Current Affairs of 27 January 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (27 जानेवारी 2017)

चालू घडामोडी (27 जानेवारी 2017)

नागरी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च “पद्मविभूषण” पुरस्कार :

  • देशातील दिग्गज राजकीय नेत्यांपैकी एक असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक मंडळाचे सदस्य डॉ. मुरलीमनोहर जोशी, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा, लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा (दोघांनाही मरणोत्तर), प्रसिद्ध गायक येसुदास, आध्यात्मिक क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तिमत्त्व सद्‌गुरू जग्गी वासुदेव आणि शास्त्रज्ञ प्रा. यू. आर. राव यांना नागरी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च “पद्मविभूषण” पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • मोहनवीणा वाद्याचे जनक, शास्त्रीय संगीततज्ज्ञ विश्‍वमोहन भट, पत्रकार चो रामस्वामी (मरणोत्तर), थायलंडच्या राजकुमारी महाचक्री सिरिनधोर्न आदी सात जणांना “पद्मभूषण” पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
  • तसेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, हॉकी संघाचा कर्णधार पी. श्रीजेश, ऑलिंपिक पदकविजेती महिला कुस्तीगीर साक्षी मलिक, ऍथलिट दीपा कर्मकार, पॅरा ऍथलिट दीपा मलिक, विकास गौडा, देहूचे डॉ. सुहास मापुसकर यांच्यासह 75 जणांना “पद्मश्री” पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
  • प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. कला, समाजसेवा, साहित्य, क्रीडा, विज्ञान, उद्योग, वैद्यकीय सेवा, शिक्षण, प्रशासकीय सेवा आदी वेगवेगळ्या क्षेत्रांतील 89 नामांकित चेहऱ्यांना या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
  • तसेच “पद्मविभूषण” पुरस्कार विजेत्यांमध्ये सात, “पद्मभूषण” विजेत्यांमध्ये सात आणि “पद्मश्री” पुरस्कार विजेत्यांमध्ये 75 जणांचा समावेश आहे.
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या मंजुरीनंतर केंद्र सरकारतर्फे या पुरस्कारांची औपचारिक घोषणा करण्यात आली.

‘व्हे प्रोटिन्स’पासून रेशीमची निर्मिती :

  • रेशीम हे फक्त टेक्साटाईल क्षेत्रातच नाही तर इतर अनेक क्षेत्रात वापरले जाते.
  • जगभरात रेशीम हे किटकांचे संगोपन करुन मिळविले जाते. परंतु, आता गायीच्या दुधापासून तयार होणाऱ्या ‘व्हे प्रोटिन’च्या आधारे शास्त्रज्ञांनी रेशीम निर्मिती केली आहे.
  • स्वीडनच्या रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील तज्ञ स्टिफन रॉथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेल्या रेशमाचा अनेक क्षेत्रात उपयोग होऊ शकतो. जसे की, जखम झाल्यानंतर ड्रेसिंग करताना विरघळणारे टाके घालण्याठी. सध्या कृत्रिमरित्या मिळालेले हे रेशीम 5 मिलीमीटर एवढे असुन, ते सर्वसाधारण दर्जाचे आहे.
  • तसेच यावरील पुढील संशोधन सुरु असुन, हे कृत्रिम रेशीम वापरुन त्याचे लांब व टिकाऊ धागे तयार करता येतील का असा प्रयत्न सुरु असल्याची माहिती रॉथ यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील चार जणांना जीवनरक्षा पदक :

  • माणुसकीचे दर्शन घडविण्याची उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या जीवनरक्षा पदकांसाठी महाराष्ट्रातील चौघांची निवड करण्यात आली आहे.
  • कारागृह सेवेत उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दलही महाराष्ट्रातील तीन जणांची या संदर्भातील सेवापदकांसाठी निवड करण्यात आली आहे.
  • जीवनरक्षा पदकांचे तीन प्रकार आहेत. सर्वोत्तम, उत्तम आणि जीवनरक्षा पदक. त्यातील उत्तम जीवनरक्षा पदकासाठी महाराष्ट्राच्या गोविंद लक्ष्मण तुपे यांची निवड करण्यात आली आहे, तर जीवनरक्षा पदकासाठी तेजेश ब्रिजलाल सोनावणे, मनोज सुधाकरराव बारहाते आणि नीलकांत रमेश हरिकांत्रा यांची निवड करण्यात आली आहे.
  • तसेच या पुरस्काराचे स्वरूप पदक, गृहमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तिपत्रक आणि रक्कम असे आहे. कारागृह सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार म्हणून सेवापदक दिले जाते.
  • महाराष्ट्रातील तीन पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश झालेला आहे. त्यात रमेश रघुनाथ शिंदे (हवालदार येरवडा कारागृह), सुभाष ज्ञानोबा कुऱ्हाडे (जेल शिपाई, येरवडा कारागृह) आणि शिवाजीराव बाबूराव पाटील (हवालदार, कोल्हापूर केंद्रीय कारागृह) यांचा समावेश आहे.

भारत आणि संयुक्त अरब अमिरात मध्ये करार :

  • भारत आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) यांनी संरक्षण, सुरक्षा, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रात 14 करारांवर 25 जानेवारी रोजी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
  • तसेच या दोन्ही देशांनी परस्पर सामंजस्य वाढविण्याचा निर्धार केला.
  • अबुधाबीचे युवराज शेख मोहंमद बिन झायेद अल नाहयान यांचे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी 24 जानेवारी रोजी भारतात आगमन झाले. यंदाच्या सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे होते.
  • अल नाहयान यांच्या सोबत यूएईचे अनेक मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांचेही आगमन झाले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अल नाहयान यांनी एक बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

दिनविशेष :   

  • 27 जानेवारी हा भारतात ज्यू स्मृति दिन आहे.
  • महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मितीअभ्यासक्रम संशोधन मंडळ हे शालेय अभ्यासक्रम तयार करणारे मंडळ 27 जानेवारी 1967 रोजी स्थापन करण्यात आले.
  • 27 जनेवारी रोजी कल्पकम येथील अणुऊर्जा निर्मिती केंद्राचे पहिले युनिट सुरु झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.