Current Affairs of 27 July 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (27 जुलै 2017)

चालू घडामोडी (27 जुलै 2017)

ऊर्जा संवर्धनासाठी ठाणे महापालिकेला पुरस्कार :

 • ऊर्जा संवर्धन आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात ठाणे महापालिकेने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दोन राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारांनी राज्य शासनाच्या ‘महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणा’च्या वतीने ठामपाचा सन्मान करण्यात आला.
 • महाराष्ट्र शासनाच्या अभिकरणाच्या वतीने अलीकडेच पुणे येथे झालेल्या एका समारंभामध्ये राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विद्युत विभागाचे उपनगर अभियंता सुनील पोटे यांनी हे पुरस्कार स्वीकारले.
 • तसेच या वेळी बावनकुळे यांनी ठाणे महानगरपालिका करत असलेल्या कामाचा विशेष गौरवपूर्ण उल्लेख केला. ठामपाने ऊर्जा कार्यक्षमता व अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे.
 • महापालिका इमारतींवर स्टार लेबलिंग, ऊर्जा कार्यक्षमता, सौरऊर्जा नेट मीटरिंग, पथदिव्यांसाठी ऊर्जा कार्यक्षमता प्रकल्प, टायडल एनर्जी, मायक्रो जलविद्युत प्रकल्प, सौरऊर्जेवर वीजनिर्मिती, इलेक्ट्रीक बसेस आदी महत्त्वाचे प्रकल्प राबवण्यात येत आहेत. शिवाय, महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे विविध सेवांसाठी अपारंपरिक ऊर्जेचा वापर सुरू केला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 जुलै 2017)

राज्य सरकारव्दारे प्रिमियम एफएसआयचे दर निश्चित :

 • अनेक दिवस रखडलेला व त्यामुळे शहरातील बांधकाम क्षेत्रावर परिणाम झालेला प्रिमियम एफएसआयचा (चटईक्षेत्र निर्देशांक) दर राज्य सरकारने निश्चित केला. त्यामुळे आता महापालिका हद्दीमध्ये निवासी व औद्योगिक बांधकामांमध्ये मंजूर क्षेत्रापेक्षा वाढीव बांधकाम करायचे असेल तर त्यासाठी महापालिकेकडून विशिष्ट दरामध्ये प्रिमियम एफएसआय बाजारमूल्याच्या (रेडीरेकनर) 50 टक्के दराने मिळेल. मॉल व तत्सम बांधकामांसाठी हा दर 60 टक्के असेल.
 • राज्य सरकारने शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा 5 जानेवारी 2017 ला मंजूर केला. त्यात वाढीव बांधकामांसाठी प्रिमियम एफएसआयची तरतूद होती, मात्र सरकारने त्याचे दरच निश्चित केलेले नव्हते. 26 जुलै रोजी तो निर्णय जाहीर करण्यात आला.
 • पुणे महापालिकेने राज्य सरकारला शिफारस करताना निवासी व व्यावसायिक, अशा संमिश्र बांधकामासाठी रेडीरेकनरच्या 50 टक्के, औद्योगिक वापरासाठीच्या बांधकामाला 60 टक्के तर, व्यावसायिक स्वरूपाच्या बांधकामासाठी 70 टक्के दराची शिफारस केली होती. आता पुणे महापालिका हद्दीत बाजारमूल्याच्या 5060 टक्के दराचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे.

गोंदिया जिल्ह्यातील गावांत विकास शांती यात्रा :

 • गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त 114 गावांत जिल्हा पोलिसांकडून 24 ते 24 जुलैदरम्यान विकास शांती यात्रा सुरू करण्यात आली आहे.
 • नक्षल शहीद सप्ताहाच्या पूर्वी चार दिवस विकास शांती यात्रा जिल्ह्यातील नक्षलग्रस्त असलेल्या गावांत भ्रमण करणार आहे.
 • जिल्ह्यातील 114 नक्षलग्रस्त गावांत नक्षलवाद्यांना गावबंदी करण्यासाठी पोलीस विभागाची योजना आहे. या नक्षलग्रस्त गावातील जनता भयमुक्त रहावी, यासाठी गोंदिया जिल्हा पोलिसांनी त्यांना विकासाच्या मार्गावर नेण्याचा संकल्प केला आहे.
 • आदिवासी जनतेच्या मनात आपल्याविषयी आपुलकी निर्माण करण्याचे कार्य पोलीस विभाग करीत आहे. आदिवासी तरूणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे, व्यायाम शाळा व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात आले.
 • नागरिकांना रेशन कार्ड, आधार कार्ड बनवून देणे, संजय गांधी निराधार योजना, वृध्दांना श्रावण बाळ योजनेचा लाभ या यात्रेच्या माध्यमातून दिला जाणार आहे.
 • गोंदिया जिल्ह्यातील 114 पैकी 48 ग्रामपंचायतींनी स्वयंप्रेरणेने नक्षलवाद्यांना आपल्या गावात बंदी करून विकासात्मक कार्याचे पाऊल उचचले. उर्वरित 66 गावांत नक्षलवाद्यांना बंदी करण्यासाठी पोलीस विभागाने विकास शांती यात्रा सुरू केली आहे.

नमिता कोहोक ‘मिसेस ग्लोबल युनायटेड’ किताबच्या मानकरी :

 • मिसेस इंटरनॅशनल या किताबाच्या मानकरी असणाऱ्या नमिता कोहोक यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेत ‘मिसेस ग्लोबल युनायटेड’ हा किताब जिंकत नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
 • समाजसेवेला वाहिलेल्या आणि जगभरात विस्तार असलेल्या ग्लोबल युनायटेड या संस्थेतर्फे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत आपली छाप सोडत त्यांनी हा किताब पटकावला असून, हा किताब पटकावणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत.
 • अमेरिकेत पार पडलेल्या या स्पर्धेत नमिता कोहोक यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. कॅन्सर क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच समाजसेवेला वाहिलेल्या आणि पूर्ण जगात काम करत असलेल्या संस्थेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
 • वेंडी लिंडबर्ग यांनी ग्लोबल युनायटेडची स्थापना केली. ही संस्था समाजातील इतर समाजसेवी संस्थांसोबत मिळून काम करते. संस्थेअंतर्गत जगभरात महिला शक्तीचा उपयोग करत सामाजिक सेवा केली जाते. या स्पर्धेतील विजेत्या असलेल्या महिला कॅन्सरशी निगडित काम करत असतात. या क्षेत्राशी निगडित सामाजिक उपक्रमात भाग घेणाऱ्यांनाच या स्पर्धेत उपयोगी होता येते. त्यामुळे या स्पर्धेत जी सौंदर्यवती निवडली जाते तिच्या मुकुटामध्ये एक सुवर्णत्रिकोण रिबीन असते. हे कॅन्सरसोबत लढाईचे चिन्ह आहे.
 • तसेच 2015 मध्ये मिसेस इंटरनॅशनला किताब नमिता कोहोक यांनी कॅन्सरवर मात करत 2015 मध्ये यांगून येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत पहिला किताब पटकावला होता. असा किताब पटकावणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या होत्या.

अमेरिकेने रशिया, इराण, उत्तर कोरियावर निर्बंध लादले :

 • अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांचे हित धोक्यात आणल्याचा आणि भांडखोर कृत्ये केल्याचा आरोप करीत अमेरिकेने रशिया, इराण आणि उत्तर कोरियावर निर्बंध लादले आहेत. मात्र या निर्बंधांचे स्वरूप स्पष्ट झालेले नाही. हाऊस ऑफ रिप्रेंझेंटेटिव्हजने या निर्बंधांचे विधेयक 419-3 अशा मताने संमत केले.
 • तसेच हे निर्बंध अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लुडबुड केल्याबद्दल रशियावर आणि त्याने युक्रेन व सीरियावर केलेल्या लष्करी आक्रमणाबद्दल आहेत. दहशतवादाला सतत पाठिंबा दिल्याबद्दल इराणवर निर्बंध घातले आहेत.
 • रशिया, इराण आणि उत्तर कोरिया यांच्यामुळे अमेरिकेच्या हितांना बाधा आली असून ते अमेरिकेच्या शेजार्‍यांना अस्थिर करीत आहेत, असे परराष्ट्र कामकाज समितीचे अध्यक्ष एड रॉयस म्हणाले. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रशियाच्या कथित लुडबुडीच्या चौकशीबाबत अ‍ॅटर्नी जनरल जेफ सेशन्स यांची भूमिका मला मान्य नसली तरी त्यामुळे त्यांना पदावरून दूर करण्याचा माझा विचार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (28 जुलै 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.