Current Affairs of 29 July 2015 For MPSC Exams

Current Affairs 29 July 2015

 चालू घडामोडी (29 जुलै 2015)

“बढ चला बिहार” कार्यक्रमावर बंदी :

  • पाटणा उच्च न्यायालयाने सरकारकडून सुरू असलेल्या “बढ चला बिहार” या कार्यक्रमावर बंदी आणली. badh chal bihar
  • या कार्यक्रमाद्वारे सरकार केवळ माहिती संकलनाचे काम करत असल्याचे उच्च न्यायालयाने या वेळी म्हटले आहे.
  • नितीशकुमार सरकारतर्फे हा कार्यक्रम जूनमध्ये सुरू करण्यात आला होता.
  • जनसंपर्क विभाग दोन स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने 40 हजार गावांत संपर्क साधून तेथील गरजा आणि समस्या जाणून पुढील 10 वर्षांसाठीचे व्हिजन डॉक्‍युमेंट तयार करेल, अशी ही योजना होती.
  • यासाठी ट्रकवर सरकारच्या योजनांची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते. या कार्यक्रमात चार कोटी लोक सहभागी होतील, असे लक्ष्यही सरकारने ठेवले होते.
  • मुख्य न्यायाधीश नरसिंह रेड्डी आणि न्यायाधीश अंजना मिश्र यांच्या खंडपीठाने ही योजना केवळ माहिती संकलनासाठी राबविली जात असल्याचे सांगून 400 ट्रकवर लावण्यात आलेल्या दृकश्राव्य माध्यमांवर बंदी घातली.
  • तसेच होर्डिंग, पोस्टर्स व फोटोही काढण्याचे आदेश दिले आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 जुलै 2015)

मलेशियाच्या पंतप्रधान नजीब रझाक यांच्यासह इतर चार मंत्र्यांची हकालपट्टी :

  • मलेशियाच्या पंतप्रधान नजीब रझाक यांच्यावर मोठ्या भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करत उपपंतप्रधान मुहिद्दीन यासीन यांच्यासह इतर चार मंत्र्यांची हकालपट्टी केली.
  • त्यानंतर मलेशिया सरकारने ऍटर्नी जनरल यांचीही हकालपट्टी करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली.
  • सरकारनेच स्थापन केलेल्या कंपनीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप हाताळण्यात पंतप्रधान अपयशी ठरल्याचा आरोप मुहिद्दीन यांनी केला होता.
  • मलेशियन सरकारने स्थापन केलेल्या “वन मलेशिया डेव्हलपमेंट बेऱ्हाड” (वन-एमडीबी) या कंपनीमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होते आहे.
  • तसेच ऍटर्नी जनरल यांना आरोग्याच्या कारणांमुळे पदमुक्त करण्यात आले असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
  • तर मुहिद्दीन यांच्या जागी झहीद हामिदी यांची उपपंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी स्वाती मलिवाल :

  • दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वाती मलिवाल यांनी स्वीकारला. मलिवाल
  • यांच्या नियुक्तीला दिल्लीचे राज्यपाल नजीब जंग यांनी परवानगी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मलिवाल यांच्यासह इतर तीन सदस्यांनीही पदाची सूत्रे स्वीकारली.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे ट्‌विटरवरील अकाउंट नव्या रूपामध्ये :

  • देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे ट्‌विटरवरील अकाउंट नव्या रूपामध्ये कार्यान्वित राहणार आहे. A.P.J.Abdul.Kalam
  • कलाम यांच्या सहकाऱ्यांनी हे अकाउंट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून, “इन मेमरी ऑफ डॉ. कलाम” या नावाने अकाउंट सुरू राहील.
  • कलाम यांचे सहकारी सृजनपालसिंह यांनी केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, “हे अकाउंट डॉ. कलाम यांच्या अमर झालेल्या आठवणींना समर्पित” आहे.
  • कलामांचे विचार, त्यांची शिकवण आणि त्यांच्या ध्येयाच्या प्रचार आणि प्रसारासाठी हे अकाउंट काम करेल.
  • सृजनपालसिंह हेच या ट्‌विटर अकाउंटचे चालक असतील.
  • कलामांनी दिलेली भाषणे, त्यांची पुस्तके आदींमधील महत्त्वाचे अंश ट्‌विटरवरून शेअर केले जाणार आहेत.
  • तसेच बिहार सरकारने डॉ. कलाम यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी किशनगंज कृषी विद्यापीठाचे नाव बदलून ते डॉ. कलाम कृषी विद्यापीठ असे करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुगलचे ‘गुगल प्लस’ इतिहासजमा :

  • गुगलचे ‘गुगल प्लस’ इतिहासजमा होणार आहे. Google
  • समाजमाध्यमांतील ‘फेसबुक‘च्या वाढत्या लोकप्रियतेला तगडा पर्याय म्हणून अमेरिकन कंपनीने चार वर्षांपूर्वी ‘प्लस’ची निर्मिती केली होती.
  • परंतु लोकांच्या पसंतीची मोहोर उमटवण्यात व्यवस्थापनाला यश आले नाही.
  • गुगलशी संबंधित सर्व कामकाजाकरिता मध्यवर्ती केंद्र म्हणून ‘प्लस’ला स्थान होते.
  • मात्र गेले काही महिने ‘प्लस’चे वेगवेगळे खंड करून ग्राहकांना सेवा देण्यावर भर देण्यात आला होता.

दिनविशेष :

  • 29 जुलै : जागतिक व्याघ्र दिन

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 जुलै 2015)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.