Current Affairs of 26 December 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (26 डिसेंबर 2016)

चालू घडामोडी (26 डिसेंबर 2016)

भारतीय युवा संघ आशिया ‘चॅम्पियन’ :

 • फलंदाज आणि गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर भारताच्या युवा संघाने श्रीलंकेचा 34 धावांनी पराभव करून 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्ट्रिक केली.
 • आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 50 षटकांत 8 बाद 273 धावांची समाधानकारक मजलम मारली.
 • तसेच या आव्हानाचा पाठलाग करताना एकवेळ यजमान श्रीलंकेचा संघ 39.5 षटकात 4 बाद 196 धावा अशा सुस्थितीत होता.
 • मात्र, भारताच्या गोलंदाजांनी मोक्याच्यावेळी अचूक मारा करताना लंकेच्या फलंदाजांना जखडवून ठेवत त्यांचा डाव 48.4 षटकांत 239 धावांमध्ये संपुष्टात आणला.

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाच्या क्रमवारी जाहीर :

 • आशियाई स्पर्धेतील माजी सुवर्ण विजेता विकास कृष्ण आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाच्या (एआयबीए) जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीमध्ये चौथ्या स्थानी आहे.
 • विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्य विजेती साविती बुरा दुसऱ्या स्थानी आहे.
 • एआयबीए व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये वर्षांतील सर्वोत्तम बॉक्सर ठरलेल्या विकासने 75 किलो वजनी गटात 1350 मानांकन गुणांची कमाई केली आहे.
 • पुरुष बॉक्सिंगमध्ये शिवा थापा 56 किलो गटात सातव्या स्थानी आहे. भारताचा एल देवेंद्रो सिंग लाईट फ्लायवेट (49 किलो) गटात 27 व्या स्थानी आहे.
 • राष्ट्रकुल स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेता मनोज कुमार लाईट वेल्टरवेट (64 किलो) गटात 36व्या स्थानी आहे.

उदित नारायण यांना मोहम्मद रफी पुरस्कार जाहीर :

 • एका पेक्षा एक दर्जेदार गाण्यांना संगीतबद्ध केलेल्या भारतीय सिने इतिहासातील पहिल्या महिला संगीतकार उषा खन्ना यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार जाहीर.  
 • तसेच ख्यातनाम गायक उदित नारायण यांनाही हा पुरस्कार प्रदान करणार आहे.
 • अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव आणि मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.
 • पुरस्काराचे हे नववे वर्ष असून एक लाख रूपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह आणि शाल, श्रीफळ असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असते तर 51 हजार रूपयांचा धनादेश आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप असते.

राजमुद्रेचे चित्रकार दिनानाथ भार्गव यांचे निधन :

 • राजमुद्रेच्या निर्मितीत मोलाचा वाटा असलेले प्रख्यात चित्रकार दिनानाथ भार्गव यांचे इंदूरमध्ये 24 डिसेंबर रोजी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते.
 • भार्गव हे एक दशकाहून अधिक काळ हृदयासंबंधी विकारांनी ग्रस्त होते. त्यांच्यावर अॅंजिओप्लास्टीही करण्यात आली होती.
 • 1 नोव्हेंबर 1927 रोजी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात मुलताई येथे भार्गव यांचा जन्म झाला होता.
 • कला भवन शांती निकेतनचे कलागुरु नंदलाल बोस यांच्या प्रिय शिष्यांपैकी ते एक होते. बोस यांनीच भारतीय संविधानातील पांडुलिपीची पाने तयार करण्यासाठी भार्गव यांची निवड केली होती.
 • कपड्यांमधील प्रसिद्ध मधुबनी पेंटींग ही त्यांचीच देणगी होती. त्यांच्या वॉश पेंटींग चित्रकला जगतात प्रसिद्ध होती.
 • 1950 च्या दशकात युरोपमधील वर्ल्ड आर्ट टूरमध्येही त्यांच्या चित्रांचा समावेश करण्यात आला होता. या चित्रांसाठी त्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले होते.

गोवा येथील आयआयटी संचालकपदी बर्दकांत मिश्रा :

 • उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात स्वतःचे खास स्थान निर्माण करणाऱ्या भारतीय तंत्रज्ञान संस्थांपैकी (आयआयटी) गोव्यासह पाच नव्या संस्थांच्या रिक्त पदांवर संचालकांची नियुक्ती करण्यात आली.
 • गोवा आयआयटीच्या संचालकपदी बर्दकांत मिश्रा यांची नियुक्ती झाली आहे. या पाचही आयआयटी संस्था या वर्षीपासूनच अस्तित्वात आल्या आहेत.
 • आयआयटी संचालकपद हे प्रतिष्ठेचे मानले जाते. देशात 23 आयआयटी आहेत. यापैकी गोवा, धारवाड, भिलाई, गोवा, जम्मू व धनबाद आयआयटी याच वर्षी अस्तित्वात आल्या आहेत.
 • पलक्कड व तिरुपती येथील संस्था 2015 मध्ये सुरू झाल्या. यातील जम्मू वगळता इतर सर्व संचालकांची नियुक्ती करण्यात आली.
 • केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या नियुक्‍त्यांच्या अंतिम आदेशांवर स्वाक्षरी केली.
 • नव्या संचालकांची नावे अशी (एस. पासुमासुथू (धारवाड), बर्दकांत मिश्रा (गोवा), के.एन. सत्यनारायण, रजत मोना (भिलई) व पी. बी. सुनीलकुमार (पलक्कड) आहेत.
 • स्वातंत्र्योत्तर काळात तंत्रशिक्षणाला वाव देण्यासाठी नेहरू सरकारने आयआयटीची पायाभरणी केली. रुरकी येथे 1947 मध्ये भारतातील पहिल्या आयआयटीची पायाभरणी झाली.
 • 50 च्या दशकात मुंबईखरगपूरसह आणखी चार आणि 1961 मध्ये दिल्ली आयआयटीची स्थापना करण्यात आली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.