Current Affairs of 26 July 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (26 जुलै 2017)
संकरित बियाण्यांचे जनक डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे निधन :
- संकरित बियाण्यांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे ‘महाराष्ट्र हायब्रीड सीडस् कंपनी’चे (महिको) संस्थापक, स्वातंत्र्यसेनानी डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे 24 जुलै रोजी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.
- डॉ. बद्रीनारायण बारवाले यांनी ‘महिको’च्या माध्यमातून भरघोस उत्पादन देणारे बियाणे शेतकरीवर्गाला उपलब्ध करून देत कृषी क्षेत्रात क्रांती घडवली.
- डॉ. बारवाले यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे बियाणे उत्पादन क्षेत्र खासगी उद्योग क्षेत्रासाठी खुले झाले.
- कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल 2001 साली भारत सरकारने त्यांचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मान केला.
- 1998 साली अमेरिकेतील वर्ल्ड फूड प्राइज फाऊंडेशनतर्फे वर्ल्ड फूड प्राइज या किताबाने त्यांना गौरवण्यात आले होते.
Must Read (नक्की वाचा):
आयसीसी महिला विश्वकप संघाच्या कर्णधारपदी मिताली राज :
- भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिला आपल्या संघाला आयसीसी महिला विश्वकप स्पर्धेत जेतेपद पटकावून देता आले नाही, मात्र, या स्टार महिला फलंदाजाची संपलेल्या या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर आयसीसी पॅनलने निवडलेल्या आयसीसी महिला विश्वकप 2017 च्या संघाच्या कर्णधारपदी निवड केली आहे.
- आयसीसीने 12 सदस्यांचा संघ जाहीर केला. त्यात उपांत्य फेरीत 171 धावांची शानदार खेळी करणारी अष्टपैलू हरमनप्रीत कौर व दीप्ती शर्मा यांचा समावेश आहे.
- तसेच या संघात चॅम्पियन इंग्लंडचे पाच, दक्षिण आफ्रिकेचे तीन आणि ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूला स्थान मिळाले आहे.
भारताचा कारगिल विजय दिवस :
- कारगिल-द्रास सेक्टरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये लढल्या गेलेल्या चौथ्या युद्धात 26 जुलै 1999 रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या संपूर्ण मोहिमेला ऑपरेशन विजय नाव देण्यात आले होते.
- 60 पेक्षा जास्त दिवस लढल्या गेलेल्या या युद्धामध्ये भारताचे 527 जवान शहीद झाले. 1965 आणि 1971 पेक्षा या युध्दाचे स्वरुप वेगळे होते.
- या दोन्ही युद्धामध्ये भारतीय सैन्य सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत घुसले होते. पण कारगिल युद्धाच्यावेळी भारताने आपल्या हद्दीत राहून पाकिस्तानी सैन्याने बळकावलेली ठाणी आणि भूप्रदेश पुन्हा ताब्यात घेतला.
- कारगिल युद्धामध्ये भारतीय जवानांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता सर्वोच्च पराक्रम दाखवला. ज्यामुळे शत्रू फक्त चीत झाला नाही तर, त्याला तिथून पळ काढावा लागला.
- तसेच या लढाईत तोलोलिंग आणि टायगर हिलवरील ताब्यानंतर कारगिल युद्धाचे पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने वळले. चार जुलैला भारताने टायगर हिलवर ताबा मिळवला. हा पाकिस्तानसाठी रणनितीक आणि मानसिक दृष्टया मोठा धक्का होता.
- कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या स्मरणार्थ दरवर्षी कारगिल-द्रास सेक्टर आणि नवी दिल्लीत कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. या दिवशी दरवर्षी इंडिया गेटवरील अमर जवान ज्योती येथे पंतप्रधान शहीद जवानांना आदरांजली वाहतात.
महापालिका अन्नपदार्थांपासून बनविणार बायोगॅस :
- पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेलांमधून गोळा करण्यात येणार्या अन्नपदार्थांवर प्रक्रिया करून त्यापासून बायोगॅस तयार करण्यात येणार आहे.
- महापालिकेच्या वतीने ठेकेदारी संस्थेसमवेत पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित संस्थेला प्रतिटन 1125 रुपये देण्यात येणार आहेत. या संदर्भातील विषय स्थायी समिती सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे.
- शहरातील सर्व हॉटेलांमध्ये दैनंदिन वाया गेलेले अन्नपदार्थ महापालिकेमार्फत गोळा करण्यात येतात. शहरातील हॉटेलांमध्ये दिवसाला सरासरी 16 मेट्रीक टन कचरा निर्माण होतो.
- तसेच वर्षाला सहा हजार मेट्रीक टन कचरा हॉटेलांमधून गोळा केला जातो. सद्य:स्थितीत महापालिकेला घनकचरा गोळा करणे, वाहतूक करणे आणि प्रक्रिया करणे यासाठी 1365 रुपये प्रतिटन आणि महापालिकेच्या वाहनांमार्फत हॉटेलमधील कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुमारे 1022 रुपये प्रतिटन इतका खर्च येतो. कचरा स्वतंत्रपणे गोळा करून त्याची विल्हेवाट ठेकेदाराच्या मालकीच्या महापालिका हद्दीबाहेरील बायोगॅस प्रकल्पात शास्त्रोक्त पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिनविशेष :
- 26 जुलै हा दिवस भारतात विजय दिन म्हणून साजरा करतात (कारगिल युद्धाची समाप्ती).
- समाज सुधारक ‘शाहू महाराज’ यांचा जन्म 26 जुलै 1874 मध्ये झाला.
- 26 जुलै 1927 हा भारतीय क्रिकेट खेळाडू जी.एस. रामचंद यांचा जन्मदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा