Current Affairs of 25 May 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (25 मे 2016)

चालू घडामोडी (25 मे 2016)

राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचे चीनमध्ये आगमन :

 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे चार दिवसांच्या चीन भेटीवर (दि.24) येथे आगमन झाले.
 • उभय देशांतील राजकीय व आर्थिक संबंध वृद्धिंगत करणे, तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे भारताला सदस्यत्व मिळून देण्यास चीनचा असलेला विरोध आणि जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर करण्याच्या युनोच्या प्रयत्नांमध्ये चीनने आणलेली आडकाठी हे विषय या दौऱ्यात चर्चेत असतील.
 • राष्ट्रपती या नात्याने मुखर्जी प्रथमच चीनला भेट देत आहेत.
 • तसेच त्यांचे (दि.26) बीजिंगमध्ये आगमन होईल. तेथे त्यांची अध्यक्ष शी जिनपिंग व इतर चिनी नेत्यांशी भेट होईल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 मे 2016)

अभ्यासक्रमात बदलाची प्रक्रिया सुरू :

 • राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 2810 जागांवरील प्रवेश 5 मे रोजी राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेद्वारेच (सीईटी) देण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
 • पुढील वर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश ‘नीट’च्या माध्यमातूनच प्रवेश दिले जाणार असून, त्यासाठी बारावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्याविषयीची चाचपणी तज्ज्ञांनी तयारी सुरू केली असल्याची माहिती तावडे यांनी दिली.
 • महाराष्ट्राच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारित असलेल्या 2810 जागांवरील प्रवेश सीईटीद्वारे होण्याचा मार्ग राष्ट्रपतींच्यामार्फत काढण्यात येणाऱ्या अध्यादेशामुळे मोकळा झाला आहे.
 • खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील 1720 व अभिमत विद्यापीठातील 1675 अशा एकूण 3395 जागा या नीट परीक्षेद्वारेच भरल्या जाणार असल्याचेही तावडे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

निधी रोखणारे विधेयक मंजूर :

 • पाकिस्तान हक्कानी नेटवर्कच्या विरोधात कारवाई करीत आहे असे प्रमाणपत्र संरक्षण सचिव अमेरिकन काँग्रेसला देत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानला 30 कोटी डॉलरची लष्करी मदत थांबविण्यात यावी, अशी तरतूद असलेले विधेयक अमेरिकन सिनेटने मंजूर केले आहे.
 • तसेच यापूर्वीही अमेरिकेकडून दहशतवादविरोधात कारवाईसाठी मिळालेल्या अर्थसहाय्याचा वापर पाकिस्तानने भारत विरोधात केला आहे.
 • पाकिस्तानची लष्करी मदत रोखणारे हे विधेयक मंजूर करण्याचा सिनेटचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.  
 • दहशतवादविरोधी कारवायांमध्ये साह्य करण्यासाठी पाकिस्तानला हा निधी अमेरिकेकडून देण्यात येणार होता.
 • पाकिस्तानला गेल्या वर्षीही ही नियोजित मदत रोखण्याचा निर्णय घ्यावा लागला होता.

राज्यात (दि.25) बारावीचा निकाल जाहीर :

 • राज्यातील नऊ विभागीय मंडळांत राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज (ता. 25) रोजी दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे.
 • दहावीचा निकाल एक जूनपर्यंत जाहीर होण्याचे सूतोवाच राज्य मंडळाने केले आहे.
 • ऑनलाइन निकालानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गुणपत्रिका तीन जून रोजी दुपारी तीन वाजल्यापासून त्यांचे उच्च माध्यमिक विद्यालय वा कनिष्ठ महाविद्यालयात मिळतील.
 • विद्यार्थ्यांना त्यांचा ऑनलाइन निकाल विविध संकेतस्थळावर पाहता येईल.
 • तसेच विषयनिहाय मिळविलेल्या गुणांची प्रतही त्यांना घेता येईल.
 • निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि गुणपडताळणीसाठी अर्ज करता येईल.
 • निकालासाठी संकेतस्थळे  
 • www.mahresult.nic.in  
 • www.result.mkcl.org  
 • www.maharashtraeducation.com
 • http://maharashtra12.knowyourresult.com
 • www.rediff.com/exams
 • http://maharashtra12.jagranjosh.com

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आयपीएलच्या अंतिम फेरीत :

 • आयपीएलच्या क्वालिफायर राऊंडमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने गुजरात लायन्सवर 4 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे.
 • आरसीबीने 158 धावांचा पाठलाग करताना 18.2 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 159 धावा करून विजय मिळवला.
 • बँगलोरकडून ए. बी. डिव्हिलियर्सने नाबाद खेळी करत भेदक फलंदाजीच्या जोरावर शेवटपर्यंत टिकून राहत 5 चौकार आणि 5 षटकार मारत अर्धशतक पार करत 79 धावांची खेळी केली.

दिनविशेष :

 • आर्जेन्टिना, लिब्या मे क्रांती दिन.
 • जॉर्डन, सुदान, आर्जेन्टिना राष्ट्र दिन.
 • लेबेनॉन मुक्ती दिन.
 • युगोस्लाव्हिया युवा दिन.
 • 1955 : जगातील उंचीनुसार तिसरे शिखर कांचनगंगा जॉर्ज बॅंड आणि जो ब्राऊन यांनी प्रथमच सर केले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 मे 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.