Current Affairs of 27 April 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (27 एप्रिल 2018)

चालू घडामोडी (27 एप्रिल 2018)

दादासाहेब फाळके एक्‍सलन्स ऍवॉर्डस्‌ सोहळा :

  • वांद्रे येथील सेंट ऍण्ड्य्रुज ऑडिटोरियमच्या परिसरात ती संध्याकाळ वेगळेच रंग घेऊन आली होती. इथे वातावरणात अनोखा उत्साह होता, ढोल-ताशांचा गजर वारंवार होत होता आणि आगमन होत होते मान्यवर सेलिब्रिटींचे. निमित्त होते ते दादासाहेब फाळके एक्‍सलन्स ऍवॉर्डस्‌ सोहळ्याचे!
  • चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या 148 व्या जयंतीचे औचित्य साधून एच.आर. एन्टरटेन्मेंटचे हर्ष गुप्ता, अभिनेत्री पूनम झावेर व स्माईल फाउंडेशन यांच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
  • तसेच या सोहळ्याचे यंदाचे हे पाचवे वर्ष. या सोहळ्याला हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील बहुसंख्य तारे-तारकांनी हजेरी लावली होती.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 एप्रिल 2018)

एसटी कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द :

  • एसटी महामंडळामध्ये भरती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना सध्या एक वर्षापर्यंत कनिष्ठ वेतन श्रेणीवर काम करावे लागते. ही कनिष्ठ वेतनश्रेणीची पद्धत रद्द करण्यात आल्याची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. या निर्णयाचा लाभ नव्याने भरती होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना होईल, असे त्यांनी सांगितले.
  • रावते म्हणाले, की एसटी महामंडळात भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या एक वर्ष कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करावे लागते. या काळात कमी वेतनामुळे त्यांना अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते.
  • या कर्मचाऱ्यांची होणारी आर्थिक कुचंबणा लक्षात घेता कनिष्ठ वेतन श्रेणीची पद्धती रद्द करण्यात येईल. या निर्णयावर संचालक मंडळाच्या येणाऱ्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
  • एसटीमध्ये पूर्वी नवीन कर्मचारी भरती झाल्यानंतर त्याला सुरवातीची पाच वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करावे लागत होते. तो कालावधी नंतर तीन वर्षांवर आणण्यात आला. मी तो कालावधी एक वर्षावर आणला. पण आता हा कालावधीही रद्द करण्यात येईल. या निर्णयाचा लाभ नव्याने भरती होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना होईल, असे त्यांनी सांगितले.

कॉलेजियमची शिफारस केंद्राला अमान्य :

  • न्या. के.एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेली शिफारस केंद्र सरकारने फेरविचारासाठी परत पाठवून दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे प्रशासन आणि न्यायपालिका या लोकशाहीच्या दोन स्तंभांमधील सध्याचे तणावाचे वातावरण आणखी तापण्याची शक्‍यता आहे.
  • न्या. जोसेफ हे सध्या उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. जानेवारीमध्ये न्या. जोसेफ आणि ज्येष्ठ वकील इंदू मलहोत्रा यांच्या नावांची शिफारस कॉलेजियमने केली होती.
  • सरकारने 25 एप्रिल रोजी मलहोत्रा यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदावर करीत जोसेफ यांच्याबाबतचा निर्णय ताटकळत ठेवला होता.
  • 2016 मध्ये न्या. जोसेफ यांनी उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट रद्द करण्याचा निर्णय दिल्याने कॉंग्रेस सरकार पुन्हा सत्तेवर आले होते. या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता.

आयआयटीव्दारे सर्वोत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती :

  • तंत्रज्ञान आणि कल्पकता यामुळे संशोधनासाठी नावाजल्या जाणाऱ्या मुंबई येथील इंडियन इन्स्टिटय़ू ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) संस्थेच्या विद्यार्थ्यांनी ओएनजीसीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सौरचूल’ स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट सौरचूल बनविण्याचा सन्मान मिळवला आहे. यासाठी संस्थेला दहा लाख रुपयांचे पारितोषिकही मिळाले आहे.
  • खेडोपाडी दिसणारी धुरांडी आणि पारंपरिक चुलींऐवजी आरोग्य व पर्यावरणपूरक साधने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचव्यात या उद्देशाने ओनजीसीच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर ‘सौरचूल’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशभरातील सुमारे दीड हजार अर्जाची नोंदणी झाली होती.
  • जानेवारी 2018 मध्ये झालेल्या छाननीमधून 13 अर्जाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. फेब्रुवारीमध्ये झालेल्या दुसऱ्या फेरीमध्ये प्रत्यक्ष प्रकल्पांची पाहणी करून सवरेत्कृष्ट प्रकल्प म्हणून मुंबईच्या आयआयटी संस्थेने सादर केलेल्या सौर चुलीची निवड करण्यात आली.
  • तसेच या प्रकल्पांची छाननी आणि निवड प्रक्रिया अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने केली.

राज्यातील पोटनिवडणुका 28 मे रोजी :

  • लोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघर, भंडारा- गोंदिया मतदारसंघांसह सांगली जिल्ह्यातील पलूस- कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 28 मे रोजी मतदान होणार आहे. 31 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील.
  • पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. भंडारा, गोंदिया, पालघर, तसेच सांगली येथे आचारसंहिता लागू झाली आहे. लोकसभेत भंडारा- गोंदियाचे प्रतिनिधित्व करणारे नाना पटोले यांनी डिसेंबर 2017 मध्ये भाजपचा आणि खासदारकीचा राजीनामा दिल्याने भंडारा- गोंदियाची जागा रिक्त झाली होती.
  • भाजपचे खासदार ऍड. चिंतामण वनगा आणि कॉंग्रेसचे आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे पालघर तसेच पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक लागली आहे.
  • उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने राज्यातील पोटनिवडणुकांविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

दिनविशेष :

  • मोर्स कोडतारायंत्राचे जनक आणि चित्रकार सॅम्युअल मोर्स यांचा जन्म 27 एप्रिल 1791 रोजी झाला.
  • पुण्याहून मुंबईला तारायंत्राद्वारे पहिला संदेश 27 एप्रिल 1854 रोजी पाठविला गेला.
  • महात्मा गांधींचे अनुयायी डॉ. मणिभाई भीमभाई देसाई यांचा जन्म 27 एप्रिल 1920 मध्ये झाला.
  • सन 1999 मध्ये 27 एप्रिल पासून भारतात एकाच अग्निबाणाद्वारे एकापेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची प्रणाली तयार झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 एप्रिल 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.