Current Affairs of 28 December 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (28 डिसेंबर 2015)

चालू घडामोडी (28 डिसेंबर 2015)

“स्टार्ट अप इंडिया”ची अंमलबजावणी 16 जानेवारीपासून :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “मन की बात” कार्यक्रमामध्ये नवीन वर्षात “स्टार्ट अप इंडिया”ची अंमलबजावणी 16 जानेवारीपासून सुरू करण्याची घोषणा Smart Cityकेली.
 • “स्टार्ट अप इंडिया- स्टॅंड अप इंडिया” या योजनेची घोषणा मोदींनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरील भाषणामध्ये केली होती.
 • 16 जानेवारीपर्यंत स्टार्ट अप- स्टॅंड अप इंडिया या योजनेचा आराखडा पूर्ण केला जाईल. यामध्ये आयआयटी, आयआयएमसारख्या संस्थांमधील तज्ज्ञांचेही योगदान असेल. हे स्टार्ट अप केवळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रासाठीच नसेल, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये स्टार्ट अप सुरू केले जाऊ शकते.
 • देशाच्या प्रत्येक भागामध्ये हा कार्यक्रम सुरू केला जावा. राज्यांनीही हा कार्यक्रम केवळ काही शहरांपुरता मर्यादित राहणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले.
 • तसेच “मन की बात” या कार्यक्रमामध्ये, टीका सुरू असलेल्या मुद्‌द्‌यांवर नेहमीप्रमाणे बोलण्याचे टाळून पंतप्रधान मोदींनी पर्यटन व्यवसायाच्या प्रोत्साहनासाठी पर्यटनस्थळांच्या स्वच्छतेचेही आवाहन केले.

चीन संसदेत दहशतवादविरोधी कायदा मंजूर :

 • चीन संसदेने दहशतवादविरोधी कायदा अपेक्षेप्रमाणे मंजूर केला.
 • नव्या कायद्यानुसार चीनमध्ये व्यवसाय करत असलेल्या विदेशी कंपन्यांना चीन सरकारला सर्व गोपनीय माहिती देणे बंधनकारक असणार आहे. तसेच माध्यमांवरील बंधनेही कडक होणार आहेत. यामुळे या कायद्याला बराच विरोध होत होता.
 • सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत या विधेयकाला मान्यता देण्यात आली होती. पक्षाच्या निर्णयाला संसदेत विरोध होत नसल्याने हा कायदा आज अधिकृतरीत्या संमत करण्यात आला.

आधार कार्ड नोंदणी प्रक्रियेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर :

 • रेशनिंग, रॉकेल आणि गॅस अनुदानासाठी सक्ती असलेल्या आधार कार्ड नोंदणी प्रक्रियेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर असून, उत्तर प्रदेशात सर्वाधिक Adhar Cardनोंदणीची नोंद करण्यात आली आहे.
 • नोव्हेंबर 2015 पर्यंत झालेल्या नोंदणी प्रक्रियेत राज्यात 10 कोटी 14 लाख 26 हजार 370 लोकांनी नोंदणी केल्याचे निदर्शनास आले आहे.
 • सर्वाधिक नोंदणी करणाऱ्या राज्यात उत्तर प्रदेशचे नाव पहिले असून यूपीमध्ये एकूण 13 कोटी 32 लाख 51 हजार 914 लोकांनी नोंदणी केल्याचा माहिती आहे.

ब्रिटनकडून पुणे शहराला अर्थसाह्य देण्याची घोषणा :

 • स्मार्ट पुण्याच्या दिशेने एक चांगले पाऊल पडले असून, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी पुणे शहराला दीड कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्याची घोषणा ब्रिटनकडून करण्यात आली आहे. पुढील 3 महिन्यांत हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनच्या दौऱ्यावर असताना भारतातील पुणे, अमरावती (आंध्र प्रदेश), इंदूर ही तीन शहरे स्मार्ट करण्यासाठी मदतीची घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी केली. त्याबाबतचे करारही त्या वेळी करण्यात आले.
 • पुणे शहरातील वाहतुकीचा प्रश्न जटिल असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मदतीची तयारी ब्रिटनने दर्शविली आहे.
 • ब्रिटन राबवित असलेल्या नावीन्यपूर्ण योजनांची माहिती महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना देण्यासाठी, ब्रिटनचे शिष्टमंडळ लवकरच पुण्यात येणार आहे.

एकाच मुलाचे धोरण आता चीनमध्ये बदलले :

 • गत तीन दशकांपासून सुरू असलेले एकाच मुलाचे धोरण आता चीनमध्ये बदलले आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या या निर्णयावर सरकारने अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले आहे.
 • सत्तारूढ सरकारने ‘हम दो, हमारे दो’ अर्थात दोन अपत्यांच्या धोरणास आज अधिकृतपणे मान्यता दिली.
 • जगातील सर्वांत मोठी दुसरी अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये एक मूल धोरणामुळे अलीकडच्या काळात काही समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यावर तोडगा म्हणून सरकारने हे धोरणच बदलण्याचा निर्णय घेतला.
 • एक जानेवारीपासून नवे धोरण अमलात येणार आहे. गत तीन दशकांपासूनचे जुने धोरण यामुळे संपुष्टात येईल.
 • नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीत 159 सदस्यांच्या अनुमतीने याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
 • सध्या चीनची लोकसंख्या 1 अब्ज 37 कोटी एवढी आहे.

सलमानच्या केकची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद :

 • वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी सलमानसाठी 400 फूट लांबीचा केक तयार केला आहे. या केकची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात येणारGuinness world record असल्याचं वृत आहे. त्यामुळे सलमानच्या नावावर अजून एक रेकॉर्ड होणार आहे.

लेगस्पिनर यासिर शहाला आयसीसीने केले निलंबित :

 • पाकिस्तानचा फॉर्ममध्ये असलेला लेगस्पिनर यासिर शहाचा डोपिंग चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आयसीसीने त्याला निलंबित केले आहे.

  आयसीसीने टि्वटरवरुन यासिर शहाच्या निलंबनाची माहिती दिली.

 • यासिरने 13 नोव्हेंबरला 2015 रोजी डोपिंग चाचणीसाठी नमुने दिले होते. वाडाने प्रतिबंधित केलेल्या पदार्थाचे घटक यासिरच्या नमुन्यांमध्ये सापडल्यामुळे यासिरला अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आले.

रेल्वे नियामक प्राधिकरणाचे नाव आता रेल्वे विकास प्राधिकरण करण्यात येणार :

 • रेल्वे खात्यातील विविध विकासकामे करणाऱ्या रेल्वे नियामक प्राधिकरणाचे नाव आता रेल्वे विकास प्राधिकरण करण्यात येणार आहे.
 • हे प्राधिकरण मालवाहतूक व प्रवासी वाहतुकीचे दर निश्चित करणार असून त्याच्या जोडीला विकास कामेही करणार आहे. रेल्वे सुधारणांसाठी स्वतंत्र रेल्वे प्राधिकरण स्थापन करण्याची सूचना अनेक समित्यांनी यापूर्वी केली होती.
 • आता रेल्वे नियामक प्राधिकरणाचे नाव रेल्वे विकास प्राधिकरण असे केले जाणार असून त्याची भूमिका व्यापक करणार आहे, असे रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दिनविशेष :

 • 1948 : मुंबई राज्यात कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला.
 • Dinvishesh
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.