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून करायच्या आपल्या भाषणासाठी जनतेकडून सूचना व मुद्दे मागविले आहेत.
- यासाठी माय जीओव्ही.इन पोर्टलवर तसेच आकाशवाणी व पंतप्रधान कार्यालयाकडेही लोक आपल्या सूचना पाठवू शकतात.
धार्मिक असहिष्णुतेची चिथावणी देणारी संकेतस्थळ बंद करण्याचा निर्णय :
- केंद्र सरकारने धार्मिक असहिष्णुतेची चिथावणी देणारी संकेतस्थळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
- या निर्णयामुळे सोशल मिडिया तसेच व्हिडिओ शेअरिंग संकेतस्थळासह अल्पसंख्यांक समुदायाशी संबंधित 40 संकेतस्थळ बंद होणार आहेत.
- “सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा 2009 नुसार अल्पसंख्यांक समुदायाला चिथावणी देणारे व्हिडिओ ब्लॉक करण्याचा आदेश दिला आहे.
ममता बॅनर्जी यांच्या पाच दिवसीय ब्रिटन दौऱ्यावर :
- ममता बॅनर्जी यांच्या पाच दिवसीय ब्रिटन दौऱ्याला आजपासून सुरवात झाली.
- कोलकता येथील एनसीबीसी विमानतळावरून आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी लंडनकडे प्रयाण केले.
- ब्रिटन दौऱ्यादरम्यान विविध सामंजस्य करारावर सह्या अपेक्षित असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
- या दौऱ्यामध्ये आरोग्य, शिक्षण तसेच इतर सामाजिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होणे अपेक्षित असल्याचे पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी सांगितले.
दिनविशेष :
- 27 जुलै – होजे सेल्सो बार्बोसा दिन (पोर्तोरिको).
- 1921 – फ्रेडरिक बँटिंगने इन्सुलिनचा शोध लावला.
- 1949 – जगातील पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललँड कॉमेटचे पहिले उड्डाण.
- 1990 – बेलारूसने सोवियेत संघापासून स्वातंत्र्य जाहीर केले.