Current Affairs of 26 May 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (26 मे 2016)
लिनोवो भारतात नवा प्रकल्प उभारणार :
- संगणक क्षेत्रातील आघाडीवर असलेली चिनी कंपनी लिनोवो भारतात व्यवसाय वृद्धीसाठी नवा उत्पादन प्रकल्प स्थापन करण्याचा विचार करीत आहे.
- सध्या कंपनीचा पुद्दुचेरी येथे एक स्वतंत्र उत्पादन प्रकल्प आहे.
- ‘आयबीएम‘च्या पर्सनल संगणक व्यवसायाचे अधिग्रहण केल्यानंतर कंपनीकडे या प्रकल्पाची मालकी हस्तांतरित झाली होती.
- परंतू आता कंपनीला तेथील सरकाकडून मिळणारी कर सवलत संपल्याने कंपनी नव्या प्रकल्पाच्या शोधात असल्याची माहिती खासगी सुत्रांनी दिली आहे.
- लिनोवोच्या पुद्दुचेरी प्रकल्पात वर्षाला 15 लाख पर्सनल संगणक तयार केले जातात.
- कंपनीच्या या निर्णयाचा ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पाला फायदा होणार आहे.
- लिनोवो भारतात संगणक क्षेत्रात कंपनी आघाडीवर आहे.
- 2015 वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीचा संगणक बाजारपेठेत 25.3 टक्के वाटा होता.
Must Read (नक्की वाचा):
व्हॉट्सअॅपचा वापर जगातील 109 देशांमध्ये :
- संदेश पाठविण्यासाठी सध्याच्या काळात सर्वाधिक वापर होत असलेल्या व्हॉट्सअॅपने जगातील 109 देशांमध्ये आपले जाळे पसरवले आहे.
- मेसेजिंग सेवेसाठी सोपे असल्यामुळे व्हॉट्सअॅपला ही पसंती मिळत आहे.
- तसेच हे अॅप जगातील 109 देशांमध्ये वापरले जात असल्याचे सिमिलर वेब या डिजिटल मार्केटिंग इंटेलिजन्स कंपनीने हे सर्वेक्षण केले आहे.
- भारतामध्ये 94.8 टक्के अॅण्ड्रॉइड मोबाइल फोन्समध्ये व्हॉट्सअॅप डाऊनलोड केले असून दिवसातील सरासरी 37 मिनिटे त्याचा वापर होतो असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
- हे सर्वेक्षण जगातील 187 देशांमध्ये करण्यात आले. त्यातील 109 देशांमध्ये म्हणजे 55.6 टक्के प्रदेशात व्हॉट्सअॅपलाच प्राधान्य मिळाले आहे.
- भारताप्रमाणे ब्राझील, मेक्सिको, युनायटेड किंगडम, रशिया व दक्षिण अमेरिकेतील इतर देशांमध्ये व्हॉट्सअॅपचा मोठा वापर होत आहे.
- दहा देशांपेक्षा लोकप्रिय अस्तित्व असणाऱ्या मेसेंजर अॅप्समध्ये वायबर आहे.
- पूर्व युरोपातील लोकांची वायबरला अधिक पसंती आहे.
- बेलारूस, माल्दोवा, युक्रेन व इतर देशांमध्ये ते प्रथम क्रमांकावर आहे.
सेबी कडून पी-नोटचे नियम कडक :
- परदेशी गुंतवणूकदारांना देशात गुंतवणूक करता यावी यासाठी तयार करण्यात आलेली पार्टिसिपेटरी नोटची (पी-नोट) सुविधा वादात सापडल्यामुळे भांडवल बाजार नियंत्रक सेबीने अखेर पी-नोटचे नियम कडक केले आहेत.
- काळ्या पैशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या शिफारसींनुसार सेबीने खालील नियम तयार केले आहेत.
- पी-नोट घेणाऱ्या सर्व परदेशी गुंतवणूकदारांना भारतातील काळा पैसा प्रतिबंधक कायद्याचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.
- पी-नोटच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनाला आल्यास या पी-नोट जारी करणाऱ्यांना त्याची माहिती तात्काळ देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- पी-नोट जारी करणाऱ्यांना यापुढे पी-नोटमधून देशात येणाऱ्या पैशाचा कालबद्ध आढावा घ्यावा लागणार आहे. हा आढावा घेऊन त्याचा अहवाल दर महिन्याला सेबीला देणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
- पी-नोट जारी करताना व त्याचा वापर करून देशात गुंतवणूक करताना कोणत्याही प्रकारची ढिलाई यापुढे सहन केली जाणार नाही, असेही सेबीने बजावले आहे.
वॉशिंग्टनमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय :
- अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील अध्यक्षीय स्पर्धेतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टनची प्राथमिक फेरी सहज जिंकली असून ते आता उमेदवारीच्या आणखी जवळ पोहोचले आहेत.
- डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीत आघाडीवर असलेल्या हिलरी क्लिंटन यांच्याशी त्यांची नोव्हेंबरमध्ये लढत होणार हे जवळपास स्पष्ट आहे.
- ट्रम्प यांचा आताचा विजय हा निदर्शकांनी न्यू मेक्सिकोतील अलबुकर्क येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी घातलेला गोंधळ व त्यानंतर पोलिसांनी केलेली कारवाई यामुळे गाजला आहे.
- वॉशिंग्टनमध्ये त्यांना 76.2 टक्के मते पडली असून आता त्यांना विजयासाठी दहापेक्षाही कमी प्रतिनिधी मतांची गरज आहे.
- ट्रम्प यांच्याकडे आता 1229 प्रतिनिधी मते आहेत व उमेदवारीसाठी 1237 प्रतिनिधी मते लागतात.
सानिया-मार्टिनाचा फ्रेंच ओपन टेनिसच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश :
- अग्रमानांकित सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीसच्या जोडीने दारिया कासासकिना व अलेक्सझॅँड्रा पानोव्हा या जोडीला पराभूत करत फ्रेंच ओपन टेनिसच्या महिला दुहेरी गटातील दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
- विम्बल्डन, अमेरिकन व ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन जोडी सानिया- मार्टिना या जोडीने 7-6, 6-2 असा विजय संपादन केला.
- तसेच या जोडीला कॅलेंडर स्लॅम पूर्ण करण्यासाठी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणे गरजेचे आहे.
- दुसऱ्या फेरीत या जोडीचा सामना करीन नाप व मॅँडी मिनेला विरुद्ध नाओ हिबिनो व एरी होजोमी यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.
- सानिया-मार्टिनाला या सामन्या तीन वेळा आपली सर्व्हिस गमवावी लागली तर 12 ब्रेकपॉर्इंटचा सामना करावा लागला.
- मिश्र दुहेरीत सानिया इवान डोडिंग याच्याबरोबर तर बोपन्ना रशियाच्या आलिया कुद्रयावत्सेवा बरोबर खेळणार आहेत.
- लिएंडर पेस मार्टिना हिंगीस बरोबर खेळणार आहे. या जोडीने 2015 मध्ये तीन ग्रॅँडस्लॅम जिंकले होते.
दिनविशेष :
- 1885 : राम गणेश गडकरी, मराठी नाटककार, विनोदकार आणि कवी यांचा जन्म.
- 1986 : युरोपमधील देशांनी युरोपीय संघाचा झेंडा स्वीकारला.
- 1999 : भारत-पाकिस्तानमध्ये कारगिल युद्धाची सुरुवात.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा