Current Affairs of 30 April 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (30 एप्रिल 2018)

चालू घडामोडी (30 एप्रिल 2018)

ऊर्जा संवर्धनात ठाणे महापालिका प्रथमस्थानी :

 • ऊर्जा संवर्धन आणि ऊर्जा कार्यक्षमता या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत यंदाही ठाणे महापालिकेने महाराष्ट्र राज्य ऊर्जा अभिकरणातर्फे देण्यात येणाऱ्या दोन राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारांवर आपले नाव कोरले.
 • राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार महापालिकेचे उपनगर अभियंता सुनील पोटे यांनी स्वीकारला.
 • महापालिकेने ऊर्जा संवर्धन क्षेत्रात आजवर विविध उपाययोजना केल्या असून राष्ट्रीय; तसेच राज्यपातळीवर महापालिकेला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
 • तसेच यंदाही महापालिका आणि हॉस्पिटल बिल्डिंग या दोन संवर्गात हा पुरस्कार ठाणे महापालिकेलाच प्राप्त झाल्याने विविध क्षेत्रांमध्ये ऊर्जा संवर्धनाला वाव आणि ऊर्जा कार्यक्षमतेचे महत्त्व पटवून देणारी आदर्श महापालिका ठरली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 एप्रिल 2018)

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील :

 • राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पक्षाचे विधिमंडळातील गटनेते जयंत पाटील यांची पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत एकमताने निवड करण्यात आली. अन्य पदाधिकाऱ्यांची निवड येत्या दहा दिवसांत करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
 • ‘राज्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पायाला भिंगरी लावून फिरू. येत्या चार महिन्यांत पक्षाध्यक्षांना अपेक्षित अशी संघटना उभी करण्याचा प्रयत्न करू, असे सांगत यापुढे कामगिरी पाहूनच पदे दिली जातील’, असे पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले.
 • आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फेरबदल करण्यात आले. तटकरे यांच्याकडे गेली चार वर्षे असलेल्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली.

टाकाऊ प्लॅस्टिकपासून इंधनाची निर्मिती :

 • प्लॅस्टिक कचऱ्याचा पुन्हा वापर आणि त्याचे होणारे प्रदूषण टाळता येईल का, या विचारातून पुण्यात टाकाऊ प्लॅस्टिकपासून इंधन निर्मितीच्या कामास सुरवात झाली. त्यातून स्वस्तात आणि कमी प्रदूषण करणाऱ्या इंधनाची निर्मिती करणारे ‘पायरॉलिसिस युनिट’ तयार झाले. हे साकार झालंय पुण्यातील ‘सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्क’च्या जीडी एन्व्हॉयर्न्मेंटल प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअपमुळे.
 • केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या साह्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात ‘सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्क’ कार्यरत आहे.
 • दिवसेंदिवस वाढणारी प्लॅस्टिक कचऱ्याची समस्या लक्षात घेऊन, त्यावरील उपाय म्हणून पायरॉलिसिस युनिट तयार केले आहे. त्याच्या साह्याने कोणत्याही प्रकारच्या प्लॅस्टिकवर प्रक्रिया करून त्यापासून तेल बनविणे शक्‍य होत आहे.

भामा आसखेडचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार :

 • महापालिका, जिल्हा प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक चर्चा झाल्याने रखडलेल्या भामा आसखेड प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, येत्या डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्याबाबत संबंधित ठेकेदाराला सूचना करण्यात आली आहे.
 • तसेच, कामात अडथळे येऊ नयेत, यासाठी राज्य राखीव दलाचे पथक नेमण्यात आले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 • शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी आखलेल्या भामा आसखेड प्रकल्पाचे बंद पडलेले काम आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे. गेल्या वर्षी हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे ते थांबले होते.
 • राज्य सरकारच्या पातळीवर दोनदा चर्चा होऊनही शेतकऱ्यांनी जलवाहिनी आणि जॅकवेलचे काम रोखले होते. राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणा मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी दहा दिवसांपूर्वी पुन्हा आंदोलन केले होते. मात्र, महापालिका आयुक्त सौरभ राव आणि आंदोलनकर्त्यांच्या बैठकीनंतर जलवाहिनीचे काम सुरू आहे.

सरकारी सेवा आता एका क्‍लिकवर उपलब्ध :

 • कोणतेही सरकारी केंद्र, वीजबिल भरणा केंद्र, तक्रारनिवारण केंद्र बघा. अशा केंद्रांच्या दारात नागरिकांची रांग ही नित्याची बाब असायची आणि अजूनही असते.
 • महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर पूर्वी या रांगा ओसंडून वाहायच्या; मात्र आता चित्र बदलू लागले आहे.
 • स्मार्ट फोन आणि इंटरनेट यांच्या मदतीमुळे तुम्ही या सरकारी सेवांशी संबंधित कामे, बिले भरण्याची कामे घरबसल्या एका क्‍लिकवर करू शकता.
 • पासपोर्ट काढण्यासारखे किचकट कामही आता डिजिटल मदतीमुळे लवकर होऊ शकते. ‘डिजिटल इंडिया’च्या पार्श्वभूमीवर कॅशलेस होण्याबरोबरच शासकीय सेवाही डिजिटल व्हाव्यात सरकार या प्रयत्नात आहे.

उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांचा राजीनामा :

 • जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी 29 एप्रिल रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी कविंदर गुप्ता हे आता उपमुख्यमंत्री असतील.
 • तसेच गुप्ता सध्या जम्मू-काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष आहेत. दरम्यान, 30 एप्रिल रोजी मेहबुबा मुफ्ती मंत्रिमंडळात फेरबदल करणार आहेत. या फेरबदलात भाजपाकडून काही नवीन चेहरे दिले जाण्याची शक्यता आहे.
 • राज्यपाल एन.एन. व्होरा 30 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील.

दिनविशेष :

  • भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ ‘दादासाहेब फाळके’ यांचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी झाला.
  • माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत ‘तुकडोजी महाराज’ यांचा जन्म सन 1909 मध्ये 30 एप्रिल रोजी झाला.
  • 30 एप्रिल 1921 रोजी ‘जीपीएस’चे सहसंशोधक ‘रॉजर एल.ईस्टन’ यांचा जन्म झाला.
  • वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी 30 एप्रिल 1936 रोजी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.
  • 30 एप्रिल 1982 मध्ये कलकत्त्यात बिजान सेतु हत्याकांड घडले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 मे 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.