Current Affairs of 28 April 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (28 एप्रिल 2018)

चालू घडामोडी (28 एप्रिल 2018)

राज्याची लोककला यूपीत सादर होणार :

  • उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी महाराष्ट्रातून गेल्यानंतरही राज्याबरोबरचे सांस्कृतिक बंध जोपासले आहेत.
  • 1 मे हा महाराष्ट्र दिन पहिल्यांदाच उत्तर प्रदेशच्या राजधानीत लखनौमध्ये साजरा केला जाणार असून, महाराष्ट्राचे कलादर्शन तेथील नागरिकांसमोर सादर केले जावे यासाठी उत्तर प्रदेशने महाराष्ट्राला निमंत्रण दिले आहे.
  • महाराष्ट्र दिनाला राज्याच्या लोककलेच्या दर्शनाचा कार्यक्रम लखनौत सादर केला जाणार आहे. यात भूपाळी, दशावतार, भारूड, नमन यांसारख्या लोककलांचा दोन तासांचा कार्यक्रम होणार आहे.
  • तसेच, 2 मे रोजी अरविंद पिळगावकर यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाविषयी सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक संजय पाटील यांनी सांगितले, की उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये जानेवारी महिन्यात सामंजस्य करार झालेला आहे.
  • 26 जानेवारीला देखील प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आपण तिथे कलापथक पाठविले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या दोन्ही राज्यांमध्ये सांस्कृतिक बंध आहेतच, त्याला यानिमित्ताने उजाळा मिळावा आणि हे स्नेहबंध दृढ व्हावेत, अशी कल्पना आहे. राज्यपाल राम नाईक यांची ही मूळ कल्पना असून, या दोन्ही राज्यांमधील संबंध दृढ व्हावेत यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 एप्रिल 2018)

भारत व चीनच्या शक्तीने जगाला समृद्ध करणार :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. मोदींनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी हुवेई येथील मर्किस संग्रहालय घेतली. यावेळी मोदी म्हणाले, ‘भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या शक्तीने जगाला समृद्ध करणार आहे. उभय नेत्यांच्या या शिखर परिषदेमुळे दोन्ही देशांमधील विश्वास वाढला आहे’.
  • हुवेई येथील मर्किस संग्रहालयात या दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीनंतर मोदी म्हणाले, भारत आणि चीन दोन्ही देश मिळून संपूर्ण जगाला समृद्ध करेल.
  • दोन्ही देशातील नेत्यांच्या या शिखर परिषदेमुळे दोन्ही देशांमधील विश्वास वाढला आहे. येत्या काळात भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावे यासाठी प्रयत्न करणार आहोत. मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होता तेव्हा मला हुआनला येण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी मी एका अभ्यासदौऱ्यासाठी आलो होतो. तसेच 2019 मध्ये भारतात अशाप्रकारच्या अनौपचारिक समिटचे आयोजन केल्यास मला आनंद होईल, असेही मोदी म्हणाले.

डॉ. सुहास पेडणेकर मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरु :

  • रसायनशास्त्राचे प्राध्यापक तसेच माटुंग्याच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास रघुनाथ पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी 27 एप्रिल रोजी डॉ. पेडणेकर यांना राजभवन येथे बोलावून नियुक्तीचे पत्र सुपूर्द केले.
  • डॉ. पेडणेकर यांची नियुक्ती कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची 65 वर्षे पूर्ण करतील तोपर्यंत करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 24 ऑक्टोबर रोजी डॉ. संजय देशमुख यांना विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरुन कार्यमुक्त केल्याने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूपद रिक्त झाले होते.
  • तसेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते.
  • मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के.कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन केली होती.

लोकसंख्येत अडकणार ‘सीआरझेड’ शिथिलता :

  • सागरी नियमन क्षेत्राबाबत (सीआरझेड) केंद्राने दिलासा देणारा निर्णय घेतला असला तरी यानंतरही सिंधुदुर्गातील सीआरझेडचे बंधन कमी होण्याची शक्‍यता धुसर आहे.
  • केंद्राने नवे निकष जारी करताना याला लोकसंख्येची अट घातली आहे. विरळ लोकवस्तीची सिंधुदुर्ग किनारपट्टी या निकषांच्या चाकोरीत बसण्याची शक्‍यता कमी आहे.
  • राज्याने सीआरझेडच्या निकषात शिथिलता आणण्याची मागणी केली होती. हा प्रस्ताव केंद्राने स्विकारला. त्यांनी सीआरझेडचे क्षेत्र भरतीरेषेपासून 50 मीटर वर आणण्याची तयारी दर्शविली.
  • तसेच यासाठी हरकती मागविण्यात आल्या आहेत. या निर्णयाने कोकणात पर्यटनाला उभारी मिळेल, अशी आशा निर्माण झाली होती; मात्र हे नोटीफिकेशन पाहता सिंधुदुर्गाची पाटी कोरीच राहण्याची शक्‍यता आहे.
  • सिंधुदुर्ग प्रामुख्याने सीआरझेडच्या तिसऱ्या टप्प्यात येतो. यात भरतीरेषेपासून 200 ते 500 मीटर पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र आहे. केंद्राने जारी केलेल्या परिपत्रकात या क्षेत्रामध्ये प्रति किलोमीटर 2161 इतकी लोकसंख्या असलेल्या ठिकाणीच हे निकष बदलले जाणार आहेत. किनारपट्टीवर बहुसंख्य गावे विरळ लोकवस्तीची आहेत. ती या निकषात बसण्याची शक्‍यता फारच कमी आहे.

जिओ देणार 80 हजारांना नोकरीची संधी :

  • टेलिकॉम सेक्टरमध्ये धमाका करणारी कंपनी रिलायन्स जिओने आता नोकरी शोधणा-यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. कंपनी आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 80 हजार जणांची भरती करणार आहे. नव्या लोकांच्या भरतीसाठी सोशल मीडियाचाही वापर केला जाणार आहे.
  • रिलायन्स जिओचे मुख्य मानव संसाधन अधिकारी (Chief human resources officer) संजय जोग यांनी एका कार्यक्रमात याबाबत माहिती दिली.
  • जिओ यावर्षी 75 हजार ते 80 हजार नव्या नोक-या उपलब्ध करेल असे ते म्हणाले. आधीपासूनच कंपनीत 1.57 लाख लोक नोकरी करत असून यावर्षी आम्ही आणखी भरती करणार आहोत अशी माहिती जोग यांनी दिली.
  • रिलायन्स जिओने 6 हजारांपेक्षा जास्त महाविद्यालयांसोबत भागीदारी केली आहे. यामध्ये देशातील अनेक टेक्निकल इंन्स्टिट्यूट्सचा समावेश आहे. येथे शिकणा-यांसाठी नोकरी मिळण्याची सोपी संधी असेल, याशिवाय सोशल मीडियाचाही भरतीमध्ये वापर केला जाणार आहे असे जोग म्हणाले.

यूपीएससीत गिरीश बडोले राज्यातून पहिला :

  • केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) 2017 वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील गिरीश बडोले राज्यातून पहिला आला आहे. देशात त्याचा विसावा क्रमांक लागला आहे.
  • तसेच याशिवाय कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्या मुलानेही परीक्षेत बाजी मारली आहे. दिग्विजय बोडके हा राज्यातून 54वा आला आहे. हैदराबादचा अनुदिप दुरीशेट्टीने देशातून पहिला येण्याचा मान मिळवला आहे.
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर केला आहे. परीक्षा दिलेले परीक्षार्थी अधिकृत वेबसाइट upsc.gov.in. वर जाऊन निकाल पाहू शकतात.
  • 28 ऑक्टोबर 2017 ला केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा झाली होती. एकूण 980 जागांसाठी ही परीक्षा झाली होती. आयएएस, आयएफएस, आयपीएस आणि केंद्रीय सेवा यांच्यासहित इतर सरकारी विभागांसाठी ही परीक्षा होती. 980 पैकी 54 जागा आरक्षित होत्या.

दिनविशेष :

  • लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी ‘वासुकाका जोशी’ यांचा जन्म 28 एप्रिल 1854 रोजी झाला.
  • 28 एप्रिल 1916 रोजी होम रुल लीगची स्थापना झाली.
  • अझरबैजान यांचा सोविएत युनियनमधे सन 1920 मध्ये समावेश झाला.
  • इराकी हुकूमशहा आणि इराकचे 5वे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांचा जन्म 28 एप्रिल 1937 रोजी झाला.
  • 28 एप्रिल 2001 रोजी डेनिस टिटो हा पैसे देउन अंतराळात प्रवास करणारा पहिला अंतराळ प्रवासी झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 एप्रिल 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.