Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs of 27 December 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (27 डिसेंबर 2015)

चालू घडामोडी (27 डिसेंबर 2015)

दहशतवाद नष्ट करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन :

 • अफगाणिस्ताची सुरक्षा, विकास आणि प्रशासन यांची क्षमता वाढविण्यासाठी भारत अफगाणिस्तान सरकारला मदत करेल, असे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिले.
 • अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित होऊन प्रत्येक अफगाण नागरिकाला उज्ज्वल भविष्य निर्माण करण्याचा हक्क आहे, असेही मोदींनी या वेळी सांगितले.
 • रशियाचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी आज पहाटे काबूलमध्ये दाखल झाले.
 • तसेच मोदी यांनी अफगाणिस्तान संसदेच्या नव्या इमारतीचे उद्‌घाटन करून त्यांनी संयुक्त अधिवेशनात संबोधित केले. ही इमारत भारतानेच बांधून दिली असून, यासाठी 9 कोटी डॉलर खर्च आला आहे.
 • अफगाणिस्तानच्या मृत सैनिकांच्या मुलांसाठी पाचशे शिष्यवृत्त्या देत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी या वेळी केली. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांच्याशी विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली.
 • तसेच अफगाण विद्यार्थ्यांसाठी भारतातर्फे सुरू असलेली शिष्यवृत्तीही सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

एअर इंडियाच्या विमानात मांसाहारी अन्न दिले जाणार नाही :

 • येत्या 1 जानेवारीपासून एअर इंडियाच्या कुठल्याही विमानात इकॉनॉमी वर्गातील प्रवाशांना 90 मिनिटांचा हवाई प्रवास असेल तर मांसाहारी अन्न दिले जाणार नाही असे सांगण्यात आले.
 • एअर इंडिया ही राष्ट्रीय हवाई वाहतूक कंपनी असून त्यांनी दुपारच्या जेवणातून चहा व कॉफी काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत एअर इंडियात 90 मिनिटांच्या प्रवासात मांसाहारी व शाकाही अन्न तसेत केक दिला जात असे. आता जानेवारीपासून त्यात बदल करण्यात आले आहेत.
 • सर्व देशांतर्गत विमानात 61 ते 90 मिनिटांच्या प्रवासात शाकाहारी अन्न दिले जाईल व हा निर्णय 1 जानेवारी 2016 पासून अमलात येईल.

चिनी वृत्तवाहिन्यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या रोबोटला दिले माहिती सादरकर्त्यांचे काम :

 • चीनमधील प्रयोग जगात प्रथमच चिनी वृत्तवाहिन्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या रोबोट म्हणजे यंत्रमानवांना हवामानविषयक माहिती सादरकर्त्यांचे काम दिले आहे.
 • ‘लाइव्ह ब्रेकफास्ट’ शोमध्ये हा प्रयोग करण्यात आला असून, आता टीव्ही अँकर म्हणजे सादरकर्त्यांचे काम यंत्रमानव सहज करू शकतील अशी आताची बातमी आहे. बातम्या व लेख लिहिणारे यंत्रमानव चीनने आधीच विकसित केले आहेत, पण ते दिलेल्या माहितीच्या आधारे बातमी किंवा लेख लिहून दाखवतात.
 • बातमीची रचना यंत्रमानवाला व्यवस्थित शिकवता येते व वार्ताहराने आणलेली माहिती त्याला दिली तर तो बातमी तयार करून देणार यात शंका नाही, कारण तो उपलब्ध माहितीच्या आधारे लेख लिहू शकतो हे सिद्ध झाले आहे.

जन्म-मृत्यू दाखल्यासह सर्व सरकारी सेवांसाठी योजना :

 • कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती जन्म-मृत्यू दाखल्यासह सर्व सरकारी सेवांसाठी आता एक पानी सुटसुटीत अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहेत असे सरकारने आज जाहीर केले.
 • आतापर्यंत वेगवेगळ्या सेवांसाठी जास्त पानांचे अर्ज होते ते आता एक पानाचे करण्यात येत आहेत केंद्रीय कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, जन्म-मृत्यू दाखल्यासह वेगवेगळ्या कामांसाठी मोठे अर्ज भरावे लागतात. आता आम्ही एकच पानांचा अर्ज उपलब्ध करून देत आहोत.
 • पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस हा सुप्रशासन दिन म्हणून साजरा करण्यात आला.त्यानिमित्ताने हा अर्ज जारी करण्यात आला.

भारत आणि रशिया यांनी संयुक्तरित्या हेलिकॉप्टर्सची बांधणी करण्याचे ठरवले :

 • भारत आणि रशिया यांनी संयुक्तरित्या हेलिकॉप्टर्सची बांधणी करण्याचे ठरवले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जाहीर केले.
 • कामोव्ह-226 टी हेलिकॉप्टर दोन्ही देशांनी मिळून तयार करण्यासही रशिया तयार असल्याचे संकेत दोन्ही नेत्यांच्या चर्चेत मिळाले होते.
 • भारतातील दोन ठिकाणी 12 अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याकरिता रशियाशी बोलणी सुरू असल्याचेही मोदी यांनी सांगितले.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World