Current Affairs of 27 May 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (27 मे 2016)
गुगलचे नवे अॅप ‘एलो’ मेसेजिग’ :
- सध्या मेसेजिंग अॅप ची प्रचंड क्रेझ आहे. जणू काही हे मेसेजिंग अॅप म्हणजे लोकांच्या प्राथमिक गरजांपैकीच एक गरज झाले आहेत.
- तसेच या मध्ये व्हॉट्सअॅप, फेसबुक मेसेंजर ,हाईक आदी मेसेंजर अॅप ची चलती आहे. त्यामध्ये व्हॉट्सअॅपचा वापर जगभरात सगळ्यात जास्त होतो आहे.
- दिवसेंदिवस व्हॉट्सअॅप आणि तत्सम मेसेंजर अॅप वापरणारे वाढतच आहे.
- आता या स्पर्धेत सर्च इंजिनचा बादशहा गुगलने पुन्हा उडी घेतली आहॆ.
- गुगलने एलो नावाचे स्मार्ट मेसेजिग अॅप आणण्याची तयारी केली आहे.
- तसेच या अॅप मध्ये गुगलने आर्टिफ़िशिअल इंटेलिजन्सचा वापर केल्याचा दावा केला आहे.
- समजा तुम्हाला एखाद्या मेसेजला रिप्लाय द्यायचा असल्यास हे अॅप तुम्हाला शब्द सुचवणार आहे.
- सध्या या अॅपचे गुगल प्ले वर रेजिस्ट्रेशन सुरु आहे.
- गुगल एलो नावाने गुगल प्लेवर सर्च करून या अॅपचे रेजिस्ट्रेशन करता येते.
Must Read (नक्की वाचा):
निलंबित शारापोवाचा ऑलिम्पिक संघात समावेश :
- जागतिक टेनिस क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू रशियाची मारिया शारापोवा हिला डोपिंगच्या आरोपात अस्थायीरीत्या निलंबित करण्यात आले आहे.
- तरीही रशियन टेनिस महासंघाने रिओ ऑलिम्पिक पथकात तिचा समावेश केला आहे.
- रशियाच्या टेनिस महासंघाने महिला एकेरीसाठी ज्या चार महिला खेळाडूंची निवड केली त्यात शारापोवाचे नाव पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
- तसेच या संघात तिच्यासह स्वेतलाना कुझनेत्सोवा, अनास्ताशिया पॅवेलिचेनकोवा, आणि डारिया कसात्किना यांचादेखील समावेश करण्यात आला.
- नियमानुसार आंतरराष्ट्रीय रेटिंगमध्ये सर्वाधिक गुण संपादन करणाऱ्या खेळाडूचा समावेश देशाच्या ऑलम्पिक संघात करण्यात येतो.
- 12 मार्चपासून शरापोवावर स्थायी निलंबन लागू झाले आहे.
- आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने तिला मेलडोनियम या ड्रग सेवनात दोषी धरले होते.
ज्येष्ठ समीक्षक प्रा.रा.ग.जाधव यांचे निधन :
- ज्येष्ठ समीक्षक प्रा.रा.ग. जाधव यांचे (दि.27) सकाळी सहा वाजता पुण्यात निधन झाले.
- प्रा. जाधव यांनी विपुल लेखन केले. त्यांची ‘निळी पहाट’, ‘संध्यासमयीच्या गुजगोष्टी’, ‘समीक्षेतील अवतरणे’, ‘साठोत्तरी मराठी कविता व कवी’, ‘साहित्य व सामाजिक संदर्भ’, ‘साहित्याचे परिस्थितीविज्ञान’ अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.
- तसेच त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षपदही भूषविले आहे.
- त्यांना 2015 सालचा महाराष्ट्र सरकारचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
खगोलशास्त्रज्ञांनी शोधली ‘रेड गेझर्स’ आकाशगंगा :
- खगोलशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने ‘रेड गेझर्स’ हा आकाशगंगेचा नवा प्रकार शोधून काढला असून, यामध्ये प्रचंड वस्तुमान असलेल्या कृष्णविवरांचा समावेश आहे.
- तसेच यातून निर्माण होणाऱ्या अवकाशीय वाऱ्यांमुळे या आकाशगंगेत तारे निर्माणच होऊ शकत नाहीत, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
- अब्जावधी वर्षांपासून एका गूढ ‘तापमाना’मुळे नवे तारे निर्माण होऊ शकणाऱ्या अनेक आकाशगंगांचे रूपांतर तारे न निर्माण होणाऱ्या जागेत होत होते.
- मात्र, आकाशगंगांना मृतवत करणारी आणि हे गूढ रूपांतर घडवून आणणारी यंत्रणा काय असेल, हे आकाशगंगेच्या उत्क्रांतीच्या अभ्यासातील सर्वांत मोठे न सुटलेले कोडे होते.
- रूपांतरित झालेल्या आकाशगंगांमध्ये तारे निर्माण करण्याची क्षमता असतानाही तसे होत नव्हते आणि याचाच शोध शास्त्रज्ञांनी घेतला, असे ब्रिटनमधील केंटुकी विद्यापीठातील खगोलभौतिकी शास्त्रज्ञ रेन्बिन यान यांनी सांगितले.
भारताला आशियाई स्नूकर सांघिक स्पर्धेत रौप्य :
- पाकिस्तानला सहजपणे पराभूत करून अंतिम फेरी गाठलेल्या भारताला बलाढ्य इराणविरुद्ध निसटता पराभव पत्करावा लागल्याने अखेर आशियाई स्नूकर सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
- 2-2 अशी बरोबरी झाल्यानंतर निर्णायक लढतीत आदित्य मेहता पराभूत झाल्याने भारताचे सुवर्ण प्राप्त करता आले नाही.
- अबुधाबी येथे झालेल्या या रोमांचक अंतिम सामन्यात भारताची सुरुवात सकारात्मक झाली.
- आदित्य मेहताने चुरशीच्या झालेल्या एकेरी लढतीत आमीर सरकोशला 65-53 असे नमवून भारताला 1-0 असे आघाडीवर नेले.
- इराणच्या सोहेल वाहेदीने अनपेक्षित बाजी मारताना पंकज अडवाणीचा 54-7 असा दणदणीत पराभव करून बरोबरी साधली.
दिनविशेष :
- अमेरिका एच.आय.व्ही. चाचणी दिन.
- 1864 : शिवराम महादेव परांजपे, ‘काळ’ या वृत्तपत्राचे संपादक यांचा जन्म.
- 1967 : लंडनजवळ एन्फिल्ड येथे जगातील पहिले ए.टी.एम. (Automated teller machine) सुरू झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा