Current Affairs of 24 July 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (24 जुलै 2017)

चालू घडामोडी (24 जुलै 2017)

इस्रोचे माजी अध्यक्ष यू.आर. राव यांचे निधन :

  • इस्रोचे माजी अध्यक्ष प्रोफेसर उडुपी रामचंद्र राव (यू.आर. राव) यांचे निधन झाले आहे. ते 85 वर्षाचे होते.
  • प्रोफेसर राव यांनी 1972 साली भारतात उपग्रह तंत्रज्ञानाच्या स्थापनेची जबाबदारी घेतली होती.
  • उडुपी रामचंद्र राव यांचा जन्म कर्नाटकातील अदमारू या खेडेगावात 10 मार्च 1932 रोजी एका सर्वसामान्य कुटुंबात झाला होता.
  • प्रोफेसर राव यांचा आंतरराष्ट्रीय अॅस्ट्रोनॉटिकल फेडरेशनने प्रतिष्ठित ‘द 2016 आईएएफ हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश केला होता.
  • 2013 मध्ये वॉशिंग्टन येथे ‘सॅटेलाइट हॉल ऑफ फेम ऑफ द सोसायटी ऑफ सॅटेलाइट प्रोफेशनल्स इंटरनॅशनल’ या संस्थेत समावेश झालेले ते पहिले भारतीय आहेत.
  • 1984 ते 1994 या काळात त्यांनी देशाच्या अवकाश कार्यक्रमाचे नेतृत्व केले. दहा वर्षे ते अवकाश खात्याचे सचिव व इस्रोचे अध्यक्ष होते.
  • ‘आर्यभट्ट’नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली ‘भास्कर’, ‘अ‍ॅपल’, ‘रोहिणी’, ‘इन्सॅट’ आदी श्रेणींचे किमान वीस उपग्रह तयार झाले.  
  • अंतराळ क्षेत्रातील राव यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबाबत 1976 साली त्यांचा पद्म भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तर यावर्षी 2017 मध्ये त्यांचा पद्म विभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 जुलै 2017)

सिद्धिविनायक ट्रस्ट अध्यक्षपदी आदेश बांदेकर :

  • सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे.
  • ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाद्वारे घराघरात पोहोचलेले बांदेकर यांचे नाव ट्रस्टच्या अध्यक्षपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुचवले होते.
  • शिर्डी आणि पंढरपूर संस्थांचे अध्यक्षपद युतीमध्ये भाजपाकडे असून, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्षपद शिवसेनेच्या कोट्यात आहे.
  • भाजपा-शिवसेना आघाडीचे सरकार येऊन पावणेतीन वर्षे झाली; तरी सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्षपद शिवसेनेला काही कायदेशीर अडचणींमुळे मिळू शकलेले नव्हते. बांदेकर यांच्या नियुक्तीने तो मार्ग मोकळा झाला आहे.

भारतीय महिला संघतील रेल्वे महिला क्रिकेटपटूंना पदोन्नती :

  • रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी भारतीय महिला वर्ल्डकप संघातील जे खेळाडू रेल्वेत आहेत अशांसाठी पदोन्नतीची घोषणा केली आहे.
  • भारतीय संघातील 15 खेळाडूंपैकी 10 क्रिकेटपटू रेल्वेत आहेत. त्यात कर्णधार मिताली राज आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर यांचादेखील समावेश आहे.
  • तसेच वेळेआधी पदोन्नती देण्याशिवाय या क्रिकेटपटूंना रोख पारितोषिकेही दिली जाणार आहेत.
  • मिताली राज आणि हरमनप्रीत यांच्यासह रेल्वेत असणाऱ्या एकता बिष्ट, पूनम राऊत, वेदा कृष्णमूर्ती, पूनम यादव, सुषमा वर्मा, मोना मेश्राम, राजेश्वरी गायकवाड आणि नुजहत परवीन या भारतीय संघात आहेत.

भारताला रशियाकडून मिळणार अत्याधुनिक लढाऊ विमान :

  • लढाऊ विमानांची निर्मिती करणाऱ्या रशियातील मिग एअरक्राफ्ट या कंपनीने जानेवारीमध्ये लाँच केलेले मिग-35 हे लढाऊ विमान भारतीय हवाई दलाच्या सेवेत दाखल होणार आहे. मिग-35 हे विमान अमेरिकेच्या लढाऊ विमानालाही हरवू शकते असे मिग एअरक्राफ्टचे म्हणणे आहे.
  • मिग एअरक्राफ्टने मिग-35 हे विमान जानेवारीमध्ये बाजारपेठेत आणले होते. या बहुउद्देशीय लढाऊ विमानाचे प्रमोशनही सुरु झाले आहे.
  • कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इया तारासेंको यांना भारताविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले, कंपनीने भारत आणि अन्य देशांमध्ये या विमानाची विक्री करण्यासाठी प्रमोशन करायला सुरुवात केली आहे.
  • तसेच भारतातील कंत्राटासाठी आम्ही प्रस्ताव तयार करत असून याबाबत हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले. मिग-35 विमान सर्वश्रेष्ठ असून लॉकहीड मार्टिनच्या पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांपेक्षा मिग-35 सर्वोत्तमच आहे असा दावाही कंपनीने केला आहे.
  • भारतात गेल्या 50 वर्षांपासून मिग विमानांचा वापर केला जात आहे. मिग कॉर्पोरेशनने मिग-35 साठी सुरुवातीला ज्या देशांमध्ये प्रस्ताव मांडण्याची तयारी केली त्यामध्ये भारताचा समावेश आहे.

दिनविशेष :

  • अझीम हशिम प्रेमजी यांचा जन्म 24 जुलै 1945 मध्ये झाला. हे भारतीय उद्योगपतीविप्रो कंपनीचे अध्यक्ष आहेत.
  • फोर्ब्सने जाहीर केलेल्या भारतीय श्रीमंतांच्या यादीमध्ये ते तिसऱ्या स्थानावर आहेत व जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये 41 व्या स्थानावर आहेत.
  • 2005 साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. तसेच 2011 साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 जुलै 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.