Current Affairs of 25 July 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (25 जुलै 2017)

चालू घडामोडी (25 जुलै 2017)

युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सचिन सिवाचला सुवर्णपदक :

 • भारताने चार सुवर्णपदकांसह एकूण 11 पदकांची कमाई करत सहाव्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सातवे स्थान पटकावले.
 • 23 जुलै रोजी संपलेल्या या स्पर्धेत भारताने चार सुवर्ण, एक रौप्य आणि सहा कांस्य पदकांची कमाई केली. युवा विश्व चॅम्पियन सचिन सिवाचने अपेक्षित कामगिरी करताना लाइटफ्लाइवेट (49 किलो) गटात वेल्सच्या जेम्स नॅथन रॉबर्टला धक्का देत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
 • स्पर्धेच्या पहिल्याच दिवसी 18 जुलै रोजी ज्यूडो खेळाडूंनी भारताच्या खात्यात चार पदकांची नोंद केली. सोनीने 73 किलो वजनी गटात बाजी मारताना ऑस्ट्रेलियाच्या उरोस निकोलिकला नमवून भारताच्या खात्यात पहिले सुवर्ण टाकले.
 • तसेच आशिषने 60 किलो वजनीगटात इंग्लंडच्या हॅरी जैन प्रोसेरला धक्का देत कांस्य पटकावले. मुलींमध्ये अंतिम यादव आणि रेबिना देवी यांनी अनुक्रमे 48 किलो आणि 57 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 जुलै 2017)

ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. यशपाल कालवश :

 • ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. यशपाल यांचे निधन झाले आहे. वयाच्या 90 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती.
 • प्रा. यशपाल यांच्या कार्याची दखल घेत 1976 साली पद्मभूषण2013 साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
 • तसेच 19831984 दरम्यान ते योजना आयोगाचे मुख्य सल्लागार होते. 1986 ते 1991 पर्यंत त्यांनी यूसीजीचे अध्यक्षपद भूषवले आहे.
 • तर 2007 पासून 2012 पर्यंत प्रा. यशपाल जेएनयूच्या कुलपतीपदी होते. शिवाय दूरदर्शनवरील विज्ञानासंबंधी कार्यक्रम ‘टर्निंग पॉईंट’चे त्यांनी सूत्रसंचालन केले आहे.

प्रकाश कांकरिया यांना ‘बेस्ट आय सर्जन’ पुरस्कार :

 • मुंबई येथे आयोजित ‘नवभारत हेल्थ केअर समीट’ या कार्यक्रमात ‘बेस्ट आय सर्जन’ हा पुरस्कार अहमदनगरचे नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांना ‘बेस्ट आय हॉस्पिटल’ हा पुरस्कार पुण्याच्या एशियन आय हॉस्पिटलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
 • नवभारत समूहातर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संरक्षण राज्यमंत्री व प्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ. सुभाष भामरे तर विशेष अतिथी म्हणून आरोग्यमंत्री दीपक सावंत, नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, एएफएमसीच्या डीन मेजर जनरल माधुरी कानिटकर उपस्थित होत्या.
 • मुंबईचे कॅन्सरतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. अडवाणी, बेस्ट न्यूरॉलॉजिस्ट डॉ. शिरीष वलसंगकर, हृदयरोगातील विशेष योगदान डॉ. परवेझ ग्रँट, बेस्ट मेडिकल कॉलेज आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेज, बेस्ट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल बॉम्बे हॉस्पिटल, तर इतर मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
 • तसेच डॉ. अभय बंगडॉ.सौ. राणी बंग यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रणॉयने पटकावले अमेरिकन ग्रां.प्री. बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद :

 • अनाहेम (कॅलिफोर्निया) येथे भारतीय खेळाडूंमध्ये झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात एच.एस. प्रणॉय याने शानदार बाजी मारत अमेरिकन ग्रां.प्री. बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. प्रणॉयने अनुभवी पारुपल्ली कश्यपचे तगडे आव्हान परतावून जेतेपदाला गवसणी घातली.
 • तब्बल एक तास पाच मिनिटांपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात प्रणॉयने कश्यपचे आव्हान 21-15, 20-22, 21-12 असे परतावले.
 • पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडल्यानंतर कश्यपणे जबरदस्त पुनरागमन करताना दुसरा गेम मोक्याच्यावेळी जिंकत सामना बरोबरीत आणला. यावेळी कश्यप सामना फिरवणार असे चित्र होते.
 • परंतु, प्रणॉयने अंतिम व तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत कश्यपला पुनरागमनाची कोणतीही संधी न देता मोठ्या फरकाने बाजी मारत विजेतेपदावर नाव कोरले.

दिनविशेष :

 • 25 जुलै 1997 मध्ये के.आर. नारायणन हे भारताच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्त झाले.
 • 2007 मध्ये भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी प्रतिभाताई पाटील ह्या पहिली महिला राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यात.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 जुलै 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.