Current Affairs of 24 July 2015 For MPSC Exams

current affairs 24 july 2015

चालू घडामोडी (24 जुलै 2015)

ए-4 आकाराच्या कागदाचे घडी करता येण्यासारखे ड्रोन विमान उपलब्ध :

 • चीनच्या बाजारपेठेत लवकरच ए-4 आकाराच्या कागदाचे घडी करता येण्यासारखे ड्रोन विमान उपलब्ध होणार आहे. dron
 • अहेडएक्स या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ली झियाओयू यांनीड्रोन विमान सामान्य ग्राहकांसाठी असतील व ती पाच वर्षांत ही बाजारपेठ 67.3 अब्ज डॉलर्सची असेल असे म्हटले आहे.
 • तसेच ट्रान्सड्रोन ए-4 असे या ड्रोनचे नाव असून ते पारंपरिक ड्रोनपेक्षा वेगळे आहे त्याचा आकार 288 बाय 204 बाय 71 मि.मी. असेल असे ‘पीपल्स डेली’ने यांनी म्हटले आहे.
 • व ड्रोनची रचना बदलता येते व त्यामुळे त्याचा आकार ए-4 कागदाइतका ठेवता येतो त्याची घडी करता येत असून या ड्रोन विमानाचे वजन 1500 ग्रॅम असून ते कुठल्याही अडथळ्याशिवाय प्रवास करू शकतो, प्रतिकूल परिस्थितीतही ते चालू शकते.
 • तसेच त्यात व्यावसायिक कॅमेरे बसवता येतात व ते मोबाइल फोन जोडता येतात व त्यात वायफायही वापरलेलेल असते.
 • ट्रान्सड्रोन ए-4 ची वैशिष्ट्ये :
 • ‘ए-4 कागदाच्या आकारासारखे विमान घडी करता येते
 • कॅमेरे जोडून ते मोबाइल फोनने नियंत्रित
 • ‘लहान ड्रोनची बाजारपेठ 67.3 अब्ज डॉलर्सची

गुगलवर खऱ्या जीवनातील अनुभव शोधणे शक्य होणार :

 • आता लवकरच गुगलवर खऱ्या जीवनातील अनुभव शोधणे शक्य होणार आहे.google glass
 • त्यासाठी गुगलने तयार केलेल्या गुगल ग्लासमध्ये सुधारणा करून त्याची नवी आवृत्ती गुगल सादर करणार आहे.
 • गुगल ग्लासच्या संशोधित आवृत्तीत अनेक नव्या सुविधा उपलब्ध आहेत.
 • ही गुगल ग्लास घडी करून खिशात ठेवता येणार आहे.
 • तसेच सुधारित ग्लासमध्ये प्रोसेसर असून, उष्णतेचे व्यवस्थान करण्याचीही सोय आहे.

क्रायोजेनिक इंजिनच्या शक्तिशाली आवृत्तीची यशस्वी चाचणी :

 • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) 20 जुलै रोजी भारतीय अंतराळवीरांना अवकाशात उड्डाण करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्रायोजेनिक इंजिनच्या शक्तिशाली आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली.crayogenic engine
 • या नव्या इंजिनमुळे जागतिक व्यावसायिक स्पर्धेत उतरलेल्या इस्रोला आठ टन वजनाचे सॅटेलाइट अवकाशात सोडणे शक्य होणार आहे.
 • तामिळनाडूतील महेंद्रगिरी येथील इस्रो केंद्रात इंजिनाची जमिनीवरच चाचणी घेण्यात आली.
 • या इंजिनची क्षमता सध्याच्या क्रोयोजेनिक इंजिनांपेक्षा 25 टक्के अधिक असुन जीओ-सिंक्रोनस एसएलव्ही मार्क-3 या रॉकेटसाठी होणार वापर या शक्तिशाली क्रोयोजेनिक इंजिनचा वापर होणार आहे.
 • 2016 साली होणाऱ्या जीएसएलव्ही मार्क-3च्या उड्डाणासाठी इस्रोचे मनोबल वाढवण्यासाठी ही चाचणी महत्त्वपूर्ण होती.
 • शक्तिशाली क्रायोजेनिक इंजिनचा प्रत्यक्षात वापर सुरू होण्यास किमान सात वर्षांचा कालावधी लागणार असून भारतीय अंतराळवीरांची अवकाशातील सफर घडवण्यासाठी याच इंजिनाची होणार मदत आहे.

गुटखा, तंबाखूवर आणखी एक वर्षभरासाठी बंदी :

 • गुटखा, पानमसाला, सुगंधी स्वादिष्ट तंबाखू व सुपारी या पदार्थांवर आणखी एक वर्षभरासाठी बंदी घालण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनमंत्री एकनाथ खडसे यांनी नियम 46 अन्वये निवेदन करताना 21 जुलै रोजी विधान परिषदेत दिली.
 • देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर झालेल्या संशोधनातून गुटखा, पानमसाला, सुगंधी स्वादिष्ट तंबाखू व सुपारी हे पदार्थ आरोग्यास अपायकारक आहेत हे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कर्करोगासह हृदयरोग आणि अन्य जीवघेणे आजार होतात.
 • तसेच या पदार्थांचा विशेषतः तरुण पिढीवर अनिष्ट परिणाम होत असल्याने त्यावर बंदी घालणे उचित ठरणार आहे.
 • या पदार्थांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी देशातील 26 राज्ये आणि 5  केंद्रशासित प्रदेशातील अन्नसुरक्षा आयुक्तांनी अन्नसुरक्षेचे निकष जाहीर केले आहेत.
 • त्यामुळे या पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
 • मागच्या सरकारने हा निर्णय घेतला होता. परंतु, त्याची मुदत संपत आल्याने आणखी एक वर्षासाठी तिला मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे खडसे यांनी जाहीर केले.

देशातील प्रमुख 35 नद्या प्रदूषित :

 • केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) देशातील 40 नद्यांच्या प्रदूषणाची पाहणी केली असता, केवळ दक्षिण भारतातील चार, तसेच आसाममधील एकच नदी स्वच्छतेच्या प्रमाणांवर यशस्वी ठरल्या आहेत.
 • उर्वरित 35 नद्या पूर्णपणे प्रदूषणाच्या विळख्यात आहेत.
 • यामध्ये सतलजपासून साबरमती, कृष्णा, तापी, तुंगभद्रा आणि दमणगंगापर्यंतच्या नद्यांचा समावेश आहे.
 • सीपीसीबीने  2005 पासून 2013 पर्यंतच्या आकड्यांवर आधारित हा निष्कर्ष काढला आहे. या काळात 40 नद्यांच्या 83 ठिकाणांवर पाहणी करण्यात आली.
 • यामध्ये चार गोष्टींच्या प्रमाणांवर लक्ष केंद्रित केले होते. 1. बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी), 2. डिजॉल्व ऑक्सिजन (डिओ), 3. टोटल कोलिफार्म (टीसी) आणि 4. टोटल डिजॉल्व्हड्‌ सॉलिड (टीडीएस).
 • प्रामुख्याने बीओडीनुसार पाण्यात ऑक्सिजनचा वापर करणारे घटक दर्शवितात, तर डीओमध्ये एकूण ऑक्सिजनचे प्रमाण स्पष्ट होते. टीसीमध्ये एकूण जीवाणूंची उपस्थिती आणि टीडीएसमध्ये पाण्यात असलेल्या ठोस घटकांची नोंद होते.
 • प्रदूषित नद्या : गंगा, सतलज, मार्कंडा, घग्घर, यमुना, चंबळ, ढेला, किच्छा, कोसी, बहेला, पिलाखर, सरसा, रावी, माही, रामगंगा, बेतवा, सोन, स्वान, वर्धा, भीमा, साबरमती, मंजीरा, तापी, नर्मदा, वाणगंगा, दमणगंगा, इंद्रावती, महानदी, चुरनी, दामोदर, सुवर्णरेखा, कृष्णा, तुंगभद्रा.
 • स्वच्छ नद्या : गोदावरी, कावेरी, पेन्नार, उत्तर पिनकानी, धनसारी.

नासाने लावला पृथ्वी 2.0 चा शोध :

 • केप कॅनॅव्हरल (फ्लोरिडा) – नासा या अमेरिकेच्या राष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेस पृथ्वीशी अत्यंत साधर्म्य असलेल्या ग्रहाचा शोध लावण्यात यश आले आहे.earth 2.0
 • केप्लर या नासाच्या जगप्रसिद्ध अवकाश यानाच्या सहाय्याने हा अत्यंत महत्वपूर्ण शोध लावण्यात आला आहे. या ग्रहाचे नामकरण केप्लर -452 बी असे करण्यात आले आहे.
 • पृथ्वीपेक्षा सुमारे 60 पट मोठा असलेला हा ग्रह सायग्नस या नक्षत्रसमूहामध्ये असून, तो सुमारे 1400 प्रकाशवर्षे अंतरावर असल्याचे नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.
 • केप्लर 452 बी हा सूर्याशी साधर्म्य असलेल्या ताऱ्याभोवती फिरत असल्याचे आढळून आले आहे. शिवाय, हा तारा व केप्लर 452 बी यांमधील अंतर हे सुमारे पृथ्वी-सूर्यामधील अंतराइतकेच आहे.
 • केप्लर 452 बी 385 दिवसांच्या कालावधीमध्ये या ताऱ्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले तसेच या ताऱ्याच्या आकारावरुन तो खडकाळ असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे.
 • “केप्लर 452 बी म्हणजे पृथ्वीचा आकाराने व वयाने मोठा असलेला भाउ असल्याचे नासाने म्हटले आहे.

कुपोषित बालकांचे प्रमाण मध्य प्रदेशात सर्वाधिक :

 • कुपोषित बालकांचे प्रमाण मध्य प्रदेशात सर्वाधिक असून, हे प्रमाण 74.1 टक्के असल्याचे सरकारच्या एक सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
 • यात वय वर्षे पाचपर्यंत रक्तक्षय आणि कुपोषित असलेल्या बालकांचा समावेश आहे.
 • राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-3 (एनएफएचएस-3) नावाच्या या सर्वेक्षणात वय वर्षे पाचपर्यंतच्या बालकांचा समावेश आहे.
 • मध्य प्रदेशापाठोपाठ झारखंड (56.5 टक्के) आणि बिहार (55.9 टक्के) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकांवर असल्याचे या उत्तरात नमूद करण्यात आले आहे.

जन्मठेप झालेल्या कैद्यांसंदर्भात सुप्रीम कोर्टाची संमती :

 • एक वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांची सुटका करण्याच्या राज्य सरकारच्या अधिकाराला परवानगी दिली आहे.
 • मुख्य न्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने जुलै 2014च्या आदेशात दुरुस्ती केली.
 • सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्याकांडातील दोषींची सुटका करण्याच्या तमिळनाडू सरकारच्या निर्णयाविरुद्ध केंद्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना ही परवानगी दिली.
 • या प्रकरणात तमिळनाडू सरकारची दोषींची शिक्षा माफ करण्याची इच्छा असताना केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयने केल्यामुळे याबाबतचा अधिकार केवळ केंद्र सरकारकडे असल्याचे म्हटले आहे.
 • जन्मठेपेच्या कैद्याला 14 वर्षानंतर की 21 वर्षांनी सुटका करायची, याचा अधिकार राज्य सरकारकडे असेल.
 • या कैद्यांना नाही माफी
 1. सीबीआयसारख्या केंद्रीय पथकांमार्फत तपास
 2. “टाडा‘सारख्या केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा
 3. बलात्कारासारख्या लैंगिक छळ प्रकरणातील दोषी
 4. शिक्षेत सवलत न देण्याचा न्यायालयाचा आदेश
 5. मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावलेले दोषी

“नेट न्युट्रॅलिटी‘बाबत दूरसंचार समितीचा अहवाल सादर :

 • “नेट न्युट्रॅलिटी‘बाबत दूरसंचार मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीने अलिकडेच आपला अहवाल सादर केला आहे.
 • मात्र, हा अंतिम अहवाल नसून सरकारने त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.
 • ‘समितीच्या अहवालावर आधारित, दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया, सूचना आणि शिफारशी विचारात घेऊनच “नेट न्युट्रॅलिटी‘बाबत सरकार चहूबाजूंनी विचार करून देशहिताचा निर्णय घेण्यात येईल‘ असेही प्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केले.
 • ‘नेट न्युट्रॅलिटी‘ सर्वंकष अभ्यास करण्यासाठी सरकारने ए.के.भार्गव यांच्या अध्यक्षतेखाली एख समिती स्थापन केली होती.
 • सरकारने 16 जुलै रोजी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे, त्यामध्ये प्रमुाख्याने इंटरनेटद्वारे करण्यात येणारे कॉल्स नियंत्रित करण्याबाबत शिफारस करण्यात आली आहे.

दर महिन्याला एक जीबी डेटा मोफत वाय-फायद्वारे :

 •  मोफत ‘वाय-फाय‘ इंटरनेट सेवा देण्याचे वचन पूर्ण करण्याच्या दिशेने दिल्ली सरकारने पाऊले उचलली आहेत.
 • तांत्रिक सूचना विभागाने एक प्रस्ताव तयार केला असून, त्यामध्ये प्रत्येक सीमकार्डवर दर महिन्याला एक जीबी डेटा मोफत वाय-फायद्वारे देण्याची योजना बनविण्यात आली आहे.
 • दिल्लीच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने संपूर्ण दिल्लीमध्ये तीन हजार ‘हॉट झोन‘ची पाहणी केली आहे.
 • या सर्व ‘हॉट झोन‘मध्ये प्रथम ‘वाय-फाय‘ सेवा पुरविण्यात येणार असल्याचे एका एका इंग्रजी माध्यमाने म्हटले आहे.
 • केजरीवाल सरकारने स्थानिक आमदारांशी सल्लामसलत करून हे ‘वाय-फाय‘ झोन निश्चित केले आहेत,यामध्ये सार्वजनिक उद्याने, रुग्णालयाच्या बाहेरील परिसर, लहान बाजारपेठा यांचा समावेश आहे.

“यु-ट्युब”च्या ऍपद्वारे फोन फिरविण्याची गरज उरणार नाही :

 • स्मार्टफोनवरून “यु-ट्युब‘ या लोकप्रिय व्हिडिओ शेअरिंग साईटवरील व्हिडिओज्‌ पाहण्यासाठी यापुढे फोन फिरविण्याची गरज उरणार नाही.you tube
 • कारण “यु-ट्युब‘ आपल्या ऍड्रॉईड ऍपमध्ये सुधारणा केल्या असून फोन उभ्या अवस्थेत असतानाच संपूर्ण स्क्रिनवर पाहता येणार आहे.
 • यापूर्वी “यु-ट्युब‘च्या ऍपद्वारे फोन उभा असताना व्हिडिओ फूल स्क्रिन करून पाहता येणे शक्‍य नव्हते. त्यासाठी फोन आडवा करावा लागत होता.
 • यावर मात करण्यासाठी “यु-ट्युब‘ने आपल्या ऍपमध्ये सुधारणा करण्यात आल्या असून ऍपच्या 10.28 व्हर्जनमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 • सध्यातरी ही सुधारणा केवळ “यु-ट्युब‘च्या ऍड्रॉईडसाठीच करण्यात आलेली आहे. त्यामुळे आयओएस धारकांना सध्यातरी ही सुविधा उपलब्ध नाही.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 जुलै 2015)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.