Current Affairs of 28 January 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (28 जानेवारी 2017)

चालू घडामोडी (28 जानेवारी 2017)

उत्कृष्ट सेवेबद्दल 28 अधिकाऱ्यांना पोलिस पदक जाहीर :

 • सत्यम, व्यापमं आणि नोटाबंदीशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणांचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांसह 28 अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस पदके जाहीर झाली आहेत.
 • सत्यम कंपनीतील गैरव्यवहाराचा तपास करणारे हैदराबादचे अतिरिक्त संचालक ए.वाय. व्ही. कृष्णा यांना राष्ट्रपती पोलिस पदक मिळाले आहे. त्यांच्या तपासामुळे सत्यमचे प्रमुख रामलिंगम राजू व अन्य सात जणांना जबर दंड झाला.
 • मध्य प्रदेशातील गाजलेल्या व्यापमं गैरव्यवहाराचा तपास करणारे व सध्या चंडीगडचे पोलिस उपमहानिरीक्षक असलेले तरुण गाउबा तसेच नोटाबंदीनंतर बेकायदेशीर चलनव्यवहाराचे अनेक प्रकरणे बाहेर काढणारे चेन्नईचे पोलिस अधीक्षक पी.सी. तेंनमोझी यांनाही उत्कृष्ट सेवेसाठी पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
 • राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या अन्य अधिकाऱ्यांमध्ये पोलिस अधीक्षक सुशील प्रसादसिंग, अतिरक्त पोलिस अधीक्षक देवेंद्रसिंग, उपअधीक्षक किशनसिंग नेगी, निरीक्षक बन्सीधर तिवारी, सहायक पोलिस उपनिरीक्षक जी. सत्यनारायण यांचा समावेश आहे.
 • पोलिस पदक मिळालेल्यांमध्ये ग्यानेंद्र वर्मा, अतुल दिगंबर फुलझेले, के. प्रदीप कुमार, प्रमोद कुमार, ठाकूरसिंह भंडारी, सुरेंदसिंग यादव, निलंबर श्रीकिसन, सचिदानंद रथ, वसंत पवार, शफी मोहमंद, कमलेश कुमार, व्ही. बालाजी, बलिराम यांचा समावेश आहे.

एसटी महामंडळाकडून ‘कॅशलेस’ सेवा सुरू :

 • जुन्या नोटांवरील बंदीनंतर कॅशलेसचा पर्याय सार्वजनिक वाहतूक सेवांकडून निवडण्यात आला आहे.
 • एसटी महामंडळाकडूनही कॅशलेसचा पर्याय स्वीकारण्यात आला असून, तिकीट खिडक्यांवर डेबिट, क्रेडिट कार्ड स्वाइप करणाऱ्या मशिन बसवण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
 • खिडक्यांवर असणाऱ्या या मशिनव्दारे कार्ड स्वाइप करून तिकिटांचे शुल्क भरता येईल. प्रवाशांच्या सेवेसाठी राज्याच्या 31 विभागांमध्ये या मशिन बसवण्यात येत आहे.
 • तसेच सुरुवातीला दादर-पुणे-दादर, पुणे-औरंगाबाद, स्वारगेट-मुंबई, बोरीवली-स्वारगेट, पुणे-नाशिक अशा विनावाहक सेवांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
 • महामंडळाच्या बसेसना टोल ई-टॅग प्रणालीव्दारे एसटी महामंडळ भरणार आहे. महामार्गावरील जवळपास 3,500 बसेसना हे टॅग बसवण्यात आले असून, त्यामुळे टोलची रक्कम ही बँकेतून अदा केली जाईल.

दापोलीत सोलर उर्जा प्रकल्प उभारणार :

 • डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात येणार आहे. येत्या मे पर्यंत हा प्रकल्प सुरू होणार असून त्यानंतर सौर ऊर्जेवर चालणारे हे पहिले कृषी विद्यापीठ ठरणार आहे.
 • भविष्यात देशातील विजेची वाढती समस्या लक्षात घेऊन भारत सरकारने जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सोलर मिशनच्या माध्यमातून सरकारी कार्यालये सोलर ऊर्जेशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
 • तसेच याबाबत केंद्र सरकारने नेमलेल्या विकासकाशी (डेव्हलपर) विद्यापीठाचा करार झाला आहे. यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा निधी विकासकाला थेट केंद्र सरकारकडून मिळणार आहे.
 • कृषी विद्यापीठाला दरवर्षी सात ते आठ लाख युनिट विजेची आवश्यकता भासते. महावितरणच्या विजेचा दर प्रतियुनिट नऊ ते दहा रुपये आहे; परंतु सोलर युनिट बसविल्यास यातून विद्यापीठाला पाच लाख 35 हजार युनिट वीज मिळणार असून, त्याचा दर प्रतियुनिट पाच रुपये 59 पैसे एवढा असणार आहे. यातून महावितरण कंपनीपेक्षा तीन रुपये प्रतियुनिट दर कमी होणार असून, विद्यापीठाच्या वीज बिलात वर्षाला सुमारे 25 लाखांची बचत होणार आहे.

शहीद हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्र पुरस्कार :

 • काश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांशी एकट्याने मुकाबला करून त्यांना कंठस्नान घालणारे राष्ट्रीय रायफल्सचे शहीद हवालदार हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्र पुरस्काराने गौरविण्यात आले.
 • 68 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या पत्नी चासेन लोवांग दादा यांना हा पुरस्कार प्रदान केला.
 • अशोक चक्र हा शांततेच्या काळात दिला जाणारा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे.
 • मूळ अरुणाचल प्रदेशच्या असणाऱ्या हंगपन दादा यांनी काश्मीरच्या हिमाच्छादित पर्वतराजीत (13 हजार फूट उंचीवर) लपून बसलेल्या तीन घुसखोरांचा मुकाबला करून त्यांचा एकट्याने खात्मा केला होता.
 • तथापि, या चकमकीत त्यांना आपला प्राण गमवावा लागला. अरुणाचल प्रदेशच्या बोदुरिया गावातील मूळ रहिवासी हवालदार हंगपन यांना त्यांचे सहकारी प्रेमाने दादा अशी हाक मारत.
 • दादा 1997 मध्ये लष्कराच्या आसाम रेजिमेंटव्दारे लष्करात सहभागी झाले होते. नंतर त्यांची 35 राष्ट्रीय रायफल्समध्ये नेमणूक करण्यात आली. त्यांना गेल्यावर्षीच उंच पर्वतराजीत तैनात करण्यात आले होते.

दिनविशेष :

 • 28 जानेवारी 1900 हा भारताचे पहिले सरसेनापती जनरल के.एम. करिअप्पा यांचा जन्मदिन आहे.
 • ‘लाल बाल पाल’ या त्रयींतील लाला लजपतराय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 रोजी झाला.
 • 28 जानेवारी 2000 रोजी इंग्रजी मजकुराचे हिंदीत भाषांतर करणार्‍या ‘अनुवादक’ या देशातील पहिल्याच प्रकारच्या संगणक प्रणालीचे गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आली.
 • मराठी कवी मंगेश पाडगावकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार 28 जानेवारी 2003 रोजी जाहीर झाला होता.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.