Current Affairs of 26 July 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (26 जुलै 2015)
“ई-लर्निंग” उपक्रम सुरू :
- विद्यार्थ्यांसाठी आता “ई-लर्निंग”उपक्रम सुरू करत आहे.
- या उपक्रमाने राज्यातील शाळा जोडण्याचा निर्धार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.
- कोकणातील पहिल्या ई-लर्निंग या ऑनलाइन शैक्षणिक उपक्रमाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते येथील एका हॉटेलमध्ये झाले.
- विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी त्यांना टॅब तसेच व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करण्यात आली आहे.
- त्याचा विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढविण्यासाठी उपयोग होत आहे.
Must Read (नक्की वाचा):
श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला निर्दोष :
- आयपीएलच व भारतीय क्रिकेटला भ्रष्टाचाराचा डाग लागलेल्या स्पॉट फिक्सिंगच्या आरोपातून श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांना दिल्ली न्यायालयाने निर्दोष ठरवले.
- तसेच या तिघा खेळाडूंसह आरोप असलेल्या 36 जणांचीही सुटका करण्यात आली.
- पण या तिघांवर आम्ही घातलेली बंदी कायम असेल, असे भारतीय क्रिकेट मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.
- राजस्थान रॉयल्स संघातून खेळलेल्या या तीन खेळाडूंना दिल्ली पोलिसांनी मे 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून अटक केली होती.
‘सकाळ रिलीफ फंडा’ तर्फे पाच रुग्णवाहिका देण्यात येणार :
- गेल्या वर्षी आलेल्या महापुराच्या आपत्तीमुळे कोलमडून पडलेल्या जम्मू-काश्मीरवासीयांना बळ देण्याचा एक भाग म्हणून ‘सकाळ रिलीफ फंडा’ तर्फे पाच रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत.
- श्रीनगरमधील एच. एन. वांछू ट्रस्ट आणि पुण्यातील “सरहद” या संस्थांच्या मार्फत ही सेवा देण्यात येणार आहे.
- रुग्णवाहिका प्रदान करण्याचा कार्यक्रम सोमवारी श्रीनगरमधील शेर ए काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर येथे होणार आहे. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
- या रुग्णवाहिकांमुळे काश्मीर खोऱ्यात 108 ही तातडीची वैद्यकीय सेवा सुरू करण्यास मदत होणार आहे.
सुरेश नारायणन यांची नवे एमडी म्हणून नियुक्ती :
- नेस्ले इंडियाने सुरेश नारायणन यांची नवे एमडी म्हणून नियुक्ती केली आहे.
- नारायणन हे गेल्या सोळा वर्षांत नेस्ले इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती होणारे पहिले भारतीय ठरले आहेत.
- येत्या 1 ऑगस्टपासून कंपनीचे वर्तमान व्यवस्थापकीय संचालक एटियंस बेनेट यांच्याऐवजी नारायणन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहणार आहेत.
- नारायणन हे 1999 पासून नेस्ले समूहाचा भाग आहेत.
- आतापर्यंत ते नेस्ले फिलिपाइन्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत त्याशिवाय 2005 ते 2008 काळात ते नेस्लेच्या दक्षिण आशिया विभागाचे प्रमुख होते.
दिनविशेष :
- 26 जुलै – क्युबा राष्ट्रीय क्रांती दिन.
- 26 जुलै – लायबेरिया, मालदीव स्वातंत्र्य दिन
- 26 जुलै – विजय दिन/भारत (कारगिल युद्धाची समाप्ती).
- 1941 – दुसरे महायुद्ध – जपानच्या नैऋत्य एशियातील शिरकावास प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टने अमेरिकेतील जपानी मालमत्ता सरकारी ताब्यात घेण्याचा आदेश दिला.
- 1953 – क्युबन क्रांतीला सुरुवात.
- 1958 – अमेरिकेने एक्स्प्लोरर 4 या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
- 1963 – सिनकॉम 2 या पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.
- 1971 – अमेरिकेच्या अपोलो 15 अंतराळयानाचे प्रक्षेपण.
- 1874 – शाहू महाराज, समाज सुधारक.