Current Affairs of 25 July 2015 For MPSC Exams

Current Affairs 25 july 2015

चालू घडामोडी (25 जुलै 2015)

इस्लामाबादला भूकंपाचा धक्का :

  • पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह अन्य काही शहरांना आज पहाटे दोनच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला.
  • अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे दोनच्या सुमारास झालेल्या भूकंपाचा तीव्रता रिश्टर स्केलवर 5.1 इतकी मोजण्यात आली आहे.
  • इस्लामाबादपासून 15 किमी ईशान्येला भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
  • इस्लामाबादसह रावळपिंडी, पेशावर, ऍबोटाबाद या शहरांतही धक्का जाणवले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 जुलै 2015)

चीनचा दुसऱ्या अपत्याच्या जन्मास परवानगी देण्याचा विचार :

  • जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला चीन गेल्या अनेक वर्षांपासून “हम दो हमारा एक” अशा धोरणाचे पालन करीत आहे.
  • मात्र, आता हा देश दुसऱ्या अपत्याच्या जन्मास परवानगी देण्याचा विचार करीत आहे.
  • चीन आता आपल्या “एक मूल” धोरणात बदल करून जोडप्याला दुसरे मूल जन्मास घालू देण्याची परवानगी देऊ शकतो.
  • सध्या चीनची लोकसंख्या 1.4 अब्ज आहे. 1.2 अब्ज लोकसंख्येसह भारत दुसऱ्या स्थानावर आहे.
  • लोकसंख्येनुसार पहिले पाच देश
  1. चीन : 140 कोटी
  2. भारत : 128 कोटी
  3. अमेरिका : 32 कोटी
  4. इंडोनेशिया : 25 कोटी
  5. ब्राझील : 20 कोटी

पाकिस्तान चीनकडून आठ पाणबुड्या खरेदी करणार :

  • पाकिस्तान चीनकडून आठ पाणबुड्या खरेदी करणार आहे.
  • पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार आणि चीनच्या “शिप बिल्डिंग अँड ऑफशोअर इंटरनॅशनल कंपनी लिमिटेड”चे अध्यक्ष झु झिकीन यांच्यात अधिकृत करार झाला आहे.
  • चार वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पाकिस्तान चीनला पैसे देणार असून, पुढील वर्षी या पाणबुड्या अधिकृतपणे पाक सरकारकडे सोपविल्या जातील.  

गुजरात मंत्रिमंडळाची आणखी तीन कायद्यांमधील सुधारणांच्या अध्यादेशास मंजुरी :

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सामान्य नागरिकांना मतदानाचा हक्क बजावणे सक्‍तीचे केल्यानंतर आज गुजरात मंत्रिमंडळाने आणखी तीन कायद्यांमधील सुधारणांच्या अध्यादेशास मंजुरी दिली आहे.
  • या अध्यादेशामुळे आता विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकनियुक्‍त सदस्यांनी मतदानाचा हक्‍क न बजावल्यास त्यांचे सदस्यत्वही रद्द होईल.
  • तसेच यासंबंधीची अधिसूचना लवकरच जारी केली जाणार आहे.
  • गुजरात स्थानिक स्वराज्य संस्था कायद्यान्वये मतदान करणे अनिवार्य करण्याचा सरकारचा विचार आहे.
  • गुजरात प्रांतीय महानगरपालिका कायदा-1949, गुजरात महापालिका कायदा-1923 आणि गुजरात पंचायत कायदा-1963 या कायद्यांमधील सुधारणांस राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

ब्रीज प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीने सामंजस्य करार :

  • बॉश कंपनी आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्यात रिस्पॉन्स टू इंडिया डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड ग्रोथ थ्रु एम्प्लॉयब्लिटी एन्हान्समेंट (ब्रीज) हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीने सामंजस्य करार करण्यात आला.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे व बॉश कंपनीचे महाव्यवस्थापक मोहन पाटील यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
  • शिक्षण अर्धवट सोडलेल्या परंतु रोजगाराच्या शोधात असलेल्या 18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवारांकरिता औद्योगिक आस्थापनांमधील रोजगाराकरिता आवश्यक असलेले कौशल्य विकसित करण्याकरिता ब्रीज कोर्स राबवण्यात येणार आहे.
  • आयटीआय व उर्वरित 24 संस्थांमध्ये बॉश आस्थापनांच्या वतीने हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येईल.

‘एलबीटी’पासून अंशत: मुक्ती मिळणार :

  • महानगरपालिकांच्या हद्दीतील व्यापाऱ्यांना ‘एलबीटी’पासून अंशत: मुक्ती मिळणार आहे.
  • 1 ऑगस्ट ‘एलबीटी’ नियम काही प्रमाणात शिथिल करण्याची तयारी सुरू केली आहे.
  • 1 ऑगस्टपासून ‘एलबीटी’ रद्द केला जाईल, अशी घोषणा राज्य सरकारने केलेली आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.